एक्स्प्लोर
सलमान खानच्या 'भारत'ची छप्परफाड कमाई, जुने रेकॉर्ड मोडीत
बॉलिवूडचा सल्लूभाई अर्थात सलमान खानचा बहुप्रतिक्षीत 'भारत' चित्रपट बुधवारी रमजान ईदच्या मुहुर्तावर प्रदर्शित झाला. ईद आणि सलमानचा चित्रपट एक समीकरणच झालं आहे. ईदच्या दिवशी प्रदर्शित झालेला सलमानचा चित्रपट हमखास हिट होतोच. याचीच काल पुनरावृत्ती झाली.
मुंबई : बॉलिवूडचा सल्लूभाई अर्थात सलमान खानचा बहुप्रतिक्षीत 'भारत' चित्रपट बुधवारी रमजान ईदच्या मुहुर्तावर प्रदर्शित झाला. ईद आणि सलमानचा चित्रपट एक समीकरणच झालं आहे. ईदच्या दिवशी प्रदर्शित झालेला सलमानचा चित्रपट हमखास हिट होतोच. याचीच काल पुनरावृत्ती झाली. त्यामुळे यंदाची ईददेखील सलमानसाठी लकी ठरली आहे.
सलमान खानच्या या चित्रपटाने त्याच्याच जुन्या सर्व चित्रपटांचे रेकॉर्ड मोडीत काढले आहे. भारत हा प्रदर्शनाच्या पहिल्याच दिवशी सर्वाधिक कमाई करणाऱ्या सलमान खानच्या चित्रपटांच्या यादीत पहिल्या क्रमांकावर पोहोचला आहे. भारतने पहिल्याच दिवशी 42.30 कोटी रुपयांची कमाई केली आहे.
सलमानचा नाशिकमधील जबरा फॅन, 'भारत'साठी बूक केलं संपूर्ण थिएटर
प्रदर्शनाच्या पहिल्याच दिवशी सर्वाधिक कमाई करणाऱ्या सलमान खानच्या चित्रपटांच्या यादीत 'सुलतान' पहिल्या क्रमांकावर होता. सुलतानने 36.54 कोटी रुपयांची ओपनिंग मिळवली होती. परंतु हा रेकॉर्ड मोडीत भारतने 42.30 कोटी रुपयांची ओपनिंग मिळवली आहे.
भारत सिनेमात सलमान सहा भूमिकांमध्ये दिसणार आहे. यामध्ये तरुण सर्कस चॅम्पियनपासून ते 60 वर्षाच्या व्यक्तीरेखेत सलमान दिसणार आहे. सिनेमात सहा दशकांचा एका व्यक्तीचा प्रवास दाखवण्यात येणार आहे. त्यामुळे सलमान सहा विविध भूमिकांमध्ये दिसणार आहे. सिनेमात सलमानसोबत कॅटरिना कैफ, तब्बू, दिशा पटानी, सुनील ग्रोवर आणि जॅकी श्रॉफ हे देखील झळकणार आहेत.#Salmania grips the nation... #Bharat storms the BO... Proves *yet again* Salman Khan is the biggest crowd puller... #Bharat opens much bigger than Salman - Ali Abbas Zafar’s #TigerZindaHai [₹ 34.10 cr] and #Sultan [₹ 36.54 cr]... Wed ₹ 42.30 cr. India biz.
— taran adarsh (@taran_adarsh) June 6, 2019
अतुल अग्निहोत्री, अलवीरा अग्निहोत्री, भूषण कुमार, कृष्ण कुमार आणि सलमान खानने या सिनेमाची निर्मिती केली आहे. तर अली अब्बास जफरने सिनेमाचे दिग्दर्शन केले आहे. प्रेक्षकांना कसा वाटला सलमान खानचा 'भारत'? | एबीपी माझा कमाईबाबतचं भारतच्या अधिकृत ट्विटर हॅण्डलवरुन केलेलं ट्वीटSalman Khan and #Eid... *Day 1* biz 2010: #Dabangg ₹ 14.50 cr 2011: #Bodyguard ₹ 21.60 cr 2012: #ETT ₹ 32.93 cr 2014: #Kick ₹ 26.40 cr 2015: #BajrangiBhaijaan ₹ 27.25 cr 2016: #Sultan ₹ 36.54 cr 2017: #Tubelight ₹ 21.15 cr 2018: #Race3 ₹ 29.17 cr 2019: #Bharat ₹ 42.30 cr
— taran adarsh (@taran_adarsh) June 6, 2019
Bharat’s journey at the Box-Office begins!
1st-Day Collection: 42.3 Cr*#BharatHistoricDay1@BeingSalmanKhan @aliabbaszafar @atulreellife @itsBhushanKumar #KatrinaKaif @nikhilnamit pic.twitter.com/3gLwPkQmhP — Bharat (@Bharat_TheFilm) June 6, 2019
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
लातूर
क्राईम
करमणूक
महाराष्ट्र
Advertisement