एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
LIVE : श्रीदेवी यांच्या पार्थिवावर आज दुपारी 3.30 वाजता अंत्यसंस्कार
श्रीदेवींचे पती बोनी कपूर यांनाही क्लीन चिट मिळाली आहे.
मुंबई : अकाली मृत्यूमुळे 'श्रीदेवी' नावाचं वादळ अचानक शमलं, पण त्यानंतर उठलेलं शंका-कुशंकांचं वादळ काही शमण्याचं नाव घेत नव्हतं. अखेर अनेक दावे आणि प्रतिदाव्यांना पूर्णविराम मिळाला आहे. दुबई सरकारने श्रीदेवी मृत्यू प्रकरण बंद केलं आहे.
LIVE UPDATE :
8.30 am : श्रीदेवीच्या पार्थिवावर आज अंत्यसंस्कार, 9:30 वाजेपासून अंत्यदर्शन
7.00 am : आज दुपारी साडेतीन वाजता अभिनेत्री श्रीदेवी यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार होणार
श्रीदेवी यांचं पार्थिव रात्री 9. 40 वाजताच्या सुमारास मुंबई विमानतळावर दाखल झालं. यावेळी कपूर कुटुंबीय त्यांच्यासमवेत होतं. टीना आणि अनिल अंबानी, अनिल कपूर, सोनम कपूर विमानतळावर उपस्थित होते.
विमानतळावर गेट क्रमांक 8 ने श्रीदेवींचं पार्थिव बाहेर आणण्यात आलं. श्रीदेवींच्या लोखंडवाला येथील ग्रीन एकर्स या निवासस्थानी ते आणण्यात येईल. जवळचे नातेवाईक, बॉलिवूड सेलिब्रेटी, चाहते या ठिकाणी उपस्थित आहेत.
वर्सोव्यात सेलिब्रेशन क्लबमध्ये उद्या, म्हणजे बुधवारी सकाळी 9.30 ते 12.30 या कालावधीत श्रीदेवींच्या पार्थिवाचं अंत्यदर्शन घेता येईल. दुपारी दोन वाजता श्रीदेवींच्या अंत्ययात्रेला सुरुवात होईल, तर साडेतीन वाजता विलेपार्लेतील हिंदू स्मशानभूमीत पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येतील.
दुबईतील स्थानिक वेळेनुसार शनिवारी रात्री 11-11.30 च्या सुमारास श्रीदेवी यांचा मृत्यू झाला. त्यानंतर तीन दिवसांपासून मायदेशी परतण्याच्या प्रतिक्षेत असलेलं श्रीदेवींचं पार्थिव अखेर खासगी विमानातून संध्याकाळी भारताकडे रवाना झालं.
श्रीदेवींच्या मृत्यूनंतर निर्माण झालेलं संशयाचं धुकंही विरलं आहे. हा घातपात नसून बाथटबमध्ये अपघाताने बुडूनच श्रीदेवींचा मृत्यू झाल्याचं अहवालात स्पष्ट झालं. श्रीदेवींचे पती बोनी कपूर यांनाही क्लीन चिट मिळाली आहे.
दुबई पोलिसांनी बोनी कपूर यांचीही चौकशी केली होती. ज्या हॉटेलमधील रुममध्ये श्रीदेवींचा मृत्यू झाला. ती खोली पोलिसांनी सील केली होती. तसंच श्रीदेवींचे कॉल डिटेल्सही तपासले होते.
संबंधित बातम्या :
श्रीदेवी मद्यसेवन करत नव्हती, ही हत्या आहे : सुब्रमण्यम स्वामी
श्रीदेवीचा मृत्यू संशयास्पद, पुन्हा शवविच्छेदन व्हावं : एस. बालाकृष्णन
श्रीदेवीच्या मृत्यूप्रकरणी बोनी कपूरची दुबई पोलिसांकडून चौकशी
श्रीदेवींच्या मृत्यूने धक्का, मला जगावंसं वाटत नाहीय : राखी सावंत
श्रीदेवी बॉलिवूडमधल्या अघोरी स्पर्धेची बळी?
गूगल सर्चमध्ये काल दिवसभरात ‘श्रीदेवी’ टॉप
श्रीदेवी यांचा बाथटबमध्ये बुडून मृत्यू, शरीरात दारुचे अंश आढळले
नवा दावा – श्रीदेवींना बाथटबमध्ये बेशुद्ध अवस्थेत हॉटेल स्टाफने पाहिलं!
श्रीदेवी यांना हृदयासंबंधी कोणताही विकार नव्हता : संजय कपूर
‘श्रीदेवी बाथटबमध्ये बेशुद्ध अवस्थेत आढळल्या’, खलीज टाइम्सचा दावा
प्रसिद्ध अभिनेत्री श्रीदेवी यांचं यूएईमध्ये निधन
अर्जुन कपूरसोबत घडलं, तोच दुर्दैवी योगायोग जान्हवीसोबत
नीले नीले अंबर पर चांद जब आ जाये…
श्रीदेवींच्या निधनावरील शोकसंदेशाने काँग्रेस ट्रोल
श्रीदेवींचा अखेरचा चित्रपट ऑक्टोबरमध्ये झळकणार
म्हणून जान्हवीने तीन दिवस आईशी बोलणं टाकलं
‘रुप की रानी’ श्रीदेवी यांची कारकीर्द
लेकीची बॉलिवूडमधली ‘धडक’ पाहण्यापूर्वी ‘मॉम’ची एक्झिट
दुबईतील लग्नसोहळ्यातले श्रीदेवी यांचे अखेरचे फोटो
बिग बींना श्रीदेवीच्या निधनाची कुणकुण?
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
बॉलीवूड
निवडणूक
राजकारण
निवडणूक
Advertisement