एक्स्प्लोर
Advertisement
दीपिकासोबत लग्नाच्या चर्चेवरून रणवीरने मौन सोडलं
मुंबई: अभिनेता रणवीर सिंहने दीपिकासोबतच्या लग्नाच्या चर्चेवरून आज मौन सोडलं. एका पत्रकाराने त्याला या संदर्भात प्रश्न विचारला असता, तो त्याच्यावर चांगलाच भडकला. त्याने पत्रकारांना चांगले प्रश्न विचारण्यास सांगितले.
गेल्या काही दिवसांपासून रणवीर आणि दीपिका पदुकोणच्या लग्नाच्या चर्चांनी चांगलाच जोर धरला आहे. एका मीडिया रिपोर्टनुसार, या दोघांचा साखरपुडाही झाल्याचे वृत्त होते.
विशेष म्हणजे, इरफान खानच्या 'मदारी' या चित्रपटाच्या स्पेशल स्क्रिनिंगवेळीही हे दोघेही एकत्रित आले होते. त्यामुळे या चर्चांना अधिकच उधाण आले होते.
त्यामुळे दीपिकाला रणवीरसोबतच्या साखरपुड्यासंदर्भात छेडले असता, तिने रणवीरकडे पाहून 'हम चले' असा इशारा केला होता. तसेच या वेळी दीपिकाने माध्यमांचे आभार मानून तिथून काढता पाय घेतला होता.
यावेळी रणवीरने पत्रकारांना उद्देशून ज्या चित्रपटाचे स्क्रिनिंग आहे, त्यावरील प्रश्न विचारावेत फालतू प्रश्न विचारू नयेत, असे आवाहन केले होते.
यानंतर रणवीर दीपिकाला घरी सोडण्यासाठी निघून गेला. दीपिकाला सोडून परत आल्यानंतरही त्याने माध्यमांना चित्रपटासंदर्भातीलच प्रश्न विचारण्याची विनंती केली. दीपिकाने याआधीच लग्नच्या वृत्ताचे खंडन केले आहे. तसेच आपल्याला अजून लग्न करण्याची घाई नसल्याचे सांगितले होते.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
महाराष्ट्र
नाशिक
बॉलीवूड
Advertisement