Sara Ali Khan Vicky Kaushal : सारा अली खान अन् विकीचा अनटायटल्ड सिनेमा 'या' दिवशी येणार प्रेक्षकांच्या भेटीला; जाणून घ्या रिलीज डेटबद्दल...
Sara Ali Khan Vicky Kaushal : सारा अली खान आणि विकी कौशलचा अनटायटल्ड सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
Sara Ali Khan Vicky Kaushal : बॉलिवूड अभिनेत्री सारा अली खान (Sara Ali Khan) आणि विकी कौशलचा (Vicky Kaushal) अनटायटल्ड सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. येत्या 2 जूनला हा सिनेमा प्रदर्शित होणार असल्याचं समोर आलं आहे.
सारा अली खान आणि विकी कौशलच्या आगामी सिनेमाचं नाव अद्याप समोर आलेलं नाही. मात्र या सिनेमाची रिलीज डेट मात्र समोर आली आहे. शाहरुख खानच्या (Shah Rukh Khan) 'जवान' (Jawan) या सिनेमाची रिलीज डेट पुढे ढकलण्यात आल्यानंतर 'फुकरे 3' या सिनेमाच्या रिलीज डेटची घोषणा केली आहे.
विकी कौशल आणि सारा अली खानला रुपेरी पडद्यावर पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत. या सिनेमाचं नाव काय असेल हे प्रेक्षकांना 16 मेला कळेल. या सिनेमाच्या माध्यमातून विकी आणि सारा पहिल्यांदाच स्क्रीन शेअर करताना दिसणार आहेत. या सिनेमात त्यांचा रोमॅंटिक अंदाज पाहायला मिळणार आहे. लक्ष्मन उतरेकर (Laxman Utekar) या सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळणार आहे.
View this post on Instagram
विकी कौशल आणि सारा अली खानचे अनेक प्रोजेक्ट सध्या पाइपलाइनमध्ये आहेत. विकी 'द ग्रेट इंडियन फॅमिली', 'सैम बहादूर' आणि आनंद तिवारीच्या एका सिनेमात झळकणार आहे. तर दुसरीकडे सारा अली खान 'ए वतन मेरे वतन', 'मर्डर मुबारक' आणि जगन शक्तिच्या एका सिनेमात दिसणार आहे.
शाहरुखचा 'जवान' आता 'या' दिवशी येणार प्रेक्षकांच्या भेटीला
शाहरुख खानचा 'जवान' हा सिनेमा 2 जून 2023 रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार होता. पण आता या सिनेमाची रिलीज डेट पुढे ढकलण्यात आली आहे. काही तांत्रिक अडचणींमुळे या सिनेमाची रिलीज डेट पुढे ढकलण्यात आली असल्याचं समोर आलं आहे. आता हा सिनेमा ऑगस्ट महिन्यात प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमाची रिलीज डेड पुढे ढकलण्यात आल्यामुळे शाहरुखचे चाहते नाराज झाले आहेत.
'जवान'च्या निर्मात्यांनी 2022 मध्ये टीझर शेअर करत 'जवान'ची रिलीज डेट जाहीर केली होती. आता 2 जूनला अवघे काही दिवस शिल्लक राहिले असून अद्याप या सिनेमाच्या प्रमोशनला सुरुवात झालेली नाही. पोस्ट प्रोडक्शनच्या कामाला वेळ लागत असल्याने आता या सिनेमाची रिलीज डेट पुढे ढकलण्यात आली आहे.
संबंधित बातम्या