एक्स्प्लोर
हैदराबादमध्ये आर्चीच्या उपस्थितीत सैराटचा 'झिंगाट' प्रिमियर
हैदराबादः महाराष्ट्राला गेल्या 9 आठवड्यांपासून याड लावणाऱ्या 'सैराट'चा स्पेशल शो आज हैदराबादमध्ये आयोजित करण्यात आला होता. या शोसाठी दिग्दर्शक नागराज मंजुळे, अभिनेत्री रिंकू राजगुरू आणि सैराटची टीम यावेळी हजर होती. तेलंगणातील महाराष्ट्र मित्र मंडळाने सैराटच्या टिमला आमंत्रित केलं होतं.
सैराट लवकरच तेलगू भाषेतही बनवला जाणार आहे. त्यामुळे दक्षिणेतही सैराटचा फिव्हर कायम राहतो का, ते पाहाणं औत्सुक्याचं ठरणार आहे. सैराटच्या शो साठी आलेल्यांनी कलाकारांसोबत डान्सही केला.
शो संपल्यानंतर मराठी प्रेक्षकांनी सैराटच्या टीमसोबत संवाद साधला. यावेळी सैराटच्या सर्वच चाहत्यांनी झिंगाट गाण्यावर ठेका धरला होता. अभिनयाने अवघ्या महाराष्ट्राला याड लावणारी आर्ची देखील चाहत्यांसोबत थिरकली.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
महाराष्ट्र
करमणूक
कोल्हापूर
Advertisement