एक्स्प्लोर
Advertisement
शेतकरी असल्याचं सांगून शाहरुख-गौरीकडून फसवणूक?
शेतीसाठी जमिन घेत असल्याची खोटी कागदपत्रं सादर करुन त्यावर बंगल्या बांधल्याने शाहरुख आणि गौरी खान विरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे
मुंबई : बॉलिवूडचा किंग खान शाहरुख आणि त्याची पत्नी गौरी खान यांच्याविरोधात फसवणुकीची तक्रार दाखल करण्यात आली आहे. शेतकरी असल्याचा बनाव करुन खान दाम्पत्याने अलिबागमध्ये जमिन खरेदी केली आणि त्यावर आलिशान बंगला बांधल्याचा आरोप आहे.
शेतीसाठी जमिन घेत असल्याची खोटी कागदपत्रं सादर करुन त्यावर बंगल्या बांधल्याने शाहरुख आणि गौरी खान विरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. अलिबागमध्ये राहणाऱ्या सुरेंद्र धावले या सामाजिक कार्यकर्त्याने जानेवारी महिन्यात खार पोलिसात तक्रार केली होती. देजावु फार्म्स प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचे सीईओ आणि काही जणांचाही यात समावेश आहे.
शाहरुखने अलिबागमध्ये 19 हजार 960 चौरस मीटरवर बंगला बांधला आहे. पाच बंगल्यांच्या प्लॉटची जागा मिळून समुद्र किनारी हा आलिशान बंगला उभारण्यात आला आहे. बंगल्यात वैयक्तिक हेलिपॅड आणि स्वीमिंग पूलही आहे. शाहरुखने याच बंगल्यात आपला वाढदिवस साजरा केला होता.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
बातम्या
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
Advertisement