एक्स्प्लोर
Advertisement
बॉक्स ऑफिसवर दुसऱ्या दिवशीही 'सिम्बा'ची मोठी झेप
पहिल्या दोन दिवसांचा गल्ला धरुन सिम्बाच्या खात्यात 44.05 कोटी रुपये जमा झाले आहेत. पहिल्या दिवसाच्या तुलनेत दुसऱ्या दिवशी 13 टक्क्यांची वाढ झाली.
मुंबई : रणवीर सिंगची मुख्य भूमिका असलेल्या 'सिम्बा' चित्रपटाने दुसऱ्या दिवशीही बॉक्स ऑफिसवर आपली घोडदौड कायम ठेवली आहे. दुसऱ्या दिवशी म्हणजेच शनिवारी सिम्बाने 23.33 कोटी रुपयांचा गल्ला जमवला. दोन दिवसात सिनेमाच्या बजेटच्या अर्धी रक्कम वसूल करण्यात निर्मात्यांना यश आलं आहे.
28 डिसेंबरला प्रदर्शित झालेल्या सिम्बाने पहिल्या दिवशी म्हणजेच शुक्रवारी 20.72 कोटी रुपयांची कमाई केली होती. सिम्बा हा रणवीरची भूमिका असलेला सर्वाधिक ओपनिंग मिळवणारा सिनेमा ठरला आहे. पहिल्या दोन दिवसांचा गल्ला धरुन सिम्बाच्या खात्यात 44.05 कोटी रुपये जमा झाले आहेत. पहिल्या दिवसाच्या तुलनेत दुसऱ्या दिवशी 13 टक्क्यांची वाढ झाली.
माऊथ पब्लिसिटी, अनुकूल रिव्ह्यू आणि नाताळच्या सुट्ट्या पाहता पहिल्या चार दिवसांतच सिम्बा शंभर कोटी रुपयांच्या क्लबमध्ये प्रवेश करेल, असा अंदाज वर्तवला जात आहे. पहिल्या वीकेंडला जोडून सोमवारी 31 डिसेंबर आल्यामुळे सिम्बा चांगली कामगिरी करण्याची आशा व्यक्त होत आहे. 80 कोटींच्या बजेटमध्ये तयार झालेला हा सिनेमा जगभरात चार हजार स्क्रीन्सवर प्रदर्शित झाला.
रिव्ह्यू : सिम्बा
रोहित शेट्टी दिग्दर्शित या चित्रपटात रणवीर सिंह आणि सैफची मुलगी सारा अली खान यांच्या मुख्य भूमिका आहेत. चित्रपटाच्या शेवटी 'सिंघम' अजय देवगनचं दर्शन घडतं, तर पुढच्या भागात 'वीर रघुवंशी' म्हणून अक्षय कुमार झळकणार असल्याचंही रोहित शेट्टीने जाहीर केलं आहे. आशुतोष राणा, व्रजेश हिर्जी, सोनू सूद, सुलभा आर्य यासारखे दिग्गज कलाकारही 'सिम्बा'मध्ये झळकले आहेत. त्याशिवाय सुचित्रा बांदेकर, अश्विनी काळसेकर, सिद्धार्थ जाधव, विजय पाटकर, सौरभ गोखले, अशोक समर्थ, वैदेही परशुरामी, नेहा महाजन अशा अनेक मराठी कलाकारांची फौजही सिनेमात पाहायला मिळत आहे. आतापर्यंत रणवीर सिंगच्या सिनेमांनी पहिल्या दिवशी केलेल्या कमाईत सिम्बा अव्वल ठरला आहे. गुरुवारी प्रदर्शित झालेल्या 'पद्मावत'ने 19 कोटी, 'गुंडे'ने 16.12 कोटी, 'गोलीयों की रासलीला- रामलीला'ने 16 कोटी, 'बाजीराव मस्तानी'ने 12.80 कोटी कमावले होते.अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
सोलापूर
मुंबई
निवडणूक
Advertisement