एक्स्प्लोर
शत्रुघ्न सिन्हांच्या बायोपिकसाठी सोनाक्षीची ‘या’ हिरोला पसंती
![शत्रुघ्न सिन्हांच्या बायोपिकसाठी सोनाक्षीची ‘या’ हिरोला पसंती Ranveer Would Be Suitable For Dads Biopic Says Ranveer Singh शत्रुघ्न सिन्हांच्या बायोपिकसाठी सोनाक्षीची ‘या’ हिरोला पसंती](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2016/09/22170527/sonakshi-270x202.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
मुंबई : ज्येष्ठ अभिनेते शत्रुघ्न सिन्हा यांच्या बायोपिकमध्ये शत्रुघ्न यांच्या भूमिकेसाठी रणवीर सिंह योग्य कलाकार असल्याचे अभिनेत्री सोनाक्षी सिन्हाने म्हटले आहे.
अभिनेते शत्रुघ्न सिन्हांनी याआधीच म्हटले होते की, बायोपिक बनवल्यास माझ्या भूमिकेसाठी रणवीर सिंह योग्य आहे. आता सोनाक्षी सिन्हानेही रणवीरला पसंती दिली आहे.
“माझ्या वडिलांच्या व्यक्तिमत्त्वाला साजेसं व्यक्तिमत्त्व कुणाचं असेल, तर ते रणवीर सिंहचं. रणवीर त्यांची भूमिका उत्तमपणे साकारु शकतो.”, असे सोनाक्षी म्हणाली. ‘लुटेरा’ सिनेमात सोनाक्षी आणि रणवीरने एकत्र काम केलं आहे.
त्यामुळे आता शत्रुघ्न सिन्हा यांच्या आयुष्यावर आधारित सिनेमा बनवला जाऊ शकतो का आणि त्यामध्ये सिन्हा बाप-लेकीच्या पसंतीनुसार अभिनेता रणवीर सिंह काम करतो का, हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे.
![Shatrughn](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2016/09/22170525/Shatrughn-580x347.jpg)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
क्राईम
मुंबई
बॉलीवूड
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)