एक्स्प्लोर
Advertisement
महिला आयोगाच्या नोटीसला सलमानचं उत्तर, मात्र माफी नाहीच
मुंबई : बॉलिवूड अभिनेता सलमान खानने महिला आयोगाच्या नोटीसला उत्तर दिलं आहे. मात्र 'बलात्कार पीडित' वक्तव्याबाबत माफी मागितली नाही. राष्ट्रीय महिला आयोगाने सलमानला त्याच्या वादग्रस्त वक्तव्याप्रकरणी माफी मागण्यास सांगितलं होतं. यासाठी महिला आयोगाने नोटीस पाठवून सलमानला स्पष्टीकरण देण्यासाठी सात दिवसांची मुदतही दिली होती.
या नोटीसनुसार सलमान खानला आज महिला आयोगासमोर हजर राहायचं होतं. मात्र सलमान स्वत: उपस्थित न राहता वकिलांना पाठवलं होतं.
‘सुलतान’च्या शूटिंगनंतर बलात्कार पीडितेसारखं वाटायचं : सलमान
राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा ललिता कुमारमंगलम यांनी सांगितलं की, "सलमानने आज त्याच्या वकिलाला पाठवलं होतं. वकिलाद्वारे दिलेल्या उत्तरात सलमानला 'बलात्कार पीडित' वक्तव्याबाबत कोणताही खेद व्यक्त केलेला नाही." https://twitter.com/ANI_news/status/748058588837457920 सलमानकडून आलेल्या या उत्तरावर विचार करत असल्याचं ललिता कुमारमंगलम म्हणाल्या. सलमानच्या ‘बलात्कार पीडित’ विधानावर सलीम खान यांचा माफीनामा सलमान खानचं वादग्रस्त वक्तव्य ‘सुलतान’ चित्रपटाच्या शुटिंगनंतर आपल्याला बलात्कार पीडितेसारखं वाटत असल्याचं वादग्रस्त वक्तव्य सलमान खानने केलं होत. ‘दररोज 120 किलो वजनाच्या माणसाला 10 वेगवेगळ्या अँगलमधून 10 वेळा उचलावं लागत होतं. दररोज सहा तास ही कसरत केल्यानंतर मला धड चालताही येत नव्हतं. कुस्तीच्या आखाड्यातून बाहेर पडताना मला बलात्कार झाल्यासारखं वाटायचं’ असं वादग्रस्तव वक्तव्य त्यानं केलं होतं.आता मला थोडं कमी बोललं पाहिजे: सलमान खान
वडील सलीम खान यांच्याकडून बचाव बलात्कार पीडितसंदर्भातील विधानावर वाद झाल्याने त्याचे वडील आणि लेखक सलीम खान यांनी माफी मागितली होती. ‘सलमानने त्याच्या कामाबाबत जे उदाहरण दिलं, ते चुकीचंच आहे आणि त्यात कोणतीही शंका नाही. पण त्याचा उद्देश चुकीचा नव्हता’, असं सलीम खान यांनी ट्विटरवर लिहिलं होतं.अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
महाराष्ट्र
बीड
राजकारण
Advertisement