Hemant Kher: 'स्कॅम 1992' मधील अभिनेता हेमंत खेरनं ट्वीट शेअर करत मागितलं काम; म्हणाला, 'काम मांगने में कैसी शर्म...'
स्कॅम 1992 फेम अभिनेता हेमंत खेरनं (Hemant Kher) नुकतच एक ट्वीट शेअर केलं आहे. या ट्वीटच्या माध्यमातून त्यानं दिग्दर्शकांकडे काम मागितलं आहे.
Hemant Kher: मनोरंजनसृष्टीमध्ये काम करण्यासाठी अनेकांना स्ट्रगल करावा लागतो. चित्रपट, वेब सीरिजमध्ये काम मिळण्यासाठी अनेक कलाकारांना ऑडिशन द्यावे लागते. तसेच काही कलकारांना ऑडिशन राऊंडनंतर रिजेक्ट देखील केलं जातं. सध्या एका अभिनेत्यानं चक्क सोशल मीडियावर पोस्ट शेअर करुन चित्रपट, वेब सीरिज आणि शॉर्ट फिल्म्समध्ये काम मागितलं आहे. स्कॅम 1992 फेम अभिनेता हेमंत खेरनं (Hemant Kher) नुकतच एक ट्वीट शेअर केलं आहे. या ट्वीटच्या माध्यमातून त्यानं कास्टिंग डायरेक्टर आणि क्रिएटर्सकडे काम मागितलं आहे.
हेमंत खरेचं ट्वीट
'सर्व लेखक, दिग्दर्शक, कास्टिंग डायरेक्टर आणि निर्मात्यांना एक नम्र विनंती करतो, कृपया मला तुमच्या चित्रपट,मालिका, शॉर्ट फिल्म्समधील भूमिकांसाठी माझा विचार करावा. मी एक अभिनेता म्हणून एक्सप्लोर करण्यासाठी उत्सुक आहे.' असं ट्वीट हेमंतनं शेअर केलं होतं. हेमंतच्या या ट्वीटनं अनेकांचे लक्ष वेधले.
A humble request to all the writers, directors, casting directors and creators, kindly consider me to play parts in your stories/movies/series/short films. I am full of zeal & enthusiasm to explore as an actor 🙏#casting #movies #OTT #Bollywood #actor
— Hemant Kher (@hemantgkher) April 13, 2023
त्यानंतर हेमंतनं आणखी एक ट्वीट शेअर केलं. या ट्वीटमध्ये त्यानं लिहिलं, मला हे करण्यासाठी खूप विचार करावा लागला पण माझ्या सर्व गुरूंनी म्हटल्याप्रमाणे ‘काम मांगने में कैसी शर्म !’ म्हणून मला जे वाटले ते मी व्यक्त केले. तुमच्या सपोर्ट, सूचना आणि रीट्विट्ससाठी मी तुमचे आभार मानतो. थँक्यू सो मच'
It took lot of thinking & strength to do this but as all my seniors and gurus have said ‘काम मंगाने में कैसी शर्म !’ So I expressed what I felt. I AM GRATEFUL TO EACH ONE OF YOU FOR YOUR KIND SUPPORT, SUGGESTIONS AND RETWEETS. 🙏 THANK YOU SOOO MUCH ! ♥️ https://t.co/9uhl5Z312C
— Hemant Kher (@hemantgkher) April 14, 2023
‘भोला’ आणि ‘रनवे 34’ यांसारख्या चित्रपटांमध्ये कॉन्ट्रिब्यूट करणारे आमिल कियाल खान यांनी हेमंत खरेच्या ट्वीटला रिप्लाय दिला. त्यांनी 'नोटेड' असा रिप्लाय हेमंतच्या ट्वीटला दिला आहे. हेमंत खरेनं काही चित्रपट आणि वेब सिरीजमध्ये काम केले आहे. त्याने सलमान खानच्या प्रोडक्शनच्या नोटबुक चित्रपटात मुख्याध्यापकाची भूमिका साकारली होती. त्यानं बॉबी देओलच्या लव्ह हॉस्टेल या चित्रपटातही काम केलं होतं.
इतर महत्वाच्या बातम्या: