एक्स्प्लोर
राणीने पहिल्यांदा शेअर केला आदिराचा फोटो!
मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री राणी मुखर्जी आणि दिग्दर्शक आदित्य चोप्राची मुलगी आदिरा आज एक वर्षाची झाली. या निमित्ताने राणीने तिच्या परीची पहिली झलक चाहत्यांना दाखवली आहे. यासोबतच राणीने मुलीला एक पत्रही लिहिलं आहे.
राणी मुखर्जीने 9 डिसेंबर 2015 रोजी आदिराला जन्म दिला होता. राणी आणि आदित्य यांच्या नावातून आदिरा हे नाव ठेवण्यात आलं आहे. पण आदिला तिला मीडियासमोर आणण्याचं राणीने कायम टाळलं.
आज एक वर्ष पूर्ण झाल्यानंतर राणीने आदिरासोबतचा फोटो शेअर केला. यशराज फिल्मच्या ट्विटर हॅण्डलवर हा फोटो आणि पत्र पोस्ट करण्यात आलं आहे.
या पत्रात राणी लिहिते, ‘माझं आदिरावर खूप प्रेम आहे. मी तिच्याशिवाय जगू शकत नाही. त्याच्या जन्मानंतर माझं आयुष्य बदललं आहे. पण एका बाळाचं पालनपोषण करणं अतिशय कठीण काम आहे. कारण तुम्ही स्वत:साठी जगणं विसरुन जाता आणि तुमच्या बाळासाठी जगण्यास सुरुवात करता. बाळाने तुम्हाला आईच्या रुपात नवा जन्म दिला आहे. मी रात्री झोपू शकत नाही. दिवसाही मी झोपू शकत नाही. मी त्या सर्व मातांबद्दल विचार करते, ज्यांना मुलं आहेत. माझ्यासोबत जे होतंय ते त्यांच्यासोबतही होत असेल का? मी सर्व मातांना सलाम करते. आदिराचा माझ्यापोटी जन्म झाल्याबद्दल मी देवाचे आभार मानते. मला माहित नाही, आयुष्याच्या या टप्प्यात कोणी मला समजून घेऊ शकतं की नाही. पण मी माझं आयुष्य जगत आहे. कोणत्याही भीतीशिवाय, शूरपणे, शिस्तीत आदिराला वाढवेन, अशी मला आशा आहे. सगळ्यांना तिचा अभिमान वाटावा, अशी माझी इच्छा आहे. दुसरं कोणी नसेल तरीही मला तिचा कायम अभिमान असेल."
https://twitter.com/yrf/status/806928838093484032
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
निवडणूक
पुणे
विश्व
Advertisement