(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Sharad Ponkshe: 'ए मुर्खा... हिंमत असेल तर इथे ये', शरद पोंक्षेंचा नाव न घेता राहुल गांधींवर हल्लाबोल; शेअर केला व्हिडीओ
अभिनेते शरद पोंक्षे (Sharad Ponkshe) यांनी एक व्हिडीओ सोशल मीडियात शेअर केला आहे. या व्हिडीओच्या माध्यमातून शरद पोंक्षे यांनी राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्यावर नाव न घेता हल्लाबोल केला आहे.
Sharad Ponkshe: स्वातंत्र्यवीर सावरकरांबाबत राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी केलेल्या वक्तव्यानंतर वाद निर्माण झाला. तसेच महाराष्ट्रातलं राजकीय वातावरणही तापलं. आंदोलनं झाली आणि आरोप-प्रत्यारोपही झाले. या सगळ्या वादानंतर अभिनेते शरद पोंक्षे (Sharad Ponkshe) यांनी एक व्हिडीओ सोशल मीडियात शेअर केला आहे. अंदमानातील सेल्युलर जेलमधील व्हिडीओ शेअर करुन शरद पोंक्षे यांनी सावरकरांच्या टीकाकारांना आव्हान दिलंय. या व्हिडीओच्या माध्यमातून शरद पोंक्षे यांनी राहुल गांधी यांच्यावर नाव न घेता हल्लाबोल केला आहे.
काय म्हणाले शरद पोंक्षे?
व्हिडीओमध्ये दिसत आहे की शरद पोंक्षे म्हणतात, 'ए मुर्खा इकडे ये. मुर्खा सारखा फिरत असतो ते फिरु नको. हिंमत असेल तर इथे ये. हे सेल्युलर जेल आहे. ही सात बाय आकराची कोठडी आहे. याची जमीन बघ. याचं जमीनवर सावरकर झोपत होतो. याचं कोठडीमध्ये ते अकरा वर्ष राहिले. त्यांच्या गळ्यामध्ये डी असं लिहिलेली पाटी होती. त्याचा अर्थ व्हेरी डेंजरस असा होतो. इतर कोणत्याही कैद्याच्या गळ्यात हा डी नव्हता. अकरा वर्ष सोड एक वर्षही सोड फक्त एक दिवस राहून दाखव. मग बडबड कर.' शरद पोंक्षे यांच्या या व्हिडीओनं अनेकांचे लक्ष वेधलं आहे.
पाहा व्हिडीओ
View this post on Instagram
शरद पोंक्षे यांनी शेअर केलेल्या व्हिडीओला अनेक नेटकऱ्यांनी लाइक्स आणि कमेंट्स केल्या आहेत. शरद पोंक्षे यांनी ‘ठिपक्यांची रांगोळी’, ‘उंच माझा झोका’, ‘असे हे कन्यादान’, ‘राधा ही बावरी’ अशा अनेक मालिकांमधून महत्वाच्या भूमिका साकारल्या आहेत. तसेच, 'मी नथुराम गोडसे बोलतोय' या नाटकातील त्यांची नथुरामची भूमिकाही प्रचंड गाजली होती. शरद पोंक्षे यांना अनेक पुरस्कारांनीही गौरविण्यात आले आहे. त्यांचं दुसरे वादळ हे पुस्तक प्रकाशित झालेलं आहे.
वाचा इतर महत्वाच्या बातम्या:
Sharad Ponkshe : आपल्याला बाजीराव माहितेय तो फक्त मस्तानीवर प्रेम करणारा हेच दुर्देव : शरद पोंक्षे