एक्स्प्लोर

सलमान खानच्या परदेशवारीला कोर्टाकडून हिरवा कंदील

काळवीट शिकार प्रकरणात जामिनावर बाहेर असलेला अभिनेता सलमान खानला जोधपूर न्यायालयाने परदेशवारीसाठी हिरवा कंदील दाखवला.

जोधपूर : जोधपूरजवळील जंगलात 1998 साली दोन काळवीटांची शिकार केल्याप्रकरणी दोषी ठरलेला अभिनेता सलमान खानला परदेशगमनाची परवानगी मिळाली आहे. सध्या जामिनावर बाहेर असलेल्या सलमानला जोधपूर न्यायालयाने परदेशवारीसाठी  हिरवा कंदील दिला. जोधपूर सत्र न्यायालयाने काळवीटांच्या शिकार प्रकरणी 5 एप्रिल रोजी सलमानला दोषी ठरवलं होतं. दोन रात्री तुरुंगात घालवल्यानंतर सलमान तिसऱ्या दिवशी जामिनावर बाहेर आला. न्यायालयाने सलमानला 50 हजार रुपयांचा जामीन मंजूर केला. जोधपूर न्यायालयाने सलमानला 25 मे ते 10 जुलै या कालावधीत परदेशात जाण्याची परवानगी दिली आहे. या कालावधीत सलमान कॅनडा, नेपाळ आणि अमेरिका या तीन देशांमध्ये दौरा करणार आहे. सलमानला दोन अटींवर जामीन सलमान खानला जामीन मंजूर करताना, कोर्टाने दोन अटी घातल्या आहेत. सलमानला 7 मे रोजी कोर्टात यावं लागेल, तसेच देश सोडण्यापूर्वी कोर्टाची परवानगी घ्यावी लागेल. सलमानला 5 वर्षांची शिक्षा 20 वर्षांपूर्वीच्या काळवीट शिकारप्रकरणी  दोषी ठरलेल्या अभिनेता  सलमान खानला 5 वर्षांची शिक्षा आणि दहा हजारांच्या दंडाची शिक्षा सुनावण्यात आली. मात्र त्याचे सहकारी अभिनेते सैफ अली खान, सोनाली बेंद्रे, तब्बू आणि नीलम यांना निर्दोष ठरवण्यात आलं. शिक्षेनंतर सलमानची रवानगी जोधपूरच्या सेंट्रल जेलमध्ये करण्यात आली होती. नेमकं प्रकरण काय आहे? काळवीट शिकार प्रकरण 27 आणि 28 सप्टेंबर 1998 सालचं आहे. सलमान खान दिग्दर्शक सुरज बडजात्या यांच्यासोबत 'हम साथ साथ है' या सिनेमाची शुटिंग जोधपूरमध्ये करत होता. यावेळी 27 सप्टेंबरच्या रात्री तो सहकलाकार सैफ अली खान, सोनाली बेंद्रे, तब्बू आणि नीलम यांच्यासोबत शिकारीसाठी निघाला. यावेळी सलमानने संरक्षित वन्य जीवांच्या यादीत असलेल्या दोन काळवीटांची शिकार केल्याचा आरोप आहे. याशिवाय विविध दोन ठिकाणी काळवीटाची शिकार केल्याचाही त्याच्यावर आरोप करण्यात आला. त्यामुळे त्याच्यावर एकूण चार खटले दाखल आहेत. संबंधित बातम्या

काळवीट शिकार : सलमानला 5 वर्षांची शिक्षा, 10 हजाराचा दंड

 सलमानसाठी एक न्याय, अन् इतर कैद्यांना वेगळा न्याय!

सलमान न जेवता रात्रभर जमिनीवर झोपला

 निकालानंतर सलमान कोर्ट रुममध्ये मान खाली घालून बसला!

...तर सलमान आणि आसाराम बापू एकाच बराकमध्ये!

काळवीट शिकार : सलमानला 5 वर्षांची शिक्षा, 10 हजाराचा दंड

सलमानच्या जेलवारीमुळे 'या' अभिनेत्रीला आनंद!

