एक्स्प्लोर
सिंबाची बॉक्स ऑफिसवर धमाल सुरुच, 200 कोटींचा टप्पा पार
रोहित शेट्टी दिग्दर्शित सिंबाने नवव्या दिवशी म्हणजे शनिवारी 13.32 कोटी रुपयांची कमाई केली आहे. तर शुक्रवारी या चित्रपटाने 9.02 कोटींचा गल्ला जमवला होता, अशी माहिती चित्रपट समिक्षक तरण आदर्शने दिली.
मुंबई : रणवीर सिंगचा 'सिंबा' हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर धमाल करत आहे. रोहित शेट्टी दिग्दर्शित सिंबाने नवव्या दिवशी म्हणजे शनिवारी 13.32 कोटी रुपयांची कमाई केली आहे. तर शुक्रवारी या चित्रपटाने 9.02 कोटींचा गल्ला जमवला होता, अशी माहिती चित्रपट समिक्षक तरण आदर्शने दिली.
सिंबा सिनेमाने आतापर्यंत तब्बल 173.15 कोटी रुपयांची बक्कळ कमाई केली आहे. रविवारीही हा सिनेमा चांगली कमाई करेल, असं बोललं जात आहे. रविवारच्या कमाईनंतर हा सिनेमा बाजीराव मस्तानीला मागे टाकत रणवीर सिंगचा दुसरा सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरु शकतो.
सिंबाने फक्त भारतातच नव्हे तर भारताबाहेरही चांगली कमाई केली आहे. विदेशात या सिनेमाने आठ दिवसात 63.22 कोटी रुपयांची कमाई केली. भारत आणि भारताबाहेरच्या एकूण कमाईने 200 कोटी रुपयांचा टप्पा पार केला आहे.
अॅक्शन, कॉमेडी आणि सामाजिक प्रश्नावर आधारित हा सिनेमा आहे. जो प्रेक्षकाच्या पसंतीस उतरत आहे. या सिनेमात रणवीर सिंगसह सैफ अली खान आणि अमृता सिंग यांची मुलगी सारा अली खान या सिनेमात मुख्य भूमिकेत आहे. तिचा हा दुसरा चित्रपट आहे. रणवीर आणि साराची जोडी प्रेक्षकांना चांगलीच आवडत आहे.
रणवीर सिंग आणि साराअली खान यांच्यासह सोनू सुद, आशुतोष राणा, सिद्धार्थ जाधव या सिनेमात मुख्य भूमिकेत आहेत.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
क्रीडा
महाराष्ट्र
क्रीडा
Advertisement