Bigg Boss Marathi : "मी गावठी पॅटर्न, सुटलो तर सुटलो", सूरजच्या पावरचा ट्रेलर पाहून घरातील सदस्यांना फुटला घाम
Bigg Boss Marathi New Season 5 : बिग बॉसच्या नव्या प्रोमोमध्ये सूरजचा रुद्रावतार पाहायला मिळत आहे. सूरज अरबाजला चांगलाच भिडल्याचं पाहायला मिळत आहे.
मुंबई : बिग बॉस मराठीच्या घरात सध्या कॅप्टनसी टास्क सुरु आहे. पहिल्या कॅप्टनचा कार्यकाळ संपल्यानंतर आता दुसरा कॅप्टन होण्यासाठी सदस्यांची रस्सीखेंच सुरु आहे. कॅप्टन्सी टाक्समधून टीम B बाहेर पडल्यानंतर आता टीम A मधील सदस्य कॅप्टन्सीचे दावेदार आहेत. त्यामुळे आता बिग बॉसच्या घरातील नवीन कॅप्टन होण्यासाठी टीम A मधील सदस्यांमध्ये जोरदार राडा पाहायला मिळणार आहे. महत्त्वाचं म्हणजे खेळ कॅप्टन्सीचा, कल्ला मात्र सूरजचा पाहायला मिळणार आहे.
"मी गावठी पॅटर्न, मी सुटलो तर सुटलो"
बिग बॉसच्या घरात कॅप्टन्सी टास्कमध्ये सूरजचा रुद्रावतार पाहायला मिळणार आहे. कॅप्टन्सी कार्यात सूरज चव्हाण वैभवला नडला आणि आता अरबाजलाही भिडल्याचं दिसत आहे. कॅप्टन्सी टास्कमध्ये सूरज चव्हाणने अरबाज पटेलला त्याच्या गावठी पावरचा ट्रेलर दाखवला आहे. सूरज यानंतर म्हणतो की, "मी त्याला सहज बाजूला केला, मी जर सुटलो, तर सुटलो". यावरून सूरज चव्हाण घरात जोरदार कल्ला करताना दिसणार हे, मात्र नक्की. त्यामुळे प्रेक्षकांची उत्कंठा शिगेला पोहोचली आहे.
सूरजच्या पावरचा ट्रेलर पाहून घरातील सदस्यांना फुटला घाम
View this post on Instagram
"मी लय गावठी पावर"
बिग बॉस मराठीच्या प्रोमोमध्ये "ताई मला तो थांबवत होता ना मला इतकी चीड यायची ना". यावर वर्षा उसगांवकर त्याला सांगतात, "पुढच्या वेळेला काय कर तू बाकी लोक काय बोलतात याकडे लक्ष देऊ नकोस". सूरज पुढे सांगतो की, "त्याला (अरबाजला) मी फक्त मानेवर उचललंय फक्त सहज असा, मग माझी किती पावर असेल. अन् मग काय मी सुटलो तर सुटलो. त्यो मला काय म्हणला, तुला मी उचलून पाण्यात फेकून दिला असता. मी म्हणालो, हे बघ तू पाण्यात फेकशील पण, पाण्यातून बाहेर आल्यावर मी काय करेन हे तुला कळणार नाही. मी लय गावठी पावर आहे."
View this post on Instagram
महत्त्वाच्या इतर बातम्या :