एक्स्प्लोर

Randeep Hooda : रणदीप हुड्डाला फेमस का व्हायचं होतं, कशी झाली बॉलिवूडमध्ये एन्ट्री? माझा कट्ट्यावर शेअर केला गंमतीशीर किस्सा

Randeep Hooda Majha Katta : रणदीप हुड्डाने 'मॉन्सून वेडिंग' या सिनेमाच्या माध्यमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. आता त्याचा 'स्वातंत्र्यवीर सावरकर' (Swatantra Veer Savarkar) हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीसाठी सज्ज आहे.

Randeep Hooda : अष्टपैलू अभिनेता रणदीप हुड्डाने (Randeep Hooda) वयाच्या पाचव्या-सहाव्या वर्षी अभिनेता व्हायचं ठरवलं होतं. फेमस होण्याच्या उद्देशाने त्याने बॉलिवूडमध्ये एन्ट्री केली. एबीपी माझाच्या 'माझा कट्टा' या विशेष कार्यक्रमात अभिनेत्याने याबद्दलचा गंमतीशीर किस्सा शेअर केला आहे.

रणदीपची बॉलिवूडमध्ये एन्ट्री कशी झाली? (Randeep Hooda Bollywood Entry)

बॉलिवूड एन्ट्रीबद्दल बोलताना रणदीप म्हणाला,"लहानपणापासून अभिनेता होण्याचं माझं स्वप्न होतं. हरियाणामध्ये बालपण गेलं असल्याने गोष्टी सोप्या नव्हत्या. शाळेत असताना मी रंगभूमीसोबत जोडला गेलो. छोट्या नाटिकांमध्ये काम करत असताना या क्षेत्राबद्दल आणखी रुची निर्माण झाली".

किस्सा शेअर करत रणदीप म्हणाला,"पाच-सहा वर्षांचा असताना घराजवळ एका व्यक्तीचं निधन झालं होतं. पण तरी त्यांच्याआसपास कुटुंबातील मोजके सदस्य सोडून कोणी नव्हतं. त्यावेळी माझ्या मनात विचार आला माझं निधन होईल तेव्हा असं चित्र असता कामा नये. त्यासाठी आपण फेमस होणं गरजेचं आहे. पुढे एक दिवस वडिलांना मी अभिनेता व्हायचा विचार करत असल्याचं सांगितलं. त्यावेळी वडिलांनी सल्ला दिला की,"तुला जे करायचं ते कर पण म्हातारपणी आमच्यासाठी ओझं होऊ नको". 

रणदीपने पुढे मुंबई गाठली. त्यावेळी नसीरुद्दीन शाह (Naseeruddin Shah) यांनी मोलाचं मार्गदर्शन केलं. त्यांचा हात त्याने कधी सोडला नाही. 'मॉन्सून वेडिंग' या सिनेमाच्या माध्यमातून त्याने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं.पुढे राम गोपाळ वर्मांनी त्याला काम दिलं. विश्राम सावंत यांच्याकडून त्याने दिग्दर्शनाचं तंत्र शिकलं. सत्यपरिस्थितीवर सिनेमा बनवायला त्याला आवडतो". 

रणदीपच्या सिनेमांबद्दल जाणून घ्या... (Randeep Hooda Movies)

मग वन्स अपॉन अ टाईम इन मुंबई, साहेब बिबी ऑऱ गँगस्टर,  हायवे, किक, सुलतान अशा अनेक सिनेमांच्या माध्यमातून रणदीपने आपल्या अभिनयाची छाप पाडली आहे. रंग रसियामधली राजा रवी वर्माची भूमिका असो, सरबजीतमधल्या सरबजीतची,किंवा एका महिन्यात साडे तेरा कोटी लोकांनी पाहिलेल्या एक्सट्रॅक्शनमधल्या साजू रावची..तो मोजकेच रोल करतो पण प्रेक्षकांच्या मनात दीर्घकाळ छाप सोडतो. रणदीप आता स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या भूमिकेत दिसणार आहे. त्याचा 'स्वातंत्र्यवीर सावरकर' (Swatantra Veer Savarkar) हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीसाठी सज्ज आहे. 22 मार्च 2024 रोजी हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. रणदीपच्या या सिनेमाची प्रेक्षकांना उत्सुकता आहे.

संबंधित बातम्या

Randeep Hooda : "सिनेमा बनवण्यासाठी घर विकलं, 30 किलो वजन कमी केलं"; 'स्वातंत्र्यवीर सावरकर' सिनेमाला प्रोपगंडा म्हणणाऱ्यांना रणदीप हुड्डाचं सडेतोड उत्तर

