एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
सलमान लग्न कधी करणार ते देवाला पण माहीत नसेलः सलीम खान
मुंबईः अभिनेता सलमान खानच्या लग्नाबद्दल नेहमीच चर्चा होते, मात्र खुद्द सलमानचे वडील सलीम खान यांनीही सलमान लग्न कधी करणार ते माहीत नसल्याचं म्हटलं आहे. सलमान लग्न कधी करणार ते देवालाच माहीत, अशा शब्दात सलीम खान यांनी सलमानच्या लग्नाबाबत खुलासा केला आहे.
सलीम खान एका कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. मात्र त्यांनी सलमानच्या लग्नाबाबत प्रश्न विचारण्यात येऊ नये, अशी अट घातली आहे. सलमान कधी लग्न करणार ते देवालाच माहीत आहे, त्यामुळे याव्यतिरिक्त इतर कोणताही प्रश्न विचारा, असं सलीम खान यांनी म्हटलं आहे.
https://twitter.com/luvsalimkhan/status/764382640887640065
सलमानच्या लग्नाचा विषय नेहमीच चर्चेचा विषय असतो. प्रत्येक ठिकाणी सलीम खान यांना सलमानच्या लग्नाबाबत प्रश्न विचारण्यात येतो. त्यामुळे सलीम खान यांनी सर्वांना पूर्व सूचना करत हा प्रश्न न विचारण्याची विनंती केली आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
निवडणूक
क्रीडा
महाराष्ट्र
Advertisement