एक्स्प्लोर
Advertisement
''ए दिल.. वादः मुख्यमंत्री, राज ठाकरेंच्या बैठकीची माहिती सार्वजनिक करा''
मुंबईः काँगेसचे मुंबई अध्यक्ष संजय निरूपम यांनी 'ए दिल है मुश्किल'च्या प्रकरणावरून मुख्यमंत्री आणि मनसेवर जोरदार तोफ डागली आहे. मुख्यमंत्र्यांनी एका ब्रोकरची भूमिका पार पाडत राज ठाकरे आणि निर्मात्यांची बैठक घडवून आणली, असा आरोप निरूपमांनी केला आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि निर्मात्यांच्या बैठकीचा सविस्तर तपशील बाहेर येणं अपेक्षित आहे. बैठकीत कोण काय बोललं याची माहिती द्यावी, अन्यथा कोर्टात जाण्याचा इशारा निरूपमांनी दिला आहे.
आर्मीला राजकारणात ओढण्याचा प्रयत्नः निरुपम
धमक्या देणाऱ्या राज ठाकरेंना मुख्यमंत्र्यांनी अटक करायचं सोडून त्यांना वर्षा बंगल्यावर बैठकीला बोलावलं. ही अत्यंत लाजिरवाणी गोष्ट आहे. मुख्यमंत्र्यांनी राज ठाकरेंवर कायदेशीर कारवाई करायला हवी होती.
मात्र बैठक बोलवून सेटलमेंट केली, असा आरोप निरुपमांनी केला आहे. देशभक्तीची किंमत ठरवणारे राज ठाकरे आणि मुख्यमंत्री कोण, असा सवाल निरुपम यांनी पत्रकार परिषदेत केला.
भारतीय सेनेला राजकारणात ओढण्याचा प्रयत्न झाला आहे. आर्मी फंड देण्याच्या भूमिकेत मुख्यमंत्र्यांनी सहभाग घेणं ही लाजिरवाणी बाब आहे. आर्मी फंडाला 5 कोटी रुपये देण्याचा हक्क यांना कोणी दिला, असा सवालही निरुपमांनी केला आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
धाराशिव
भारत
बातम्या
Advertisement