एक्स्प्लोर

राम गोपाल वर्मा यांचं कोरोना पॉझिटिव्ह असल्याचं ट्विट; नेटकरी म्हणाले अभिनंदन

कोरोना व्हायरसची लागण झाल्याचे ट्विट करत राम गोपाल वर्मा यांनी सर्वांनाच धक्का दिला. त्यानंतर हे एप्रिल फूल असल्याचे वर्मा यांनी सांगितले. मात्र, नियमांचे उल्लघन केल्याबद्दल त्यांच्यावर कारवाई होणार का? असा प्रश्न विचारला जात आहे.

मुंबई : कोरोना व्हायरसच्या संकटामुळे नागरिकांच्या मनात भीतीचे वातावरण निर्माण झालं आहे. अशातच आज एक एप्रिल असल्याने कोणी कोरोनावरुन अफवा पसरवू नये, अन्यथा कारवाई करण्याचा इशारा राज्य सरकार आणि पोलिसांना दिला होता. मात्र, तरीही दिग्दर्शक राम गोपाल वर्मा यांनी स्वतःला कोरोनाची लागण झाल्याचे ट्विट केलं. मात्र, हे ट्विट त्यांना चांगलेच महागात पडल्याचे दिसते. कारण, भावना दुखावल्याने अनेक चाहत्यांच्या तिखट प्रतिक्रिया उमटल्या. त्यानंतर उपरती येऊन माझ्या डॉक्टरने मला फूल केल्याचं त्यांनी सांगितले. दरम्यान, एका जबाबदार व्यक्तीने नियमांचे उल्लघन केल्याने प्रशासन राम गोपाल वर्मा यांच्यावर कारवाई करणार का? असे प्रश्न आता सोशल मीडियावर विचारले जात आहे.

दरवर्षी एक एप्रिल हा दिवस लोकांना फूल म्हणजे फसवून साजरा केला जातो. मात्र, यंदा राज्यात आणि देशात कोरोना विषाणूचं संकट आहे. कोरोनामुळे संपूर्ण देशात लॉकडाऊन जाहीर करण्यात आले आहे. नागरिकांच्या मनात या आजाराविषयी भीतीचे वातावरण आहे. अशा स्थितीत आजच्या दिवशी कोणीही कुणाला फसवू नये. अफवा पसरवू नये अन्यथा कारवाई केली जाईल, असं पोलीस आणि प्रशासनाकडून सांगण्यात आलं होतं. कारण, सध्या सोशल मीडियावर आधीच कोरोना विषयी अनेक अफवा पसरवल्या जात आहे.

निजामुद्दीनसारखे प्रकरण महाराष्ट्रात खपवून घेणार नाही : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

कोरोना झाल्याबद्दल अभिनंदन हिंदी चित्रपट सृष्टीतील प्रसिद्ध दिग्दर्शक राम गोपाल वर्मा यांनी नऊ वाजून 37 मिनिटांनी एक ट्विट केलं. ज्यात माझी कोरोनाची टेस्ट पॉझिटिव्ह आल्याचं माझ्या डॉक्टरांनी सांगितल्याचं लिहलं होतं. दरम्यान, यावर काही चाहत्यांनी चिंता व्यक्त केली. तर, काही जणांनी राम गोपाल वर्मा कोरोना झाल्याबद्दल अभिनंदन अशा उपहासात्मक प्रतिक्रिया दिल्या. बऱ्याच चाहत्यांना राम गोपाल वर्मा यांनी एप्रिल फूल केल्याचे समजले. काही चाहत्यांनी एकदम तिखट प्रतिक्रिया दिल्यानंतर 9 वाजून 51 मिनिटांनी राम गोपाल वर्मा यांनी दुसरे ट्विट केलं. ज्यात तुम्हाला निराश केलं त्याबद्दल माफ करा, माझ्या डॉक्टरने मला एप्रिल फूल केल्याचे लिहले. यानंतर चाहते आणखीच चिडल्याचे पाहायला मिळाले. तुम्ही कोविड 19 अवार्ड मिस केला, असा टोलाही एका चाहत्याने लगावला. दरम्यान, यानंतर राम गोपाल वर्मा यांनी यावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला. सध्याच्या गंभीर परिस्थितीत थोडी गम्मत करण्याचा प्रयत्न केला. कोणाच्या भावना दुखावल्या असतील तर मी माफी मागतो.

