(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Suhana Khan : शाहरुखची लेक सुहाना खान शेती करणार? आलिबागमध्ये खरेदी केली कोट्यवधी किंमतीची जमीन
Suhana Khan : शाहरुख खानची लाडकी लेक सुहाना खान सध्या तिच्या आगामी सिनेमामुळे चर्चेत असून आता तिने आलिबागमध्ये शेती करण्यासाठी कोट्यवधी रुपयांची जमीन खरेदी केली आहे.
Suhana Khan Buys Farm Land In Alibaug : बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खानची (Shah Rukh Khan) लाडकी लेक सुहाना खान (Suhana Khan) सध्या चर्चेत आहे. लवकरच ती जोया अख्तरच्या 'द आर्चीज' या सिनेमात दिसणार आहे. या सिनेमात तिच्यासोबत खुशी कपूर आणि अगस्त्य नंदा मुख्य भूमिकेत झळकणार आहेत. सुहाना खानने या सिनेमाच्या माध्यमातून अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं आहे. पण आता तिने आलिबागमध्ये (Alibaug) शेती करण्यासाठी कोट्यवधी रुपयांची जमीन खरेदी केली आहे.
अभिनय क्षेत्रात काम केल्यानंतर सुहानाला आता शेती करण्याची आवड निर्माण झाली आहे. त्यामुळे आलिबागमधील थाल गावातील जमीन तिने शेती करण्यासाठी विकत घेतली आहे. कोट्यवधी रुपयांमध्ये तिने ही जमीन विकत घेतली आहे. तसेच नोंदणीच्या कागदपत्रांमध्ये तिने स्वत:ला शेतकरी असल्याचं सांगितलं आहे. सुहानाच्या या गोष्टीमुळे तिला नक्की काय काम करायचं आहे याची चाहत्यांना उत्सुकता लागली आहे.
मीडिया रिपोर्टनुसार, सुहाना खानने 1 जून 2023 रोजी दीड एकर जमीन विकत घेतली आहे. जमिनीचा व्यवहार आणि नोंदणीदेखील 1 जून रोजीच झाली होती. या जागेची एकूण किंमत 12.91 कोटी रुपये असल्याचे सांगण्यात येत आहे. या दीड एकर जागेत 2218 चौरस फूट बांधकामही करण्यात आले आहे.
सुहानाने शेती करण्यासाठी जमीन खरेदी करण्यासाठी शाहरुखने आलिबानमध्ये एक आलिशान बंगला विकत घेतला आहे. किंग खानने आलिबागमधील समुद्रकिनारी हा बंगला खरेदी केला आहे. या बंगल्यात स्वीमिंग पूल आणि हेलीपॅडदेखील बनवण्यात आले आहे. अभिनेत्याने त्याचा 52 वा वाढदिवस आलिबागमध्येच साजरा केला होता.
सुहानाच्या 'अ आर्चीज'बद्दल जाणून घ्या... (Suhana Khan The Archies Movie Update)
सुहाना खान सध्या 'अ आर्चीज' (The Archies) या सिनेमामुळे चर्चेत आहे. या सिनेमाच्या माध्यमातून ती मनोरंजनसृष्टीत पदार्पण करत आहे. हा सिनेमा नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे. अद्याप या सिनेमाची रिलीज डेट समोर आलेली नाही. पण नोव्हेंबर 2023 मध्ये हा सिनेमा रिलीज होऊ शकतो, अशी शक्यता वर्तवली जात आहे. या सिनेमात सुहाना खान, अगस्त्य नंदा आणि खुशी कपूरहे स्टार किड्सदेखील झळकणार आहेत. या सिनेमाचा टीझर नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या सिनेमाची चाहत्यांना उत्सुकता आहे.
संबंधित बातम्या