एक्स्प्लोर

निवडणुकीत वादग्रस्त ठरलेल्या बीडच्या जिल्हाधिकारी दीपा मुधोळ-मुंडेंची बदली; 'हे' आहेत नवे कलेक्टर

लोकसभा निवडणूक दरम्यान बीडच्या तत्कालीन जिल्हाधिकारी दीपा मुधोळ मुंडे यांच्यावर राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाने अनेक आरोप केले होते.

बीड : राज्यातील लक्षवेधी आणि अत्यंत चुरशीच्या ठरलेल्या लढतींमध्ये बीड लोकसभा (Beed) मतदारसंघाची लढत झाली. महाविकास आघाडीचे उमेदवार बजरंग सोनवणे विरुद्ध महायुतीच्या पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांच्यात थेट सामना रंगला होता. सुरुवातीला सहजसोपी वाटत असलेली बीडची निवडणूक अत्यंत रंगतदार झाली. मात्र, निवडणूक प्रचारात बीड मतदारसंघात जातीय तेढ पाहायला मिळाले. मराठा आरक्षणासाठी लढा देणारे उपोषणकर्ते मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाचं केंद्रस्थानच बीड जिल्हा बनलं होतं. त्यामुळे, बीडमध्ये मराठा विरुद्ध वंजारी असा जातीय संघर्ष दिसून आलं. या वादामुळे येथील निवडणूक जशी गाजली, तशीच मतदान केंद्रावरील बोगस मतदान आणि प्रशासनातील अधिकाऱ्यांच्या हस्तक्षेपाच्या आरोपामुळेही बीडची निवडणूक चर्चेत होती. आता, निवडणूक निकालानंतर महिनाभरातच बीडच्या जिल्हाधिकाऱ्यांची बदली (Transfer) करण्यात आली आहे.  

लोकसभा निवडणूक दरम्यान बीडच्या तत्कालीन जिल्हाधिकारी दीपा मुधोळ मुंडे यांच्यावर राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाने अनेक आरोप केले होते. त्यामुळे, त्या चांगल्याच वादग्रस्त ठरल्या, महाविकास आघाडीचे उमेदवार बजरंग सोनवणे यांनी निवडणूक आयोगाला पत्र लिहून थेट तहसिलदार आणि जिल्हाधिकारी यांना मतमोजणीवेळी सहभागी न होऊ देण्याचीही मागणी केली होती. त्यामुळे, बीडच्या लोकसभा निवडणुकीत जिल्हाधिकारी दीपा मुधोळ-मुंडे वादग्रस्त ठरल्या. अखेर दीपा मुधोळ मुंडे यांची बीड जिल्हाधिकारी पदावरुन बदली झाली आहे. अपर मुख्य सचिव नितीन गद्रे यांच्या सहीने दीपा-मुधोळ मुंडे यांची बदली करण्यात आल्याचं  पत्र पाठवण्यात आलं आहे.

शासनाने आपली बदली केली असून, आपली नियुक्ती, जिल्हाधिकारी, बीड या पदावर श्रीम. दिपा मुधोळ-मुंडे, भाप्रसे यांच्या जागी ते पद वरिष्ठ समय श्रेणीत अवनत करून केली आहे. तरी आपण आपल्या सध्याच्या पदाचा कार्यभार विभागीय आयुक्त, छत्रपती संभाजीनगर विभाग यांच्या सल्ल्याने अन्य अधिकाऱ्याकडे सोपवून, नवीन पदाचा कार्यभार श्रीमती मुधोळ-मुंडे, भाप्रसे यांच्याकडून त्वरीत स्वीकारावा, असे या पत्रात नमूद करण्यात आले आहे. 

बीडच्या जिल्हाधिकारीपदी अविनाश पाठक

बीडच्या जिल्हाधिकारीपदी अविनाश पाठक यांची नियुक्ती करण्यात आली आहे. अविनाश पाठक हे सध्या बीड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून काम पाहत होते, त्यांची या पदावरून आता बीड जिल्हाधिकारी या पदावर बदली करण्यात आली आहे.

हेही वाचा 

पंकजाताईंसाठी 'दादा' समर्थक रस्त्यावर; परळीत सुषमा अंधारेंच्या प्रतिकात्मक पुतळ्याचं दहन, घोषणाबाजी 

