एक्स्प्लोर

Shah Rukh Khan: "नर्मदाची कथा अप्रतिम पण दुर्दैवाने..." ; नयनताराच्या 'जवान' मधील स्क्रिन टाईमबाबत काय म्हणाला शाहरुख?

Shah Rukh Khan: नेटकऱ्यानं केलेल्या ट्वीटला रिप्लाय देऊन शाहरुखनं जवान चित्रपटामधील नयनताराच्या स्क्रिन टाईमबाबत सांगितलं आहे.

Shah Rukh Khan: अभिनेता शाहरुख खान (Shah Rukh Khan) हा सध्या जवान (Jawan) या चित्रपटामुळे चर्चेत आहे. शाहरुख गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांच्या प्रश्नांची उत्तरे देत आहे. नुकतेच एका नेटकऱ्यानं जवान चित्रपटामध्ये दाखवण्यात आलेल्या सिंगल मॉमच्या कथेबाबक ट्वीट केलं. या ट्वीटला रिप्लाय देऊन शाहरुखनं जवान चित्रपटामधील नयनताराच्या स्क्रिन टाईमबाबत सांगितलं आहे.

अॅटलीच्या 'जवान' चित्रपटामधील नर्मदा या भूमिकेचा स्क्रीन टाईम कट केला गेल्याने नयनतारा नाराज आहे, अशी चर्चा गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर होत आहे. अशातच शाहरुखनं एका ट्वीटच्या माध्यमातून नर्मदा या भूमिकेबाबत भाष्य केलं आहे.

एका नेटकऱ्यानं ट्वीटमध्ये लिहिलं, "मला आझादचा सुजीसोबतचा बाँड खूप आवडला. सिंगल मॉमची कथा अतिशय बारकाईने दाखवण्यात होती. सर्व स्तरातील महिलांचे प्रतिनिधित्व केल्याबद्दल धन्यवाद." नेटकऱ्याच्या या ट्वीटला शाहरुखनं रिप्लाय दिला आहे.

शाहरुखचं ट्वीट

नेटकऱ्याच्या  ट्वीटला शाहरुखनं रिप्लाय दिला, "सिंगल मदर म्हणून नर्मदाची कथा अप्रतिम आहे, असे मलाही वाटले. दुर्दैवाने गोष्टीच्या गरजेमुळे तिला अधिक स्क्रीन टाईम मिळू शकला नाही. परंतु जो होता तो अद्भुत होता." शाहरुखच्या या रिप्लायनं अनेकांचे लक्ष वेधले आहे.

शाहरुख खान आणि नयनतारा यांच्या केमिस्ट्रीला मिळाली प्रेक्षकांची पसंती

जवान या चित्रपटामधील शाहरुख खान आणि नयनतारा यांच्या केमिस्ट्रीला प्रेक्षकांची पसंती मिळाली. या चित्रपटामधील चलेया या गाण्यामधील शाहरुख खान आणि नयनतारा  यांचा रोमाँटिक अंदाज देखील प्रेक्षकांना आवडला.

‘जवान’ चित्रपटाची स्टार कास्ट

‘जवान’ हा 7 सप्टेंबर रोजी चित्रपट हिंदी, तमिळ आणि तेलगू भाषेत चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला. या चित्रपटात शाहरुख खान व्यतिरिक्त नयनतारा विजय सेतुपती, संजीता भट्टाचार्य, सान्या मल्होत्रा, प्रियामणी, गिरिजा ओक आणि आलिया कुरेशी रिद्धी डोगरा, सुनील ग्रोवर, मुकेश छाबरा, योगी बाबू आणि एजाज खान  या कलाकारांनी प्रमुख भूमिका साकारली आहे. जवानमधील गाण्यांना देखील प्रेक्षकांची पसंती मिळाली आहे.

संबंधित बातम्या:

Atlee Kumar : ज्याला रंगावरून लोकांनी हिणवलं... त्यानेच बॉक्स ऑफिस गाजवलं; जाणून घ्या 'जवान'चा दिग्दर्शक ॲटली कुमारबद्दल...

महत्त्वाच्या बातम्या

Gautami Patil About Team: 'लफडं तर कुणीच..' गौतमी पाटीलच्या ग्रुपचे कडक नियम, ग्रुपमध्ये काम करण्यासाठी काय आहे अट?
'लफडं तर कुणीच..' गौतमी पाटीलच्या ग्रुपचे कडक नियम, ग्रुपमध्ये काम करण्यासाठी काय आहे अट?
Suniel Shetty on Granddaughter: 'साईबाबांच्या पोथीत पंतप्रधान मोदीजींचा फोटो, रोज पूजा अन् लाडू...'; सुनील शेट्टींचा 15 महिन्यांच्या नातीबद्दल भावनिक खुलासा
'साईबाबांच्या पोथीत पंतप्रधान मोदीजींचा फोटो, रोज पूजा अन् लाडू...'; सुनील शेट्टींचा 15 महिन्यांच्या नातीबद्दल भावनिक खुलासा
Eetha Shraddha Kapoor: हजारो रसिकांना वेड लावणाऱ्या विठाबाई नारायणगावकरांचा वेदनादायी शेवट; हॉस्पिटलचं बिल भरण्यासाठीही नव्हते पैसे
हजारो रसिकांना वेड लावणाऱ्या विठाबाई नारायणगावकरांचा वेदनादायी शेवट; हॉस्पिटलचं बिल भरण्यासाठीही नव्हते पैसे
John Abraham: बॉलिवूड स्टार जॉन अब्राहमची क्रिकेटमध्ये एन्ट्री! 'या' टीमचा झाला मालक, कोणत्या लीगमध्ये खरेदी केली टीम?
बॉलिवूड स्टार जॉन अब्राहमची क्रिकेटमध्ये एन्ट्री! 'या' टीमचा झाला मालक, कोणत्या लीगमध्ये खरेदी केली टीम?

