एक्स्प्लोर
रामेश्वरममध्ये श्रीदेवींच्या अस्थींचं विसर्जन
श्रीदेवीच्या अस्थींचं तामिळनाडूतील रामेश्वरममध्ये विसर्जन करण्यात आलं. यावेळी पती बोनी कपूर आणि दोन्ही मुली उपस्थित होत्या.
मुंबई : दिवंगत अभिनेत्री श्रीदेवीच्या अस्थींचं तामिळनाडूतील रामेश्वरममध्ये विसर्जन करण्यात आलं. यावेळी पती बोनी कपूर आणि दोन्ही मुली उपस्थित होत्या. श्रीदेवीचं बालपण चेन्नईमध्ये गेल्याने तामिळनाडूमध्येच अस्थिविसर्जन करण्यात आलं.
24 फेब्रुवारीला श्रीदेवीचं दुबईत निधन झालं होतं. मृत्यूची चौकशी झाल्यानंतर पार्थिव मुंबईत आणण्यात आलं. त्यानंतर बुधवारी श्रीदेवीच्या शेवटच्या इच्छेनुसार पांढऱ्या शुभ्र फुलांमध्ये सजवलेल्या ट्रकमधून पार्थिवाची अंत्ययात्रा काढण्यात आली.
श्रीदेवीच्या अकाली निधनामुळे कपूर कुटुंबीयांसोबतच बॉलिवूड आणि तिच्या चाहत्यांमध्येही शोककळा पसरली आहे.
श्रीदेवीच्या मृत्यूनंतर पती बोनी कपूर यांनी त्या रात्री नेमकं काय घडलं याबाबत सांगितलेला एक ब्लॉग समोर आला आहे. आपण पत्नीला सरप्राईज देण्यासाठी दुबईला गेलो, मात्र काळाने घाला घातला आणि सर्व काही एका वाईट स्वप्नामध्ये बदललं, असं बोनी कपूर म्हणाले होते.
वाचा संपूर्ण ब्लॉग : 'त्या' रात्री नेमकं काय घडलं होतं, बोनी कपूर यांचं पहिल्यांदा स्पष्टीकरण
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
पर्सनल फायनान्स
महाराष्ट्र
महाराष्ट्र
Advertisement