Ayesha Jhulka Interview : आयशा झुल्कानं सांगितलं आई न होण्याचं कारण; म्हणाली, 'मी माझ्या आयुष्यात अनेक चढ-उतार...'
अभिनेत्री आयशा झुल्काचा (Ayesha Jhulka) चाहता वर्ग मोठा आहे. एका मुलाखतीमध्ये आयशानं तिच्या वैयक्तिक आयुष्याबाबत सांगितलं.
Ayesha Jhulka Interview : बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता आमिर खानच्या (Aamir Khan) जो जीता वही सिकंदर (Jo Jeeta Wohi Sikandar) या चित्रपटामुळे अभिनेत्री आयशा झुल्काला (Ayesha Jhulka) विशेष लोकप्रियता मिळाली. आयशाचा चाहता वर्ग मोठा आहे. सध्या आयशा ही हश हश (Hush Hush) या वेब सीरिजमुळे चर्चेत आहे. एका मुलाखतीमध्ये आयशानं तिच्या वैयक्तिक आयुष्याबाबत सांगितलं.
काय म्हणाली आयशा?
ईटाइम्सला दिलेल्या मुलाखतीमध्ये आयशानं तिच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल सांगितलं. ती म्हणाली, ' मी लग्न न करण्याचा निर्णय घेतला होता. कारण मला वाटत होते की मी लग्न केले नाही तर मी काहीही करू शकते. यानंतर मी समीरला माझ्या आई आणि बहिणीसह भेटले. त्याला वाटले की तो माझ्यासाठी योग्य असेल आणि त्यानंतर आम्ही लग्न करण्याचा निर्णय घेतला.'
मुलं नं होऊ द्यायच्या निर्णयाबाबत आयशा म्हणाली, 'मी माझ्या आयुष्यात अनेक चढ-उतार पाहिले आहेत. त्यानंतर मी आई न होण्याचा निर्णय घेतला आणि या विचारात माझ्या पतीने मला पूर्ण साथ दिली. मात्र, समीर आणि मी गुजरातमधील दोन गावे दत्तक घेतली असून तेथील 160 मुलांच्या शिक्षणाची आणि जेवणाची पूर्ण काळजी घेतो आणि त्यातच मला तो आनंद मिळतो.'
आयशा झुल्कानं तिच्या ओटीटीवर एन्ट्रीबाबत सांगितलं, 'मला नेहमीच वाटत होतं की एक अभिनेत्री म्हणून माझी सर्व कला पूर्णपणे बाहेर आली नाही. आजच्या काळात सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जुन्या काळी नृत्य आणि सौंदर्य. सध्या दिसण्यापेक्षा कामाकडे जास्त लक्ष दिलं जातं.'
View this post on Instagram
कुर्बान, जो जीता वही सिकंदर, खिलाडी, मेहेरबान, दलाल, बलमा, वक्त हमारा है, रंग, संग्राम, जय किशन , आणि मासूम यांसारख्या चित्रपटामध्ये आयशानं काम केलं आहे.
वाचा इतर महत्वाच्या बातम्या: