Actor Darshan: भर कार्यक्रमात चाहत्यानं अभिनेत्याला फेकून मारली चप्पल; व्हिडीओ व्हायरल
एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये दिसत आहे की, एका प्रसिद्ध कन्नड अभिनेत्याला (Kannada Actor) त्याच्या चाहत्यानं भर कार्यक्रमात चक्क चप्पल फेकून मारली.
Fan Throws Slipper At Kannada Actor Darshan: मनोरंजनसृष्टीतील कलाकार हे अनेकवेळा वादाच्या भोवऱ्यात अडकतात. या कलाकारांना त्यांचे चाहते ट्रोल करतात. नुकताच एक व्हिडीओ सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये दिसत आहे की एका प्रसिद्ध कन्नड अभिनेत्याला (Kannada Actor Darshan) त्याच्या चाहत्यानं भर कार्यक्रमात चक्क चप्पल फेकून मारली.
कलाकारांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे अनेकवेळा चाहते त्यांना ट्रोल करतात. कन्नड चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेता दर्शन (Darshan) हा देखील गेल्या काही दिवसांपासून त्याच्या वक्तव्यामुळे चर्चेत आहे. सध्या दर्शन हा त्याच्या क्रांती (Kranti) या आगामी चित्रपटाचे प्रमोशन करत आहे. दर्शननं प्रमोशनसाठी काही दिवसांपूर्वी एका कार्यक्रमात हजेरी लावली. यावेळी या कार्यक्रमात एका चाहत्यानं त्याचा चप्पल फेकून मारली.
व्हायरल व्हिडीओमध्ये दिसत आहे की, अभिनेत्री रचिता राम कार्यक्रमात आलेल्या प्रेक्षकांसोबत संवाद साधत आहे. तेवढ्यातच प्रेक्षकांमधील एक चाहता दर्शनला चप्पल फेकून मारतो. ही चप्पल दर्शनच्या खांद्याला लागते. सध्या दर्शनचे चाहते चप्पल फेकून मारणाऱ्या व्यक्तीला अटक करण्याची मागणी करत आहेत.
पाहा व्हिडीओ
ಇದು ದೊಡ್ಮನೇ ಅವರ ಸಣ್ಣತನಕ್ಕೇ ಹಿಡಿದ ಕನ್ನಡಿ#LearnToFightAlone #Kranti #KrantiOnJan26 #ಕ್ರಾಂತಿ #Darshan #d55 #ChallengingStarDarshan #DBoss@dasadarshan pic.twitter.com/Cy8JPTHR13
— DBOSS_ROARERS (@dboss_roarers) December 19, 2022
'लेडी लक' बाबत केलेल्या वक्तव्यामुळे दर्शन हा चर्चेत होता .एका मुलाखतीमध्ये दर्शननं भाग्य देवीबद्दल एक वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. त्याच्या वक्तव्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता.
No filter pic.twitter.com/tliTlJ87Or
— ಟ್ರೋಲ್ ಹೈಕ್ಳು (@TrollHaiklu) December 8, 2022
त्याचा क्रांती हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. वी हरिकृष्णा यांनी क्रांती या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे. क्रांती हा चित्रपट 26 जानेवारीला रिलीज होणार आहे. चित्ररपटात दर्शन आणि रचिता राम यांच्यासोबतच रविचंद्रन आणि सुमलता हे कलाकार देखील प्रमुख भूमिका साकारणार आहेत. या चित्रपटातील बॉम्बे बॉम्बे आणि धरणी ही गाणी प्रेक्षकांच्या भेटीस आली.
वाचा इतर महत्वाच्या बातम्या: