एक्स्प्लोर
'रईस'च्या प्रमोशनसाठी पाकिस्तानी अभिनेत्री माहिरा भारतात येणार?
मुंबई : बॉलिवूडचा सुपरस्टार शाहरुख खान आणि अभिनेत्री माहिरा खान यांचा 'रईस' सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. मात्र, या सिनेमात अभिनेत्री माहिरा खानने काम केल्याने सिनेमा वादात सापडण्याची शक्यता अधिक आहे. कारण माहिरा खान पाकिस्तानी अभिनेत्री आहे. त्यामुळे माहिरा सिनेमाच्या प्रमोशनसाठी भारतात येणार का, हाही प्रश्न उपस्थित होतो आहे.
'रईस' सिनेमाचे निर्माते रितेश सिधवानी यांनी माहिराबाबत बोलताना सांगितले की, सिनेमाच्या प्रमोशनसाठी गरज भासल्यास अभिनेत्री माहिरा खानला भारतात घेऊन येऊ.
'रईस' सिनेमाच्या ट्रेलर लॉन्चिंगवेळी रितेश सिधवानी यांना विचारण्यात आलं की, 'रईस'च्या प्रचारासाठी माहिरा खान उपस्थित असेल? त्यावर बोलताना रितेश म्हणाले, "जेव्हा सिनेमाचं प्रमोशन सुरु करु आणि त्यावेळी जर माहिराची गरज भासली, तर तिलाही भारतात घेऊन येऊ."
रितेश सिधवानी पुढे म्हणाले, "मला नाही वाटत यासाठी सरकारकडून काही बंदी असेल आणि तिच्या व्हिसासाठी काही अडचण येईल."
'रईस' सिनेमा 1980 च्या दशकातील गुजरातवर आधारित आहे. एक दारु तस्कर रईस खानभोवती सिनेमाची कथा फिरते. राहुल ढोलकिया यांनी सिनेमाचे दिग्दर्शनक केले आहे. अभिनेता नवाजुद्दीन सिद्दिकीही प्रमुख भूमिकेत आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
निवडणूक
पुणे
विश्व
Advertisement