एक्स्प्लोर

"...नाहीतर सलमान खानची अवस्था बाबा सिद्दीकींपेक्षाही वाईट होईल", सुपरस्टार अभिनेत्याला पुन्हा एकदा धमकी; कोट्यवधी रुपयांची मागणी

Salman Khan Firing Case : सलमान खानला पुन्हा एकदा धमकी देण्यात आली असून त्याच्याकडून कोट्यवधी रुपयांची मागणी करण्यात आली आहे.

Salman Khan Death Threat : बॉलिवूड अभिनेता सलमान खानला आणखी एक धमकी मिळाली आहे. यावेळी ट्रॅफिक कंट्रोलला पाठवलेल्या मेसेजमध्ये ही धमकी देण्यात आली आहे. ट्रॅफिक कंट्रोल रुमला मेसेज पाठवणाऱ्या व्यक्तीने स्वतःला लॉरेन्स बिश्नोई टोळीच्या जवळचं असल्याचं सांगितलं आहे.  सलमान खानकडे 5 कोटी रुपयांची मागणी करण्यात आली आहे. बाबा सिद्दीकी यांच्या हत्येनंतर सलमान खान बिश्नोई गँगच्या निशाण्यावर आहे. त्यामुळे त्याच्या सुरक्षेतही वाढ करण्यात आली आहे. याआधीही सलमानला धमक्या मिळाल्या असून त्याच्या घरावर गोळीबारही झाला आहे.

सलमान खानला पुन्हा एकदा धमकी

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंबई वाहतूक पोलिसांच्या (Mumbai Traffic Police) व्हॉट्सॲप नंबरवर एक धमकीचा मेसेज आला असून, लॉरेन्स बिश्नोईशी (Lawrence Bishnoi) असलेले दीर्घकालीन वैर संपवण्यासाठी अभिनेता सलमान खानकडे (Salman Khan) 5 कोटी रुपयांची मागणी करण्यात आली आहे. हा मेसेज पाठवणाऱ्या व्यक्तीने दावा केला आहे की, तो सलमान खान आणि लॉरेन्स बिश्नोई गँगमध्ये सामंजस्य घडवून आणणार आहे, त्यासाठी त्याने पैसे मागितले आहेत आणि जर पैसे दिले नाहीत तर सलमान खानची अवस्था बाबा सिद्दीकीपेक्षाही वाईट होईल असा इशारा दिला आहे.

धमकी देत कोट्यवधी रुपयांची मागणी

ट्रॅफिक पोलिसांच्या व्हॉट्सॲप नंबरवर आलेल्या मेसेजमध्ये आरोपीने दावा केला आहे की, "ही धमकी हलक्यात घेऊ नका, जर सलमान खानला जिवंत राहायचे असेल आणि लॉरेन्स बिश्नोईशी वैर संपवायचे असेल, तर त्याला 5 कोटी रुपये द्यावे लागतील. पैसे दिले नाहीत तर सलमान खानची अवस्था बाबा सिद्दीकीपेक्षा वाईट होईल. मुंबई पोलिसांनी हे प्रकरण गांभीर्याने घेत या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.

या प्रकरणात कसून तपास सुरु

मुंबई पोलिसांनी बाबा सिद्दीकी यांच्यावर गोळ्या झाडणारा मारेकरी शिवकुमार गौतम आणि लॉरेन्स बिश्नोई टोळीचा जवळचा जिशान अख्तर यांच्या विरोधात लुक आउट सर्कुलर (LOC) जारी केले. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सुरुवातीला शुभम लोणकरविरुद्ध लूक आऊट सर्क्युलर जारी करण्यात आलं होतं, तो नेपाळला पळून जाण्याची शक्यता पोलिसांना आहे. प्रत्येक सीमेवर आणि विमानतळावर आरोपींची माहिती देण्यात आली असून शोध सुरू असल्याचे एका अधिकाऱ्याने सांगितलं आहे.

महत्त्वाच्या इतर बातम्या :

Salman Khan Firing : मोठी बातमी : 25 लाखांची सुपारी, 60 ते 70 जण तैनात; सलमान खानचा गेम करण्यासाठी बिश्नोई गँगचं तगडं प्लॅनिंग

