Squid Game : 'स्क्विड गेम' फेम अभिनेत्यावर लैंगिक शोषणाचा आरोप, अभिनेत्याने आरोप फेटाळले
Oh Yeong Su : 'स्क्विड गेम' फेम ओ येओंग सु गेल्या काही दिवसांपासून लैंगिक छळाच्या आरोपामुळे चर्चेत होते. पण आता वकिलांनी हे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत.
Oh Yeong Su : 'स्क्विड गेम' (Squid Game) या वेब सीरिजने जगभरात धुमाकूळ घातला. या वेबसीरिजमध्ये ओ येओंग सु (O Yeong Su) एका वृद्ध व्यक्तीच्या भूमिकेत होते. गेल्या काही दिवसांपासून लैंगिक छळाच्या आरोपामुळे ते चर्चेत होते. पण आता त्यांच्या वकिलांनी हे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत.
मीडिया रिपोर्टनुसार, 78 वर्षीय ओ येओंग सु यांच्यावर 2017 साली एका महिलेने लैंगिक छळाचा आरोप केला होता. महिलेच्या तक्रारीनुसार ओ येओंग सु यांच्यावर गुन्हा दाखल झाला आला. त्यानंतर एप्रिल 2022 रोजी निकाल न देता ही केस बंद करण्यात आली. पण पीडितेच्या सांगण्यावरून आता ही केस पुन्हा सुरू करण्यात आली. सुनावणीदरम्यान ओ येओंग सु यांच्या वकिलांनी सर्व आरोप फेटाळून लावले आहेत.
सुनावणीदरम्यान ओ येओंग सु म्हणाले,"तलावाभोवती फिरताना मी तिचा हात पकडला होता. याचा वेगळा अर्थ काढणार नाही, असं महिलेने सांगितलं. घडल्या प्रकाराबद्दल मी तिची माफी मागितली. पण याचा अर्थ मी दोषी आहे असा नाही."
'स्क्विड गेम'ने दिली जागतिक स्तरावर ओळख
ओ येओंग सु हे दक्षिण कोरियातील लोकप्रिय अभिनेते आहेत. पण 'स्क्विड गेम' या वेबसीरिजमुळे त्यांना जगभरात लोकप्रियता मिळाली. या वेबसीरिजमधील अभिनयासाठी त्यांना 'गोल्डन ग्लोब 2022' पुरस्कारांमध्ये सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला आहे. ओ येओंग सु यांनी अनेक कोरियन वेबसीरिजमध्ये काम केलं आहे.
View this post on Instagram
संबंधित बातम्या