व्हिडीओ

Uddhav Thackeray Full Speech Yavatmal : आईची शपथ घेऊन गद्दारी केली, भरसभेत दाखवला फुटीर खासदाराचा 'तो' जुना व्हिडिओ
Ketan Agarwal Case Lohagad : पहिली पायरी ते मृत्यूची दरी; कसा केला घात? Special Report
Zero Hour : प्रेयसी ठरली भावी पतीची मारेकरी, झीरो अवरमध्ये सविस्तर चर्चा
Ram Temple Donation Row Theft : रामलल्लाचे गुन्हेगार, ८ जण गजाआड Special Report
Medha Kulkarni vs Abhimanyu Pawar Pune : जागेवरून वादंग जातीय रंग! Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Shashi Tharoor on Passport: पासपोर्टवर सरकारचा निर्णय हास्यास्पद, जनतेमध्ये संभ्रम होतोय, पासपोर्ट आणि आधार कार्ड नागरिकत्वाचा पुरावा मानले पाहिजेत; शशी थरुरांनी फटकारलं
पासपोर्टवर सरकारचा निर्णय हास्यास्पद, जनतेमध्ये संभ्रम होतोय, पासपोर्ट आणि आधार कार्ड नागरिकत्वाचा पुरावा मानले पाहिजेत; शशी थरुरांनी फटकारलं
TET Paper Leak: आरोपी दिल्लीतून आले, इतक्या कोटींचा सौदा? TET पेपर फुटीप्रकरणी पोलिसांकडून खळबळजनक माहिती
Video: आरोपी दिल्लीतून आले, इतक्या कोटींचा सौदा? TET पेपर फुटीप्रकरणी पोलिसांकडून खळबळजनक माहिती
IPS विश्वास नांगरे पाटलांचा प्रश्न; जितेंद्र आव्हाडांचं एका वाक्यात खोचक उत्तर, संघाच्या कार्यक्रमातील सहभागावरुन टीका
IPS विश्वास नांगरे पाटलांचा प्रश्न; जितेंद्र आव्हाडांचं एका वाक्यात खोचक उत्तर, संघाच्या कार्यक्रमातील सहभागावरुन टीका
TET Paper Leak: मोठी बातमी! TET पेपरफुटीप्रकरणात तिघांना अटक, एअरपोर्ट परिसरातून पोलिसांनी उचललं, तपास सुरू
मोठी बातमी! TET पेपरफुटीप्रकरणात तिघांना अटक, एअरपोर्ट परिसरातून पोलिसांनी उचललं, तपास सुरू
Rohini Khadse on TET Exam Paper Leak: जे स्वतःच फोडाफोडीत व्यस्त आहेत, ते पेपरफुटी कशी रोखणार?; टीईटी पेपर फुटीनंतर रोहिणी खडसेंचा सरकारवर घणाघात
जे स्वतःच फोडाफोडीत व्यस्त आहेत, ते पेपरफुटी कशी रोखणार?; टीईटी पेपर फुटीनंतर रोहिणी खडसेंचा सरकारवर घणाघात
MAHA TET Peper Leak TET Exam Cancle: टीईटीचा पेपर फुटला, परीक्षा रद्द; पहिले NEET, आता TET, महाराष्ट्र पुन्हा हादरला, भिवंडीत धाड टाकताच पोलिसही चक्रावले!
टीईटीचा पेपर फुटला, परीक्षा रद्द; पहिले NEET, आता TET, महाराष्ट्र पुन्हा हादरला, भिवंडीत धाड टाकताच पोलिसही चक्रावले!
प्रभू श्रीराम भोंदूंच्या गराड्यात सापडले, त्यांच्या सुटकेसाठी शिवसेना 'भाजप मुक्त राम' मोहीम हाती हाती घेईल, त्याची पहिली ठिणगी आंदोलनाच्या रुपात महाराष्ट्रात पडेल; उद्धव ठाकरेंचा एल्गार
प्रभू श्रीराम भोंदूंच्या गराड्यात सापडले, त्यांच्या सुटकेसाठी शिवसेना 'भाजप मुक्त राम' मोहीम हाती हाती घेईल, त्याची पहिली ठिणगी आंदोलनाच्या रुपात महाराष्ट्रात पडेल; उद्धव ठाकरेंचा एल्गार
Eknath Shinde: उद्धव ठाकरेंनी जाहीर सभांमधून शड्डू ठोकला; एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले, कपटी मित्र किती..
उद्धव ठाकरेंनी जाहीर सभांमधून शड्डू ठोकला; एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले, कपटी मित्र किती..
Embed widget