Shah Rukh Khan with Suhana Khan : शाहरुख खान पुन्हा 'डॉन'च्या भूमिकेत, लेक सुहानासोबत करणार दोन हात; लेकीच्या करिअरसाठी किंग खान सरसावला
Shah Rukh Khan with Suhana Khan : शाहरुख खानने स्वत: सुहानासोबत चित्रपट करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता शाहरुख आणि सुहाना एकत्रपणे रुपेरी पडद्यावर झळकणार आहे.
![Shah Rukh Khan with Suhana Khan : शाहरुख खान पुन्हा 'डॉन'च्या भूमिकेत, लेक सुहानासोबत करणार दोन हात; लेकीच्या करिअरसाठी किंग खान सरसावला Shah Rukh Khan play to Don in upcoming movie with Suhana Khan in The King Shah Rukh Khan with Suhana Khan : शाहरुख खान पुन्हा 'डॉन'च्या भूमिकेत, लेक सुहानासोबत करणार दोन हात; लेकीच्या करिअरसाठी किंग खान सरसावला](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/04/23/05cfc406e3916c6ec58ea654a55483a21713873055369290_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Shah Rukh Khan with Suhana Khan : बॉलिवूडचा किंग खान शाहरुख खान (Shah Rukh Khan) हा लेक सुहाना खानचे (Suhana Khan) करिअर घडवण्यासाठी प्रयत्न करत आहे. सुहानाची भूमिका असलेला आर्चीज चित्रपटाबद्दल निगेटिव्ह प्रतिक्रिया समोर आल्यानंतर आता शाहरुख खानने स्वत: सुहानासोबत चित्रपट करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता शाहरुख आणि सुहाना एकत्रपणे रुपेरी पडद्यावर झळकणार आहे. शाहरुख खान पुन्हा एकदा 'डॉन'च्या भूमिकेत झळकणार आहे. एका मोठ्या कालावधीनंतर शाहरुख खान खलनायकी भूमिका दिसणार आहे.
ग्रे शेड्स व्यक्तीरेखेत दिसणार किंग खान
शाहरुख खान हा लेक सुहाना सोबतच्या चित्रपटात ग्रे शेड्सच्या भूमिकेत दिसणार आहे. एका वृत्तानुसार, शाहरुख खान हा दिग्दर्शक सिद्धार्थ आनंद आणि सुजॉय घोष सोबत काम करत आहे. आपल्या लेकीसोबत पहिल्यांदाच रुपेरी पडद्यावर झळकताना चित्रपटात कोणतीही कसर शाहरुख सोडत नाही. मुलीच्या सिनेकारकिर्दीच्या सुरुवातीला कोणतेही नुकसान होऊ नये यासाठी शाहरुख खान प्रयत्नशील आहे.
View this post on Instagram
चित्रपटात सुहानासोबत करणार दोन हात...
View this post on Instagram
किंग खान या चित्रपटात शाहरुख खान गुरूच्या भूमिकेत तर सुहाना त्याच्या शिष्याच्या भूमिकेत दिसणार आहे. दोघांमध्ये काही इंटेन्स ॲक्शन सीन्सही दाखवण्यात येणार असल्याची माहिती आहे. शाहरुख खाननेही या चित्रपटासाठी आपला लूक पूर्णपणे बदलला आहे. चित्रपटात शाहरुख हा लाँग हेअरस्टाईल आणि छोट्या दाढीसह दिसणार आहे. ग्रे शेड्स असलेली व्यक्तीरेखा या लूकवर चांगली दिसणार असल्याचे म्हटले जात आहे. हा चित्रपट यावर्षी सप्टेंबरपर्यंत प्रदर्शित होणार असल्याची माहिती आहे.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)