NEET पेपरफुटीचं आता धाराशिव कनेक्शन; घराला कुलूप लावून आरोपी बायका-लेकरांसह फरार

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Manoj Jarange : अजित दादा धनंजय मुंडे टोळ्या चालवणारा, उघडा पडला; उपमुख्यमंत्र्यांचं थेट नाव घेत मनोज जरांगेंचा इशारा
अजित दादा धनंजय मुंडे टोळ्या चालवणारा, उघडा पडला; उपमुख्यमंत्र्यांचं थेट नाव घेत मनोज जरांगेंचा इशारा
PM Narendra Modi: पंतप्रधान मोदींचं महायुतीच्या आमदारांना मार्गदर्शन, राज ठाकरेंचा खास उल्लेख; डब्बा पार्टीचा सल्ला
पंतप्रधान मोदींचं महायुतीच्या आमदारांना मार्गदर्शन, राज ठाकरेंचा खास उल्लेख; डब्बा पार्टीचा सल्ला
मोठी बातमी ! कोर्टात SIT चे 7 खळबळजनक दावे; खंडणीला अडथळा ठरल्याने संतोष देशमुखांचा खून, वाल्मिक कराड गोत्यात?
मोठी बातमी ! कोर्टात SIT चे 7 खळबळजनक दावे; खंडणीला अडथळा ठरल्याने संतोष देशमुखांचा खून, वाल्मिक कराड गोत्यात?
Walmik Karad : गोपीनाथ मुंडेंनी 1999 मध्ये आणला मकोका, परळीच्या वाल्मिक कराडलाच बसला ' दे धक्का'
गोपीनाथ मुंडेंनी 1999 मध्ये आणला मकोका, परळीच्या वाल्मिक कराडलाच बसला ' दे धक्का'
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Pankaja Munde on Beed : बीडमधील तणाव कसा कमी होणार? पंकजा मुंडे म्हणाल्या..Walmik Karad Court Case : महाराष्ट्राच्या गृहमंत्र्याला विनंती आहे! दवेंद्र फडणवीस बीड जिल्ह्यात याWalmik Karad Court : वाल्मिक कराडला कोर्टातून बाहेर आणताच काय घडलं? संपूर्ण व्हिडीओ...Walmik Karad Case : खोटे गुन्हे मागे झालेच पाहिजेत! वाल्मिकसाठी वकिलाची घोषणाबाजी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Manoj Jarange : अजित दादा धनंजय मुंडे टोळ्या चालवणारा, उघडा पडला; उपमुख्यमंत्र्यांचं थेट नाव घेत मनोज जरांगेंचा इशारा
अजित दादा धनंजय मुंडे टोळ्या चालवणारा, उघडा पडला; उपमुख्यमंत्र्यांचं थेट नाव घेत मनोज जरांगेंचा इशारा
PM Narendra Modi: पंतप्रधान मोदींचं महायुतीच्या आमदारांना मार्गदर्शन, राज ठाकरेंचा खास उल्लेख; डब्बा पार्टीचा सल्ला
पंतप्रधान मोदींचं महायुतीच्या आमदारांना मार्गदर्शन, राज ठाकरेंचा खास उल्लेख; डब्बा पार्टीचा सल्ला
मोठी बातमी ! कोर्टात SIT चे 7 खळबळजनक दावे; खंडणीला अडथळा ठरल्याने संतोष देशमुखांचा खून, वाल्मिक कराड गोत्यात?
मोठी बातमी ! कोर्टात SIT चे 7 खळबळजनक दावे; खंडणीला अडथळा ठरल्याने संतोष देशमुखांचा खून, वाल्मिक कराड गोत्यात?
Walmik Karad : गोपीनाथ मुंडेंनी 1999 मध्ये आणला मकोका, परळीच्या वाल्मिक कराडलाच बसला ' दे धक्का'
गोपीनाथ मुंडेंनी 1999 मध्ये आणला मकोका, परळीच्या वाल्मिक कराडलाच बसला ' दे धक्का'
वाल्मिक कराडला 7 दिवसांची कोठडी, बीड कोर्टाबाहेर राडा; निदर्शने, घोषणाबाजी, गृहमंत्री जिल्ह्यात या
वाल्मिक कराडला 7 दिवसांची कोठडी, बीड कोर्टाबाहेर राडा; निदर्शने, घोषणाबाजी, गृहमंत्री जिल्ह्यात या
इकडं भारतात असलेल्या माजी पीएम शेख हसीनांवर गुन्ह्यांचा पाऊस, पासपोर्टही रद्द अन् तिकडं खालिदा जियांची शिक्षा माफ झाली!
इकडं भारतात असलेल्या माजी पीएम शेख हसीनांवर गुन्ह्यांचा पाऊस, पासपोर्टही रद्द अन् तिकडं खालिदा जियांची शिक्षा माफ झाली
लय भारी! मुंबईतून धावली देशातील पहिली वंदे भारत स्लीपर ट्रेन; कुल प्रवास, वाऱ्याचा वेग, चाचणी यशस्वी
लय भारी! मुंबईतून धावली देशातील पहिली वंदे भारत स्लीपर ट्रेन; कुल प्रवास, वाऱ्याचा वेग, चाचणी यशस्वी
Ajit Pawar : अजितदादांचे बीडमध्ये एकाच दिवसात दोन निर्णय; धनंजय मुंडे अडचणीत, संतोष देशमुखांच्या तालुक्यात कोणता निर्णय घेतला?
अजितदादांचे बीडमध्ये एकाच दिवसात दोन निर्णय; धनंजय मुंडे अडचणीत, संतोष देशमुखांच्या तालुक्यात कोणता निर्णय घेतला?
Embed widget