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Assembly Elections 2024 : मलकापूर विधानसभेत चैनसुख संचेतींच्या अडचणीत वाढ, भाजपच्याच नेत्यांचा टोकाचा विरोध, नेमकं कारण काय?
मलकापूर विधानसभेत चैनसुख संचेतींच्या अडचणीत वाढ, भाजपच्याच नेत्यांचा टोकाचा विरोध, नेमकं कारण काय?
Ajay Baraskar : अजय महाराज बारस्करांच्या घरी दोन मद्यधुंद तरुणांचा राडा, वयस्कर व्यक्तीला मारहाण, पोलिसांकडून दोघे ताब्यात
अजय महाराज बारस्करांच्या घरी दोन मद्यधुंद तरुणांचा राडा, एकाला मारहाण, पोलिसांनी घेतलं ताब्यात, बारस्करांचा जरांगेंवर हल्लाबोल
अनिल देशमुख खरे मर्द असतील तर फडणवीसांविरुद्ध निवडणूक लढवावी; माजी मंत्र्यांचं चॅलेंज
अनिल देशमुख खरे मर्द असतील तर फडणवीसांविरुद्ध निवडणूक लढवावी; माजी मंत्र्यांचं चॅलेंज
Mahayuti Seat sharing: भाजपची 'किंचित' माघार, चंदीगढमध्ये एकनाथ शिंदे मोदींना भेटले, महायुतीच्या जागावाटपाचा नवा फॉर्म्युला ठरला?
भाजपची 'किंचित' माघार, चंदीगढमध्ये एकनाथ शिंदे मोदींना भेटले, महायुतीच्या जागावाटपाचा नवा फॉर्म्युला ठरला?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 7AM TOP Headlines 7 AM 18 October 2024माझं गांव, माझा जिल्हा Majha Gaon Majha Jilha at 630AM 18 Oct 2024Uddhav Thackeray Special Report : मविआच्या जागावाटपाआधीच ठाकरेंचे पत्ते ओपनAaditya Thackeray On Ashish Shelar :आशिष शेलारांना मेंटल कौन्सिलिंगची गरज,ठाकरे काय बोलले?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maharashtra Assembly Elections 2024 : मलकापूर विधानसभेत चैनसुख संचेतींच्या अडचणीत वाढ, भाजपच्याच नेत्यांचा टोकाचा विरोध, नेमकं कारण काय?
मलकापूर विधानसभेत चैनसुख संचेतींच्या अडचणीत वाढ, भाजपच्याच नेत्यांचा टोकाचा विरोध, नेमकं कारण काय?
Ajay Baraskar : अजय महाराज बारस्करांच्या घरी दोन मद्यधुंद तरुणांचा राडा, वयस्कर व्यक्तीला मारहाण, पोलिसांकडून दोघे ताब्यात
अजय महाराज बारस्करांच्या घरी दोन मद्यधुंद तरुणांचा राडा, एकाला मारहाण, पोलिसांनी घेतलं ताब्यात, बारस्करांचा जरांगेंवर हल्लाबोल
अनिल देशमुख खरे मर्द असतील तर फडणवीसांविरुद्ध निवडणूक लढवावी; माजी मंत्र्यांचं चॅलेंज
अनिल देशमुख खरे मर्द असतील तर फडणवीसांविरुद्ध निवडणूक लढवावी; माजी मंत्र्यांचं चॅलेंज
Mahayuti Seat sharing: भाजपची 'किंचित' माघार, चंदीगढमध्ये एकनाथ शिंदे मोदींना भेटले, महायुतीच्या जागावाटपाचा नवा फॉर्म्युला ठरला?
भाजपची 'किंचित' माघार, चंदीगढमध्ये एकनाथ शिंदे मोदींना भेटले, महायुतीच्या जागावाटपाचा नवा फॉर्म्युला ठरला?
Uttamrao Jankar : माळशिरसच्या उमेदवारीवरुन डिवचलं, मी बहुदा बिनविरोध आमदार होणार, उत्तमराव जानकर यांचा भाजपला टोला
विरोधात उमेदवार आला नाही, मी बहुदा बिनविरोध आमदार होणार, उत्तमराव जानकर यांचा भाजपला टोला
नवनीत राणांना खुद्द रवी राणा यांनी खासदार होऊ दिलं नाही, बच्चू कडू नेमकं असं का म्हणाले? 
नवनीत राणांना खुद्द रवी राणा यांनी खासदार होऊ दिलं नाही, बच्चू कडू नेमकं असं का म्हणाले? 
Sangola Vidhansabha : लक्षवेधी सांगोल्यात शहाजी बापू विजयाचा डोंगार चढणार, की महाविकास आघाडी गुलाल उधळणार
लक्षवेधी सांगोल्यात शहाजी बापू विजयाचा डोंगार चढणार, की महाविकास आघाडी गुलाल उधळणार
अजूनही मतदार नोंदणी केलीच नाही? मतदार यादीत नाव समाविष्ट करण्यासाठी 'या' तारखेपर्यंत शेवटची संधी!
अजूनही मतदार नोंदणी केलीच नाही? मतदार यादीत नाव समाविष्ट करण्यासाठी 'या' तारखेपर्यंत शेवटची संधी!
Embed widget