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

विधानसभेची खडाजंगी: बीड मतदारसंघात कोण बाजी मारणार, संदीप क्षीरसागर तुतारी फुंकणार की घड्याळ चालणार, ज्योती मेटेही मैदानात
विधानसभेची खडाजंगी: बीड मतदारसंघात कोण बाजी मारणार, संदीप क्षीरसागर तुतारी फुंकणार की घड्याळ चालणार, ज्योती मेटेही मैदानात
बंद सम्राटांना बंद करण्याची वेळ आलीय, धारावी बंद करु, रिफायनरी बंद करु, अरे काय सुरु करणार ते सांगा, मुख्यमंत्र्यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
बंद सम्राटांना बंद करण्याची वेळ आलीय, धारावी बंद करु, रिफायनरी बंद करु, अरे काय सुरु करणार ते सांगा, मुख्यमंत्र्यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
मुंबई बाळासाहेंबाच्या सिद्धांतांचे शहर, उद्धव ठाकरेंना चॅलेंज; शिवाजी पार्कवरील शेवटच्या सभेत काय म्हणाले मोदी
मुंबई बाळासाहेंबाच्या सिद्धांतांचे शहर, उद्धव ठाकरेंना चॅलेंज; शिवाजी पार्कवरील शेवटच्या सभेत काय म्हणाले मोदी
कारखाने विकत घ्यायला मी काही महाराष्ट्रभर हिंडलो नाही, जयंत पाटलांचा अजित पवारांवर हल्लाबोल
कारखाने विकत घ्यायला मी काही महाराष्ट्रभर हिंडलो नाही, जयंत पाटलांचा अजित पवारांवर हल्लाबोल
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Raj Thackeray Full Speech : वसंत मोरेंना बाजूला करत शहराध्यक्ष झालेल्या बाबरांसाठी राज ठाकरेंचं भाषणRaj Thackeray Full Speech : वसंत मोरेंना बाजूला करत शहराध्यक्ष झालेल्या बाबरांसाठी राज ठाकरेंचं भाषणChhagan Bhujbal  : मोदींच्या सभेला राष्ट्रवादीच्या नेत्यांची दांडी? भुजबळांनी सांगितलं कारणZero Hour : निवडणुकीचा प्रचार शिगेला, प्रचाराचा सखोल आढावा झीरो अवरमध्ये

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
विधानसभेची खडाजंगी: बीड मतदारसंघात कोण बाजी मारणार, संदीप क्षीरसागर तुतारी फुंकणार की घड्याळ चालणार, ज्योती मेटेही मैदानात
विधानसभेची खडाजंगी: बीड मतदारसंघात कोण बाजी मारणार, संदीप क्षीरसागर तुतारी फुंकणार की घड्याळ चालणार, ज्योती मेटेही मैदानात
बंद सम्राटांना बंद करण्याची वेळ आलीय, धारावी बंद करु, रिफायनरी बंद करु, अरे काय सुरु करणार ते सांगा, मुख्यमंत्र्यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
बंद सम्राटांना बंद करण्याची वेळ आलीय, धारावी बंद करु, रिफायनरी बंद करु, अरे काय सुरु करणार ते सांगा, मुख्यमंत्र्यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
मुंबई बाळासाहेंबाच्या सिद्धांतांचे शहर, उद्धव ठाकरेंना चॅलेंज; शिवाजी पार्कवरील शेवटच्या सभेत काय म्हणाले मोदी
मुंबई बाळासाहेंबाच्या सिद्धांतांचे शहर, उद्धव ठाकरेंना चॅलेंज; शिवाजी पार्कवरील शेवटच्या सभेत काय म्हणाले मोदी
कारखाने विकत घ्यायला मी काही महाराष्ट्रभर हिंडलो नाही, जयंत पाटलांचा अजित पवारांवर हल्लाबोल
कारखाने विकत घ्यायला मी काही महाराष्ट्रभर हिंडलो नाही, जयंत पाटलांचा अजित पवारांवर हल्लाबोल
तुमच्या आमदाराने मला पाणी पाजलं; अजित पवारांच्या वक्तव्याने सभेत हशा पिकला; नेमका काय किस्सा घडला?
तुमच्या आमदाराने मला पाणी पाजलं; अजित पवारांच्या वक्तव्याने सभेत हशा पिकला; नेमका काय किस्सा घडला?
Video: 'राहुल गांधींनीच राष्ट्रवादीत जाण्याचा प्रस्ताव दिला'; माझा कट्टावर राधाकृष्ण विखे पाटलांचा गौप्यस्फोट
Video: 'राहुल गांधींनीच राष्ट्रवादीत जाण्याचा प्रस्ताव दिला'; माझा कट्टावर राधाकृष्ण विखे पाटलांचा गौप्यस्फोट
Rohit Pawar on Devendra Fadnavis : गुंड, धमक्यांनी निवडणुका जिंकता येत नाही, फडणवीस आणि त्यांच्या चेल्याचपाट्यांनी लक्षात घ्यावं; रोहित पवारांची सडकून टीका
गुंड, धमक्यांनी निवडणुका जिंकता येत नाही, फडणवीस आणि त्यांच्या चेल्याचपाट्यांनी लक्षात घ्यावं; रोहित पवारांची सडकून टीका
मोठी बातमी! राज्यात 18 ते 20 नोव्हेंबर शाळांना सुट्टी; शिक्षकांच्या गैरहजेरीमुळे शासनाचा मोठा निर्णय
मोठी बातमी! राज्यात 18 ते 20 नोव्हेंबर शाळांना सुट्टी; शिक्षकांच्या गैरहजेरीमुळे शासनाचा मोठा निर्णय
Embed widget