Satish Kaushik Post Mortem: अभिनेते सतीश कौशिक यांच्या पार्थिवाचं दिल्लीतील रुग्णालयात शवविच्छेदन; मुंबईत होणार अंत्यसंस्कार
सतीश कौशिक (Satish Kaushik) यांच्या निधाननं मनोरंजनसृष्टीवर शोककळा पसरली आहे. सतीश यांच्या पार्थिवावर मुंबई येथे अंत्यसंस्कार होणार आहेत.
Satish Kaushik: बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेते सतीश कौशिक (Satish Kaushik) यांच्या निधाननं मनोरंजनसृष्टीवर शोककळा पसरली आहे. त्यांनी अनेक हिट चित्रपटांमध्ये काम केलं. सतीश कौशिक हे अभिनेता, कॉमेडियन, स्क्रिप्ट रायटर, दिग्दर्शक आणि निर्माता होते. सतीश कौशिक यांच्या निधनानं बॉलिवूडवर शोककळा पसरली आहे. अनेक सेलिब्रिटींनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करुन सतीश यांना श्रद्धांजली वाहिली. सतीश यांच्या पार्थिवावर मुंबई येथे अंत्यसंस्कार होणार आहेत.
एएनआय वृत्तसंस्थेच्या माहितीनुसार, दिल्ली येथील दीनदयाळ रुग्णालयात सतीश कौशिक यांच्या पार्थिवाचं शवविच्छेदन करण्यात आलं. सतीश यांचे आज (गुरुवारी) पहाटे निधन झाले. त्यांचे पार्थिव दीनदयाळ रुग्णालयात आणण्यात आले. दीनदयाळ रुग्णालयाच्या शवागारात ठेवण्यात आले आहे. त्यांच्या पार्थिवाचं शवविच्छेदन 11 वाजता करण्यात आलं. सतीश कौशिक यांचे पार्थिव आज दिल्लीहून एअर अॅम्ब्युलन्समधून मुंबईला पाठवण्यात येणार आहे.
एएनआय वृत्तसंस्थेच्या माहितीनुसार, अभिनेते सतीश कौशिक यांचे पोस्टमार्टम झाले. प्राथमिक माहितीनुसार, त्यांच्या शरीरावर कोणत्याही जखमा नव्हत्या. सतीश कौशिक यांच्या मृत्यूचे कारण हृदयविकाराचा झटका असल्याचे म्हटले जात आहे.
Delhi | Post-mortem of actor Satish Kaushik is over. The initial report suggests no injury mark was found over the body. Reports stated cardiac arrest as the cause of death of the actor: Sources pic.twitter.com/h61GMBagN4
— ANI (@ANI) March 9, 2023
सतीश कौशिक हे अभिनेता, कॉमेडियन, स्क्रिप्ट रायटर, दिग्दर्शक आणि निर्माता होते. त्यांचा जन्म 13 एप्रिल 1956 रोजी हरियाणामध्ये झाला. त्यांनी बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्यापूर्वी नाटकांमध्ये काम केलं. 1987 मध्ये रिलीज झालेल्या मिस्टर इंडिया चित्रपटामुळे त्यांनी विशेष ओळख मिळाली. तसेच दीवाना मस्ताना, राम लखन आणि साजन चले ससुराल या चित्रपटातील त्यांच्या अभिनयाचं अनेकांनी कौतुक केलं.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी व्यक्त केला शोक
"प्रसिद्ध अभिनेते सतीश कौशिक जी यांच्या अकाली निधनाने दु:ख झाले आहे. त्यांनी आपल्या अप्रतिम अभिनय आणि दिग्दर्शनामुळे मन जिंकले. त्यांच्या कलाकृती प्रेक्षकांचे मनोरंजन करत राहतील. त्यांच्या कुटुंबियांना आणि चाहत्यांच्या संवेदना. ओम शांती." असं ट्वीट शेअर करुन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सतीश कौशिक यांना श्रद्धांजली वाहिली.
वाचा इतर महत्वाच्या बातम्या: