एक्स्प्लोर

भारताची Delhi Crime आंतरराष्ट्रीय एमी पुरस्कारांमध्ये सर्वोत्कृष्ट वेबसीरिज!

'दिल्ली क्राईम' या वेबसीरिजला आंतरराष्ट्रीय एमी पुरस्कार 2020 मध्ये सर्वोत्कृष्ट ड्रामासाठी सन्मानित करण्यात आलं आहे. एमी अवॉर्ड मिळवणारी 'दिल्ली क्राईम' ही भारताची पहिलीच वेबसीरिज आहे.

मुंबई : नेटफ्लिक्सची वेबसीरिज 'दिल्ली क्राईम'ला आंतरराष्ट्रीय एमी पुरस्कार 2020 मध्ये सर्वोत्कृष्ट ड्रामा सीरिजसाठी सन्मानित करण्यात आलं आहे. बेस्ट ड्रामा सीरिजच्या श्रेणीत भारताच्या 'दिल्ली क्राईम'सह अर्जेंटिना, जर्मनी, यूके आणि अनेक आंतरराष्ट्रीय ड्रामांचा समावेश होता. यंदा कोरोना महामारीमुळे 48 वा आंतरराष्ट्रीय एमी पुरस्कार सोहळा व्हर्चुअली आयोजित करण्यात आला होता. एमी अवॉर्ड मिळवणारी 'दिल्ली क्राईम' ही भारताची पहिलीच वेबसीरिज आहे.

'दिल्ली क्राईम' ही वेबसीरिज 2012 मधील दिल्लीच्या निर्भया प्रकरणावर आधारित होता. या प्रकरणाने संपूर्ण देश हादरुन गेला होता. दिल्लीमध्ये झालेल्या या सामूहिक बलात्कार आणि हत्या प्रकरणावर वेब सीरिज बनली होती, जी प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली.

दिल्ली पोलिसांनी ज्या तत्परतेने या प्रकरणाचा तपास केला आणि काही तासातच मुख्य आरोपींच्या मुसक्या आवळल्या हे या वेब सीरिजमध्ये दाखवण्यात आलं आहे. सोबतच या तपासात पोलिसांना आलेल्या अडचणीही मांडण्यात आल्या आहेत.

सात एपिसोडच्या या वेब सीरिजमध्ये शेफाली शाह यांनी पोलीस उपायुक्त वर्तिका चतुर्वेदी ही प्रमुख भूमिका साकारली होती. या सोबतच राजेश तेलंग, आदिल हुसैन, रसिका दुग्गल, गोपाल दत्त तिवारी, जया भट्टाचार्य, अभिलाषा सिंह, विनोद शारावत, मृदुल शर्मा, अनुराग अरोरा, सिद्धार्थ भारद्वाज या कलाकारांचा समावेश आहे. ऋषी मेहता या वेबसीरिजचे लेखक-दिग्दर्शक आहेत.

आंतरराष्ट्रीय एमी अवॉर्डमध्ये भारतासाठी हे मोठं यश आहे. याआधी 2019 मध्ये सर्वोत्कृष्ट ड्रामा सीरिजसाठी 'सेक्रेड गेम्स सीझन वन'सह चार मोठ्या सीरिजना नामांकन मिळालं होतं, परंतु कोणालाही पुरस्कार मिळालेला नव्हता.

16 डिसेंबर 2012 रोजी घडलेल्या निर्भया प्रकरणारने दिल्लीसह संपूर्ण देश हादरला होता. दिल्ली क्राईम नावाने बनलेल्या या वेब सीरिजमध्ये निर्भया केसचाही उल्लेख आहे. या प्रकरणाचा तपास माजी पोलीस उपायुक्त (दक्षिण दिल्ली) छाया शर्मा करत होत्या.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Prakash Ambedkar : विधानसभा निकालापूर्वी प्रकाश आंबेडकरांचं मोठं वक्तव्य; पॉलिटिकल स्टँड क्लिअर करुन टाकला, म्हणाले...
विधानसभा निकालापूर्वी प्रकाश आंबेडकरांचं मोठं वक्तव्य; पॉलिटिकल स्टँड क्लिअर करुन टाकला, म्हणाले...
वर्ध्यात 2019 च्या तुलनेत मतदानात सात टक्क्यांनी वाढ, जनतेचा कौल महायुती की मविआला? चर्चांना उधाण
वर्ध्यात 2019 च्या तुलनेत मतदानात सात टक्क्यांनी वाढ, जनतेचा कौल महायुती की मविआला? चर्चांना उधाण
मोठी बातमी! चिपळूमध्ये स्ट्राँग रुमच्या परिसरात तीन संशयित, भर रात्री अजितदादांच्या हजारो कार्यकर्त्यांची गर्दी
मोठी बातमी! चिपळूमध्ये स्ट्राँग रुमच्या परिसरात तीन संशयित, भर रात्री अजितदादांच्या हजारो कार्यकर्त्यांची गर्दी
Health: शाकाहारी की मांसाहारी? आरोग्यासाठी कोणता आहार उत्तम आहे? तज्ज्ञ काय म्हणतात? जाणून घ्या
Health: शाकाहारी की मांसाहारी? आरोग्यासाठी कोणता आहार उत्तम आहे? तज्ज्ञ काय म्हणतात? जाणून घ्या
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Rajkiya Sholay : एक्झिट पोल आऊट, मुख्यमंत्रिपदावरुन रस्सीखेच? जनतेची पसंती नेत्यांची कुस्तीSpecial Report Maharashtra Politics : मुख्यमंत्रीपदावरुन रस्सीखेच, मविआत वादाची ठिणगीSpecial Report Gautam Adani : अदानींच्या शेअर्समध्ये 20 टक्क्यांची घसरण, वाद काय?Maharashtra Assembly Election Poll : मतदानाचा टक्का वाढला, कोणाचा विजय पक्का

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Prakash Ambedkar : विधानसभा निकालापूर्वी प्रकाश आंबेडकरांचं मोठं वक्तव्य; पॉलिटिकल स्टँड क्लिअर करुन टाकला, म्हणाले...
विधानसभा निकालापूर्वी प्रकाश आंबेडकरांचं मोठं वक्तव्य; पॉलिटिकल स्टँड क्लिअर करुन टाकला, म्हणाले...
वर्ध्यात 2019 च्या तुलनेत मतदानात सात टक्क्यांनी वाढ, जनतेचा कौल महायुती की मविआला? चर्चांना उधाण
वर्ध्यात 2019 च्या तुलनेत मतदानात सात टक्क्यांनी वाढ, जनतेचा कौल महायुती की मविआला? चर्चांना उधाण
मोठी बातमी! चिपळूमध्ये स्ट्राँग रुमच्या परिसरात तीन संशयित, भर रात्री अजितदादांच्या हजारो कार्यकर्त्यांची गर्दी
मोठी बातमी! चिपळूमध्ये स्ट्राँग रुमच्या परिसरात तीन संशयित, भर रात्री अजितदादांच्या हजारो कार्यकर्त्यांची गर्दी
Health: शाकाहारी की मांसाहारी? आरोग्यासाठी कोणता आहार उत्तम आहे? तज्ज्ञ काय म्हणतात? जाणून घ्या
Health: शाकाहारी की मांसाहारी? आरोग्यासाठी कोणता आहार उत्तम आहे? तज्ज्ञ काय म्हणतात? जाणून घ्या
ब्रेकअप झाल्यामुळे पुरुषावर बलात्काराचा गुन्हा दाखल होऊ शकत नाही, सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय
ब्रेकअपमुळे पुरुषावर बलात्काराचा गुन्हा दाखल होऊ शकत नाही, सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय
Election Voting: राज्यात सर्वाधिक मतदान कोल्हापूर जिल्ह्यातील 'या' मतदारसंघात, तर सर्वात कमी कुठे?
राज्यात सर्वाधिक मतदान कोल्हापूर जिल्ह्यातील 'या' मतदारसंघात, तर सर्वात कमी कुठे?
राज ठाकरे मुख्यमंत्री होणार? सर्वेक्षण काय सांगतं, मतदारराजा कुणाच्या हाती सत्तेची चावी देणार?
राज ठाकरे मुख्यमंत्री होणार? सर्वेक्षण काय सांगतं, मतदारराजा कुणाच्या हाती सत्तेची चावी देणार?
Maharashtra Vidhan Sabha Exit Poll 2024: महाड, कागल आणि वर्सोव्यात धक्कादायक निकालाची शक्यता, राज्यातील या 32 उमेदवारांचा विजय पक्का, प्रजातंत्रचा एक्झिट पोल
महाड, कागल आणि वर्सोव्यात धक्कादायक निकाल? राज्यातील 'या' 32 उमेदवारांचा विजय पक्का, प्रजातंत्रचा एक्झिट पोल
Embed widget