Stree 3 : स्त्री 2 चित्रपटानंतर आता स्त्री 3 ची प्रतीक्षा, चित्रपटाची स्क्रिप्ट तयार; रिलीज डेटबाबत मोठी अपडेट समोर
Stree 3 Release Date : स्त्री 2 चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला असून आता प्रेक्षकांना स्त्री 3 चित्रपटाची उत्सुकता लागली आहे.
मुंबई : अभिनेत्री श्रद्धा कपूर आणि अभिनेता राजकुमार राव यांचा बहुप्रतिक्षित स्त्री 2 चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला आहे. अमर कौशिक दिग्दर्शित स्त्री 2 चित्रपटाने प्री-बुकींगापासूनच रेकॉर्ड ब्रेक करण्यास सुरुवात केली आहे. स्त्री 2 चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद पाहायला मिळत आहे. स्त्री 2 चित्रपटानंतर आता चाहत्यांना स्त्री 3 चित्रपटाची उत्सुकता लागली आहे. असं असताना मेकर्सकडून स्त्री चित्रपटाच्या पुढील भागाबाबत अपडेट समोर आली आहे.
स्त्री 3 चित्रपटाची स्क्रिप्ट तयार
स्त्री 2 (Stree 2) चित्रपट 14 ऑगस्टला रिलीज झाला आहे. 2018 साली आलेल्या स्त्री चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धमाका केला होता, त्यामुळे स्त्री 2 या चित्रपटाबद्दल चाहत्यांमध्ये खूप उत्सुकता होती. आता चित्रपटाला सोशल मीडियावर चांगला प्रतिसाद मिळताना दिसत आहे. 15 ऑगस्टला स्त्री 2 सह खेल खेल में, वेदा आणि 'डबल आय स्मार्ट' हे चार चित्रपट प्रदर्शित झाले आहेत. असं असलं तरी, स्त्री 2 चित्रपट इतरांवर भारी पडणार असून बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करू शकतो, असं बोललं जात आहे.
View this post on Instagram
रिलीज डेटबाबत मोठी अपडेट समोर
आता 'स्त्री'च्या तिसऱ्या भागाबाबत एक मोठी अपडेट समोर आली आहे. चाहत्यांसाठी ही आनंदाची बातमी आहे. स्त्री 3 चित्रपटाबाबत ही अपडेट आहे. श्रद्धा कपूर, राजकुमार राव, अपारशक्ति खुराना, अभिषेक बनर्जी, अमर कौशिक आणि दिनेश विजन यांनी दिल्लीतील एका प्रेस कान्फरेन्सला हजेरी लावली होती. यावेळी दिग्दर्शक अमर कौशिक यांनी सांगितलं की, स्त्री 2 चित्रपटाआधीच स्त्री 3 ची कहाणी तयार आहे. त्यांनी पुढे सांगितलं की, स्त्री 2 चित्रपटाच्या तीन वर्षांनंतर स्त्री 3 रिलीज होईल.
स्त्री 2 चित्रपटानंतर आता स्त्री 3 ची प्रतीक्षा
'स्त्री 2' चित्रपट पाहिलेला प्रेक्षकांना पुढील भागाचा अंदाज आलाचं असेल. स्त्री 2 चित्रपटात स्त्री 3 हा चित्रपटची हिंट देण्यात आली आहे. स्त्री 2 चित्रपटाच्या शेवटी थोडीशी झलक दाखवण्यात आली आहे. स्त्री 3 चित्रपटाची कहाणी अक्षय कुमारभोवती फिरणारी असेल. स्त्री 2 मधील अभिनेता अक्षय कुमारने शानदार कॅमिओ केला असून प्रेक्षकांना ते आवडलं आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :