एक्स्प्लोर
डॅशिंग आर्चीला मुख्यमंत्र्यांचा पहिला प्रश्न.....
मुंबई : प्रेक्षकांनी डोक्यावर घेतलेल्या नागराज मंजुळेंच्या सैराट सिनेमाच्या कलाकारांना भेटण्याचा मोह, खुद्द राज्याच्या मुख्यमंत्र्यांनाही आवरता आला नाही. राष्ट्रीय पुरस्कार विजेती अभिनेत्री 'सैराट'फेम आर्ची अर्थात रिंकू राजगुरू, आणि परशा अर्थात आकाश ठोसर यांच्यासह संपूर्ण 'सैराट' टीमने मंगळवारी रात्री मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची 'वर्षा' बंगल्यावर भेट घेतली.
मुख्यमंत्र्यांचा प्रश्न
या भेटीदरम्यान डॅशिंग आर्चीला मुख्यमंत्र्यांनी पहिलाच प्रश्न विचारला तो म्हणजे, तू बुलेटवरुन आलीस का? या प्रश्नानंतर 'वर्षा'वरील वातावरण अक्षरश: सैराटमय झालं.
मुख्यमंत्र्यांच्या प्रश्नाला उत्तर देताना रिंकू म्हणाली, "मी बुलेटवरुन नाही, गाडीतून आले".
"मुख्यमंत्र्यांशी कधी भेट होईल, हे वाटलंच नव्हतं, पण 'सैराट'मुळे भेट झाली. सैराटच्या यशामुळे खूप छान वाटतंय", असं रिंकू म्हणाली.
तर संपूर्ण टीमने घेतलेल्या मेहनतीचं फळ म्हणजे सैराटचं यश आहे, असं परशा अर्थात आकाश ठोसर म्हणाला.
यावेळी मुख्यमंत्र्यांनी संपूर्ण टीमचं भरभरुन कौतुक केलं. तसंच 'वर्षा' बंगल्यावरील अनेक कर्मचाऱ्यांनीही आर्ची आणि परशासोबत फोटोसेशन केलं.
याप्रसंगी मुख्यमंत्र्यांसह गृहराज्य मंत्री राम शिंदे, आमदार शिवाजी कर्डिले उपस्थित होते. तर 'सैराट'कडून दिग्दर्शक नागराज मंजुळे, निखिल साने आदी उपस्थित होते.
मराठीतील सर्वाधिक कमाई करणारा 'सैराट'
सैराट हा मराठीतील सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला आहे. 'सैराट'नं अवघ्या 11 दिवसात तब्बल 41 कोटीची कमाई केली आहे. सैराटच्या या रेकॉर्डब्रेक कमाईनं 'नटसम्राट'लाही मागं टाकलंय.
संबंधित बातम्या :
'सैराट'ची रेकॉर्डब्रेक कमाई, 11 दिवसात 'नटसम्राट'ला धोबीपछाड
“नाग्या, तुझी कला जखमेतून येतेय. ती जखम भळभळत राहो.”
सोलापूरच्या नागराज मंजुळेची बॉलिवूडमध्ये काय चर्चा?
“हॅलो, आर्ची अभिनंदन’!, अहो मी आर्ची नाही, उद्योगमंत्री बोलतोय”
सांगलीत ‘आर्ची’च्या झिंगाट चाहत्यांवर लाठीमार
रिव्ह्यू : याड लावणारा ‘सैराट’
..म्हणून नानाचा ‘नटसम्राट’ पुन्हा प्रदर्शित होणार !
रिव्ह्यू : महान नटाची शोकांतिका ‘नटसम्राट’
‘नटसम्राट’चा बंपर गल्ला, 9 दिवसात विक्रमी कमाई
‘नटसम्राट’ला मराठीतील सर्वोत्तम ओपनिंग, विक्रमी कमाई
‘नटसम्राट’ने रितेश देशमुखच्या ‘लय भारी’चा विक्रम मोडला
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
सांगली
भारत
राजकारण
क्राईम
Advertisement