Siddharth Chandekar: 'जंगली रमीची जाहिरात करून, फॉरेनला फिरायला...' नेटकऱ्याची कमेंट; सिद्धार्थ चांदेकर रिप्लाय देत म्हणाला, 'काय करणार भाऊ...'
एका नेटकऱ्याच्या कमेंट्ला सिद्धार्थ चांदेकरनं (Siddharth Chandekar) रिप्लाय दिला आहे. त्याच्या या रिप्लायनं अनेकांचे लक्ष वेधले आहे.

Siddharth Chandekar: मराठी चित्रपटसृष्टीतील अभिनेता सिद्धार्थ चांदेकर (Siddharth Chandekar) हा गेल्या काही दिवसांपासून त्याच्या फॉरेन ट्रीपचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत आहे. सिद्धार्थ आणि मिताली मयेकर (Mitali Mayekar) यांच्या फॉरेन ट्रीपच्या फोटो आणि व्हिडीओला नेटकऱ्यांची पसंती मिळत आहे. नुकताच सिद्धार्थनं एक खास व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओला एका नेटकऱ्यानं कमेंट केली आहे. त्या नेटकऱ्याच्या कमेंटला सिद्धार्थनं दिलेल्या रिप्लायनं अनेकांचे लक्ष वेधले आहे.
नेटकऱ्याची कमेंट
सिद्धार्थनं त्याचा फॉरेन ट्रीपचा व्हिडीओ शेअर करुन त्याला कॅप्शन दिलं, 'हे करताना आम्ही मूर्खासारखे दिसत होतो. पण हे वर्थ इट आहे. Here’s our 360 degree idiot-ness' सिद्धार्थनं शेअर केलेल्या या व्हिडीओला एका नेटकऱ्यानं कमेंट केली, 'अरे वा, जंगली रमीची जाहिरात करून, फॉरेनला फिरायला भेटतं... मजा आहे बाबा' नेटकऱ्याच्या या कमेंटला सिद्धार्थनं रिप्लाय दिला, 'काय करणार भाऊ, तुमच्या इतके मल्टी टॅलेंटेड आम्ही नाही.' सिद्धार्थच्या या रिप्लायनं अनेकांचे लक्ष वेधले आहे.
View this post on Instagram
सिद्धार्थनं 2021 मध्ये मिताली मयेकरसोबत (Mitali Mayekar) लग्नगाठ बांधली. सिद्धार्थ आणि मिताली हे एकमेकांसोबतचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत असतात. सिद्धार्थ आणि मिताली यांच्या फोटोवर नेटकरी लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव करत असतात. सध्या हे दोघे त्यांच्या फॉरेन ट्रीपचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत आहेत. काही दिवसांपूर्वी मितालीनं तिचा बिकीनी लूकमधील फोटो शेअर केला होता. मितालीच्या त्या फोटोनं अनेकांचे लक्ष वेधले होते.
View this post on Instagram
सिद्धार्थचे चित्रपट
सिद्धार्थनं झिम्मा, गुलाबजाम, क्लासमेट्स, झेंडा आणि वजनदार या चित्रपटांमध्ये काम केलं आहे. तसेच सिटी ऑफ ड्रिम्स या सीरिजमध्ये देखील सिद्धार्थनं महत्वाची भूमिका साकारली आहे. सिद्धार्थच्या आगामी चित्रपटांची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत.
इतर महत्वाच्या बातम्या:
Mitali Mayekar: मिताली मयेकरचा बिकिनी लूक चर्चेत; फोटो शेअर करत म्हणाली, 'आपली संस्कृती...'
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
