एक्स्प्लोर
संजय दत्तच्या बायोपिकचा मच अवेटेड टिझर रिलीज
अभिनेता संजय दत्तच्या या बायोपिकमध्ये अभिनेता रणबीर कपूर मुख्य भूमिकेत आहे. मुंबईत या सिनेमाच्या टिझर लाँचिंगचा कार्यक्रम पार पडला.
मुंबई : राजकुमार हिरानी दिग्दर्शिक संजू या सिनेमाचा मच अवेटेड टिझर रिलीज झाला आहे. अभिनेता संजय दत्तच्या या बायोपिकमध्ये अभिनेता रणबीर कपूर मुख्य भूमिकेत आहे. मुंबईत या सिनेमाच्या टिझर लाँचिंगचा कार्यक्रम पार पडला.
या टिझरमध्ये संजय दत्तची विविध रुपं दाखवण्यात आली आहेत. येरवडा कारागृहात त्याने शिक्षा भोगली होती. येरवडा कारागृहाच्या दृश्यांनीच टिझरची सुरुवात करण्यात आली आहे.
रणबीर कपूरने हुबेहूब संजय दत्त साकारला आहे. गेल्या काही दिवसांपूर्वीच या सिनेमाच्या शुटिंगची दृश्य व्हायरल झाली होती. त्यामध्येही रणबीर कपूरमधील संजू बाबा दिसला होता.
टिझर रिलीज होण्याची चाहते आतुरतेने वाट पाहत होते. अखेर हा टिझर रिलीज झाला आहे. मात्र आता सिनेमाची उत्सुकता आणखी वाढली आहे. संजू सिनेमा अगोदर मार्च महिन्यात रिलीज होणार होता, मात्र नंतर ही तारीख पुढे ढकलत ती 29 जून करण्यात आली.
या सिनेमात अभिनेत्री मनिषा कोईराला संजय दत्तच्या आईच्या भूमिकेत दिसणार आहे. तर परेश रावल संजय दत्तचे वडील सुनील दत्त यांच्या भूमिकेत दिसतील. याशिवाय अनुष्का शर्मा, सोनम कपूर, दिया मिर्झा हे कलाकारही प्रमुख भूमिकेत आहेत.
टिझर :
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
छत्रपती संभाजी नगर
महाराष्ट्र
बातम्या
नाशिक
Advertisement