Rinku Rajguru: आर्चीनं शेअर केला 'बेशरम रंग' गाण्यावरील व्हिडीओ; नेटकरी कमेंट करत म्हणाले, 'एवढा पैसा आलाय तर...'
नुकताच एक खास व्हिडीओ रिंकूनं (Rinku Rajguru) शेअर केला आहे. काही नेटकऱ्यांनी या व्हिडीओला कमेंट करुन रिंकूला ट्रोल केलं आहे.
Rinku Rajguru: मराठी चित्रपटसृष्टीमधील प्रसिद्ध अभिनेत्री रिंकू राजगुरू (Rinku Rajguru) ही सोशल मीडियावर (Social Media) सक्रिय असते. रिंकू ही वेगवेगळ्या लूकमधील फोटो सोशल मीडियावर शेअर करते. नुकताच एक खास व्हिडीओ रिंकूनं शेअर केला आहे. या व्हिडीओमधील रिंकूच्या लूकनं अनेकांचे लक्ष वेधले. काही नेटकऱ्यांनी रिंकूनं शेअर केलेल्या व्हिडीओला कमेंट करुन तिला ट्रोल केलं आहे.
रिंकूनं शेअर केला व्हिडीओ:
रिंकूनं पठाण चित्रपटातील बेशरम रंग हे गाण्यावरील व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये रिंकू ही खास लूकमध्ये दिसत आहे. मोत्याचे इअरिंग्स, मोत्याचं गळ्यातलं आणि पिंक कलरचा प्रिंटेड ड्रेस अशा लूकमध्ये रिंकू दिसत आहे. रिंकूच्या या व्हिडीओला कमेंट करुन काही नेटकऱ्यांनी तिला ट्रोल केलं.
नेटकऱ्यांच्या कमेंट्स:
रिंकूनं शेअर केलेल्या व्हिडीओला एका नेटकऱ्यानं कमेंट केली, 'एवढा पैसा आलाय तर तो दात का काढत नाहीस...' तर दुसऱ्या युझरनं कमेंट केली, 'बोगस गाणं निवडलंस'. रिंकूच्या या व्हिडीओला जवळपास 266 नेटकऱ्यांनी कमेंट्स केल्या आहेत. तर 30 हजारपेक्षा जास्त युझर्सनं या व्हिडीओला लाइक केलं आहे.
पाहा व्हिडीओ:
View this post on Instagram
‘सैराट’ या चित्रपटातून रिंकू राजगुरूने अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं. या चित्रपटातील रिंकूच्या अभिनयानं अनेकांचे मन जिंकले. या चित्रपटामुळे रिंकू ही ‘आर्ची’या नावानं ओळखली जाऊ लागली. ‘सैराट’नंतर रिंकूने ‘मेकअप’, ‘कागर’ अशा मराठी चित्रपटांमध्ये काम केलं. याशिवाय ती नुकतीच ‘झुंड’ या हिंदी चित्रपटात झळकली होती.
वाचा इतर महत्वाच्या बातम्या:
Samir Choughule : 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' बंद होणार? समीर चौघुलेने एबीपी माझाला दिली माहिती