Shah Rukh Khan: "भावा माझ्याकडे पैसे नाहीयेत"; नेटकऱ्याच्या प्रश्नाला शाहरुख खाननं दिलेल्या उत्तरानं वेधलं लक्ष
Shah Rukh Khan: नुकतेच शाहरुखनं ट्विटरवर AskSRK हे सेशन होस्ट केले. या सेशनमध्ये चाहत्यांनी विचारलेल्या प्रश्नांना त्यानं उत्तरं दिली आहे.
Shah Rukh Khan: अभिनेता शाहरुख खान (Shah Rukh Khan) हा सध्या त्याच्या डंकी (Dunki) या आगामी चित्रपटामुळे चर्चेत आहे. पठाण आणि जवान या बॅक टू बॅक हिट चित्रपटानंतर आता शाहरुखचा डंकी हा चित्रपट प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी सज्ज झाला आहे.शाहरुख हा अनेकदा सोशल मीडियावर AskSRK सेशन होस्ट करतो आणि चाहत्यांनी विचारलेल्या प्रश्नांना मजेशीर उत्तरे देतो. नुकतेच शाहरुखनं ट्विटरवर AskSRK हे सेशन होस्ट केले. या सेशनमध्ये चाहत्यांनी विचारलेल्या प्रश्नांना त्यानं उत्तरं दिली आहे.
मी राजकुमार हिरानी यांच्या घरासमोर तंबू ठोकला: शाहरुख खान
राजकुमार हिरानी यांनी डंकी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे. या चित्रपटाबद्दल एका नेटकऱ्यानं प्रश्न विचारला, "यावेळी राजकुमार हिरानी सरांनी चित्रपटासाठी तुझ्याशी संपर्क साधला की तू हिरानी सरांशी संपर्क साधला?" या प्रश्नाचं शाहरुखनं उत्तर दिलं, "मी राजकुमार हिरानी यांच्या घरासमोर तंबू ठोकला होता. तिथेच मी चित्रपटाची गोष्ट ऐकली आणि तिथेच चित्रपट साइन केला. आता तिथेच एडिटिंग चालू आहे!!!"
Maine @RajkumarHirani ke ghar ke aage tent laga liya tha. Wahin kahaani bhi suni aur wahin sign bhi kar li. Editing bhi wahin chal rahi hai!!! #Dunki https://t.co/UXU9BoxlgE
— Shah Rukh Khan (@iamsrk) November 22, 2023
शाहरुख म्हणतो, "माझ्याकडे मोटरसायकल नाहीये"
एका नेटकऱ्यानं ट्विटरवर एक फोटो शेअर केला. या फोटोमध्ये टॉम क्रूझ हा स्टंट करताना दिसत आहे. हा फोटो शेअर करुन त्या नेटकऱ्यानं शाहरुखला प्रश्न विचारला, "टॉम क्रूझने मिशन: इम्पॉसिबलमध्ये जे केलं होतं तसं काही करण्याचा तुम्ही कधी विचार केला आहे का?" या प्रश्नाचं शाहरुखनं उत्तर दिलं, "माझ्याकडे मोटरसायकल नाहीये यार"
Mere paas motorcycle nahi hai yaar!!! #Dunki https://t.co/pr0Y4vaGmr
— Shah Rukh Khan (@iamsrk) November 22, 2023
"सर, तुम्हाला व्हिसा कधी मिळेल? जर मिळाला नाही तर मला सांगा कारण माझी व्हिसा कंपनी आहे. मी तुम्हाला व्हिसा मिळवून देईल!!" असा प्रश्न एका नेटकऱ्यानं विचारला. या प्रश्नाचं शाहरुखनं उत्तर दिलं, "भावा माझ्याकडे पैसे नाहीयेत. नाही तर आलो असतो."
Bhai paisa nahi hai warna aa jaata….#डंकी https://t.co/4dNvsLw6ef
— Shah Rukh Khan (@iamsrk) November 22, 2023
कधी रिलीज होणार शाहरुखचा डंकी
शाहरुख खानचा 'डंकी' हा चित्रपट 21 डिसेंबरला रिलीज होणार आहे. या चित्रपटात शाहरुखसोबतच विकी कौशल, बोमन ईरानी, तापसी पन्नू या कलाकारांनी देखील प्रमुख भूमिका साकारली आहे.
संबंधित बातम्या:
Shah Rukh Khan : तापसीच्या प्रेमात 'लुट पूट' झालाय शाहरुख खान! 'डंकी' सिनेमातील पहिलं गाणं आऊट