एक्स्प्लोर
Advertisement
रिव्ह्यू : सिम्बा
या सिनेमाची खरी नायिका वैदेही परशुरामीच वाटते. कारण सिनेमाची गोष्ट तिच्यामुळे सुरु होते आणि तिच्याभोवतीच फिरत राहाते. सारा अली खानला फक्त आणि फक्त टाईमपाससाठी घेतलंय असंच वाटतं.
मुंबई : रोहित शेट्टी हा बॉलिवूडमधला ब्रॅण्ड बनला आहे. तो जे काही करतो ते खूप दर्जेदार असतं का, तर अजिबात नाही पण तरीही बॉक्स ऑफिसवर गर्दी खेचण्याची ताकद त्याच्यात आहे. सिंबा अगदी तसाच आहे. टाळ्या घेणारे संवाद, तुफान अॅक्शन आणि लार्जर दॅन लाईफ हिरो.
खरं तर सिंघमचा पुढचा भाग म्हणून ही गोष्ट सहज चालून गेली असती, कारण सिनेमा ‘सिंघम’च्या बाहेर जात नाही.
या सिनेमाचा ट्रेलर रिलीज झाला होता तेव्हा सोशल मीडियावरची एक कमेंट वाचनात आली होती. ती अशी होती की सिंघम+दबंग = सिम्बा... आणि ते खरंय. सलमान खानचा मॅडनेस आणि अजय देवगणचा टफनेस रणवीरने मस्त उचललाय आणि सिनेमा पाहाताना ते सतत जाणवतं.
या सिनेमाची सगळ्यात मोठी जमेची बाजू आहे ती मराठमोळ्या कलाकारांची फौज आणि त्यांनी दिलेला परफॉर्मन्स. सिद्धार्थ जाधव, वैदेही परशुरामी, विजय पाटकर, नंदू माधव, सुचित्रा बांदेकर, अरुण नलावडे, नेहा महाजन, उदय टिकेकर, अनिल मांगे, साहिल जोशी, अश्विनी काळसेकर, सौरभ गोखले, अशोक समर्थ, गणेश यादव अशा मंडळींनी ‘सिम्बा’ घडवलाय.
यात मला सिद्धार्थचं विशेष कौतुक करायचं आहे. कारण जेव्हा रणवीरसारख्या स्टारसोबत फ्रेम शेअर करता तेव्हा कॅमेरा जरी तुमच्यावर असला तरी प्रेक्षकांच्या नजरा तुमच्यावर असणं जास्त महत्वाचं असतं. त्या नजरा खिळवून ठेवण्यात सिद्धार्थ पूर्णपणे यशस्वी झालाय. त्याचे पंचेस मस्त बसलेत.
या सिनेमाची खरी नायिका वैदेही परशुरामीच वाटते. कारण सिनेमाची गोष्ट तिच्यामुळे सुरु होते आणि तिच्याभोवतीच फिरत राहाते. सारा अली खानला फक्त आणि फक्त टाईमपाससाठी घेतलंय असंच वाटतं. कारण त्यांची लव्हस्टोरी (लव्हस्टोरी हा सिनेमाचा विषय नसला तरी) अजिबात अपिल होत नाही. मध्यंतरानंतर तर सारा अली खान फक्त एका संवादापुरती आहे.
सिम्बाचा आवाका तसा फार मोठा नाही. म्हणजे फार भव्य असं काही दिसत नाही. ज्या अॅक्शनसाठी रोहित शेट्टी प्रसिद्ध आहे, तशी अॅक्शनही पाहायला मिळत नाही. जेवढी गरज आहे तेवढंच करण्यावर रोहित शेट्टीने भर दिलाय. जो काही खर्च करायचा तो दोन गाण्यांवर केलाय.
संपूर्ण सिनेमात आपल्या लक्षात राहातात ती शेवटची पंधरा मिनिटं. ज्या पंधरा मिनिटात सिम्बाच्या मदतीला धावून येतो सिंघम. अजय देवगणची ही एण्ट्री म्हणजे सोहळा आहे. थिएटरमध्ये शिट्यांचा पाऊस पाडणारी आहे. म्हणजे दोन-अडीच तास आपण जे काही पाहिलेलं असतं ते विसरायला लावणारा हा सीन आहे. गंमत म्हणजे अजय देवगणचा तो ऑरा रणवीर सिंगच्या डोळ्यात दिसतो. अर्थात त्यानंतरही एक सरप्राईज रोहित शेट्टीनं ठेवलंय ते तुम्ही थिएटरमध्ये जाऊन बघा.
थोडक्यात जर तुम्हाला मसाला फिल्म्स आवडत असतील, मनसोहन देसाई स्टाईल सिनेमांचे तुम्ही फॅन असाल आणि अर्थात रणवीरचा मॅडनेस जर तुम्हाला प्रेमात पाडत असेल तर ‘सिम्बा’ तुमच्यासाठी आहे.
या सिनेमाला मी देतोय तीन स्टार्स
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
सोलापूर
मुंबई
निवडणूक
Advertisement