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

हार्दिक पांड्याची कार्बन कॉपी, लग्नात वाजवतोय ढोल, पाहा व्हायरल व्हिडीओ
हार्दिक पांड्याची कार्बन कॉपी, लग्नात वाजवतोय ढोल, पाहा व्हायरल व्हिडीओ
मोठी बातमी : उद्धव ठाकरेंना मोठा झटका! एम के मढवी यांना अटक
मोठी बातमी : उद्धव ठाकरेंना मोठा झटका! एम के मढवी यांना अटक
भाजपने तिकीट कापल्यानंतर पूनम महाजन यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाल्या...
भाजपने तिकीट कापल्यानंतर पूनम महाजन यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाल्या...
वंचितने उमेदवार बदलला! संजीव कलकोरी ऐवजी परमेश्वर रणशूर यांना उमेदवारी, दौलत कादर खान यांनाही लोकसभेचं तिकीट
वंचितने उमेदवार बदलला! संजीव कलकोरी ऐवजी परमेश्वर रणशूर यांना उमेदवारी, दौलत कादर खान यांनाही लोकसभेचं तिकीट
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 10 PM : 27 April 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सMajha Katta : लग्नापासून,राजकीय पक्षांना हेलिकॉप्टर्स पुरवणारे उद्योजक Mandar Bhardeमाझा कट्ट्यावरMaharashtra Superfast News : वारे निवडणुकीचे : सुपरफास्ट बातम्या एका क्लिकवर : 27 April 2024Zero Hour Baramati:Sunetra Pawar यांचा प्रचार कसा सुरू आहे?बारामतीकर कुणाला निवडून देणार?Ground Zero

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
हार्दिक पांड्याची कार्बन कॉपी, लग्नात वाजवतोय ढोल, पाहा व्हायरल व्हिडीओ
हार्दिक पांड्याची कार्बन कॉपी, लग्नात वाजवतोय ढोल, पाहा व्हायरल व्हिडीओ
मोठी बातमी : उद्धव ठाकरेंना मोठा झटका! एम के मढवी यांना अटक
मोठी बातमी : उद्धव ठाकरेंना मोठा झटका! एम के मढवी यांना अटक
भाजपने तिकीट कापल्यानंतर पूनम महाजन यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाल्या...
भाजपने तिकीट कापल्यानंतर पूनम महाजन यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाल्या...
वंचितने उमेदवार बदलला! संजीव कलकोरी ऐवजी परमेश्वर रणशूर यांना उमेदवारी, दौलत कादर खान यांनाही लोकसभेचं तिकीट
वंचितने उमेदवार बदलला! संजीव कलकोरी ऐवजी परमेश्वर रणशूर यांना उमेदवारी, दौलत कादर खान यांनाही लोकसभेचं तिकीट
पोलिसांनी उलगडलं गूढ, अल्पवयीन मुलीवर सामूहिक अत्याचार, दगडाने ठेचून हत्या;  फरार चौघांच्या आवळल्या मुसक्या
पोलिसांनी उलगडलं गूढ, अल्पवयीन मुलीवर सामूहिक अत्याचार, दगडाने ठेचून हत्या; फरार चौघांच्या आवळल्या मुसक्या
हार्दिक पांड्याला जास्त महत्व द्यायची गरज नाही, इरफान पठाणची BCCI कडे मागणी
हार्दिक पांड्याला जास्त महत्व द्यायची गरज नाही, इरफान पठाणची BCCI कडे मागणी
Richest Indian Youtuber : सर्वात महागडा युट्यूबर कोण? भुवन बामलाही टाकलंय मागे
सर्वात महागडा युट्यूबर कोण? भुवन बामलाही टाकलंय मागे
राहुलचं दमदार अर्धशतक, लखनौचं राजस्थानसमोर 197 धावांचे आव्हान
राहुलचं दमदार अर्धशतक, लखनौचं राजस्थानसमोर 197 धावांचे आव्हान
Embed widget