एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
26/11 आणि पुलवामा हल्ल्याला संघ जबाबदार, गायिका हार्ड कौरचा निशाणा
'मुंबईवरील 26/11 हल्ला, पुलवामा हल्ला यासह देशातील हल्ल्यांना संघ जबाबदार आहे, असा आरोप प्रसिद्ध गायिका हार्ड कौरने इन्स्टाग्रामवरुन केला आहे.
मुंबई : मुंबईवरील 26/11 हल्ल्यासह पुलवामा हल्ल्याला राष्ट्रीय स्वयंसेवक संघ जबाबदार आहे, असा आरोप गायिका हार्ड कौरने केला आहे. आपल्या वेरिफाईड इन्स्टाग्राम अकाऊण्टवरुन हार्ड कौरने सरसंघचालक मोहन भागवत यांचा फोटो शेअर करत तोफ डागली आहे. हार्ड कौरच्या अर्वाच्च भाषेतील पोस्टमुळे वाद उफाळला असून अनेकांनी सोशल मीडियावरुन तिच्यावर टीका केली आहे.
यापूर्वीही हार्ड कौरने सेलिब्रिटी आणि राजकीय नेत्यांविरोधात गरळ ओकली आहे. मात्र आता उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि मोहन भागवत यांच्यावर आगपाखड केल्याने तिला ट्रोलिंगचा सामना करावा लागत आहे. 'मुंबईवरील 26/11 हल्ला, पुलवामा हल्ला यासह देशातील हल्ल्यांना संघ जबाबदार आहे. गोडसेने गांधीजींची हत्या केल्यानंतर सरदार पटेलांनी तुमच्यावर बंदी आणली होती. भारताच्या निर्मितीनंतर अनेकांचा बळी या जातीयवादी पक्षाने घेतला' असा आरोपही हार्ड कौरने केला आहे.
'जागे व्हा. तुम्ही तुमच्या बहीण-मुलींवर बलात्कार होण्याची वाट पाहत आहात का? की त्यांनी तुमच्यावर हल्ला करण्यासाठी थांबलेले आहात?' असा सवालही हार्ड कौरने विचारला आहे. हार्ड कौरने एकामागून एक पोस्ट करत संघावर निशाणा साधला आहे. करकरे, गौरी लंकेश यांच्या हत्येचा आरोपही तिने संघावर घेतला आहे.
'योगी आदित्यनाथ सुपरहिरो असता, तर त्याचं नाव रेपमॅन योगी असतं. तुम्हाला आई, बहीण, मुलीचा बलात्कार हवा असल्यास त्याला फोन करा' अशी अत्यंत खालच्या भाषेत टीका केली आहे.View this post on Instagram
कोण आहे हार्ड कौर? 39 वर्षीय हार्ड कौर ही भारतीय रॅपर आणि हिप हॉप सिंगर आहे. तिचं मूळ नाव तारन कौर धिल्लन. हार्ड कौरने 'एक ग्लासी दो ग्लासी' हे 2007 मध्ये केलेलं रॅप साँग यूकेमध्ये गाजलं होतं. जॉनी गद्दार चित्रपटातील 'पैसा फेंक' या गाण्यामुळे तिची ओळख बॉलिवूडला झाली. त्यानंतर अगली और पगली, सिंग इज किंग, किस्मत कनेक्शन, बचना ऐ हसींनो, राम गोपाल वर्मा की आग, अजब प्रेम की गजब कहानी यासारख्या अनेक चित्रपटांसाठी तिने पार्श्वगायन केलं. 'झलक दिखला जा 3' या डान्स रिअॅलिटी शोमध्येही ती स्पर्धक होती.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
Advertisement