Shah Rukh Khan : शाहरुख खानने चुकून सांगितलं आगामी चित्रपटाचं नाव; सोशल मीडियावर चर्चांना उधाण
Shah Rukh Khan Next Movie : शाहरुख खान लवकरच रुपेरी पडद्यावर कमबॅक करणार आहे. अशातच आता किंग खानच्या (King Khan) आगामी चित्रपटाचं नाव लीक झालं आहे.
Shah Rukh Khan : बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खान (Shah Rukh Khan) नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असतो. आर्यन खान प्रकरणानंतर शाहरुखने 2023 हे वर्ष चांगलच गाजवलं. 'पठाण' (Pathaan), 'जवान' (Jawan) आणि 'डंकी' (Dunki) हे त्याचे चित्रपट रिलीज झाले. या तिन्ही चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर (Box Office) धमाकेदार कमाई केली. पण काही दिवसांपासून किंग खान (King Khan) रुपेरी पडद्यापासून दूर आहे. मीडिया रिपोर्टनुसार, किंग खान लवकरच धमाका करण्यासाठी सज्ज आहे. शाहरुख खानच्या आगामी चित्रपटाचं नाव (Shah Rukh Khan Upcoming Movie) आता समोर आलं आहे. एसआरकेने चुकून आपल्या आगामी चित्रपटाचं नाव लीक केलं आहे.
शाहरुख खानचा आगामी चित्रपट कोणता? (Shah Rukh Khan Next Movie)
शाहरुख खानचा एक व्हिडीओ समोर आला आहे. किंग खानचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. समोर आलेल्या व्हिडीओमध्ये शाहरुख खान 'कान्स फिल्म फेस्टिव्हल 2024'मध्ये (Cannes Film Festival 2024) प्रतिष्ठित पियरे एंजिनीक्स एक्सेल लेंस पुरस्कार पटकावणाऱ्या सिनेमेट्रोग्राफर संतोष सिवन यांना शुभेच्छा देताना दिसत आहेत. पण यावेळी फ्रेममध्ये दिसणाऱ्या एका संहितेवर चाहत्यांचं लक्ष गेलं आहे. या संहितेच्या टायटलवर 'किंग' (King) असे लिहिलेले दिसत आहे. त्यामुळे शाहरुख खान लवकरच 'किंग' या चित्रपटात झळकणार हे स्पष्ट होत आहे. रिपोर्टनुसार, शाहरुखची लाडकी लेक सुहाना खानदेखील (Suhana Khan) या चित्रपटात झळकणार आहे.
Letest Megastar @iamsrk sitting with the script of #King! A 2025 release where SRK plays an underworld don💥💥⚡️#ShahRukhKhan#King pic.twitter.com/zAyHsySUNr
— 𓀠Srkian_امرین (@Amreen_Srkian) May 28, 2024
शाहरुख खान होता रुग्णालयात दाखल
उष्माघाताचा त्रास झाल्याने शाहरुख खानला काही दिवसांपूर्वी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. शाहरुख 'कोलकाता नाईट रायडर्स'चा सामना पाहायला गेला होता. त्यावेळी त्याला उष्माघाताचा त्रास झाल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले. पण आता मात्र त्याची प्रकृती स्थिर आहे. शाहरुखच्या 'कोलकाता नाइट रायडर्स' या टीमने 'आयपीएल 2024'च्या ट्रॉफीवर आपलं नाव कोरलं आहे. शाहरुखच्या आगामी चित्रपटांची चाहत्यांना आता उत्सुकता आहे. बॉलिवूडचा भाईजान सलमान खानच्या (Salman Khan) 'टायगर 3' (Tiger 3) या चित्रपटातही SRK झळकणार आहे.
संबंधित बातम्या