एक्स्प्लोर
सोनाक्षीच्या अकीराच्या प्रदर्शनाचा मुहूर्त ठरला

मुंबई : अभिनेत्री सोनाक्षी सिन्हाचा आगामी 'अकीरा' या चित्रपटाचा मुहूर्त ठरला असून आता तो २ सप्टेंबर रोजी सर्वत्र प्रदर्शित होणार आहे. सोनाक्षीनेच या संदर्भात ट्विटरवरून माहिती दिली. दिग्दर्शक ए. आर. मुरुगदोस यांनी तिच्या भूमिकेला पडद्यावर कसे उतरवले आहे, याबाबत ती उत्सूक असल्याचे ती आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे. या पूर्वी देखील तिने चित्रपटाच्या प्रदर्शनाचा मुहूर्त २३ सप्टेंबर असल्याचे सांगितले होते. या चित्रपटात ती वेगवेगळे स्टंट करताना दिसणार आहे. या स्टंटासाठी तिने खूप मेहनत घेतलेली आहे.
मुरुगदोस यांच्यासोबत 'हॉली डे : अ सोल्जर इज नेव्हर ऑफ ड्यूटी' या चित्रपटानंतर सोनाक्षीचा दुसरा चित्रपट आहे. या चित्रपटात ती मार्शल आर्टस करताना दिसणार आहे. या चित्रपटात तिचे वडील शत्रुघ्न सिन्हादेखील दिसणार आहेत.
मुरुगदोस यांच्यासोबत 'हॉली डे : अ सोल्जर इज नेव्हर ऑफ ड्यूटी' या चित्रपटानंतर सोनाक्षीचा दुसरा चित्रपट आहे. या चित्रपटात ती मार्शल आर्टस करताना दिसणार आहे. या चित्रपटात तिचे वडील शत्रुघ्न सिन्हादेखील दिसणार आहेत. आणखी वाचा