Corona Effect | कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विम्बल्डन स्पर्धेचं आयोजन रद्द

राम गोपाल वर्मांवर कारवाई होणार का? कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर कोणीही एप्रिल फूल करू नये. जर कोणी तसा प्रयत्न केला तर त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल, असा इशारा प्रशासनाने दिला होता. यासाठी सोशल मीडियावर सायबर पोलिसांची करडी नजर आहे. असे असतानाही राम गोपाल वर्मा यांनी याचे उल्लघन केलंय. त्यामुळे त्यांच्यावर आता कारवाई होणार का? असा प्रश्न सोशल मीडियातून उपस्थित होत आहे. Central Health Ministery | 24 तासात 386 नव्या कोरोना रूग्णांची नोंद, सोशल डिस्टन्सिंगचे पालन करा : आरोग्य मंत्रालय
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 डिसेंबर 2024 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 डिसेंबर 2024 | मंगळवार
फुलांपासून आयफेल टॉवर! फुलं, धान्यांपासून साकारल्या विविध प्रतिकृती
फुलांपासून आयफेल टॉवर! फुलं, धान्यांपासून साकारल्या विविध प्रतिकृती
Australia vs India, 3rd Test : बुमराह-आकाश दीपने राहुल द्रविड-लक्ष्मणच्या 'त्या' यादगार खेळीची तब्बल 23 वर्षांनी आठवण करून दिली!
बुमराह-आकाश दीपने राहुल द्रविड-लक्ष्मणच्या 'त्या' यादगार खेळीची तब्बल 23 वर्षांनी आठवण करून दिली!
Russia-Ukraine war : युक्रेन हल्ल्यात रशियाचे अण्वस्त्र प्रमुख ठार; इलेक्ट्रिक स्कूटरमध्ये 300 ग्रॅम टीएनटी पेरून हत्या! चार महिन्यात तीन रशियन अधिकाऱ्यांच्या हत्या
युक्रेन हल्ल्यात रशियाचे अण्वस्त्र प्रमुख ठार; इलेक्ट्रिक स्कूटरमध्ये 300 ग्रॅम टीएनटी पेरून हत्या! चार महिन्यात तीन रशियन अधिकाऱ्यांच्या हत्या
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Top 100 : 100 headlines 17 December 2024 एबीपी माझा लाईव्ह ABP LIVEChhagan Bhujbal Full PC : छगन भुजबळ अखेर बोलले, पहिला वार थेट अजितदादांवर!Beed Sarpanch Death CCTV : बीड सरपंच हत्येचा नवा व्हिडीओ, संतोषचा भाऊ, आरोपी आणि PSIची भेटABP Majha Marathi News Headlines 5PM TOP Headlines 5 PM 17 December 2024

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 डिसेंबर 2024 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 डिसेंबर 2024 | मंगळवार
फुलांपासून आयफेल टॉवर! फुलं, धान्यांपासून साकारल्या विविध प्रतिकृती
फुलांपासून आयफेल टॉवर! फुलं, धान्यांपासून साकारल्या विविध प्रतिकृती
Australia vs India, 3rd Test : बुमराह-आकाश दीपने राहुल द्रविड-लक्ष्मणच्या 'त्या' यादगार खेळीची तब्बल 23 वर्षांनी आठवण करून दिली!
बुमराह-आकाश दीपने राहुल द्रविड-लक्ष्मणच्या 'त्या' यादगार खेळीची तब्बल 23 वर्षांनी आठवण करून दिली!
Russia-Ukraine war : युक्रेन हल्ल्यात रशियाचे अण्वस्त्र प्रमुख ठार; इलेक्ट्रिक स्कूटरमध्ये 300 ग्रॅम टीएनटी पेरून हत्या! चार महिन्यात तीन रशियन अधिकाऱ्यांच्या हत्या
युक्रेन हल्ल्यात रशियाचे अण्वस्त्र प्रमुख ठार; इलेक्ट्रिक स्कूटरमध्ये 300 ग्रॅम टीएनटी पेरून हत्या! चार महिन्यात तीन रशियन अधिकाऱ्यांच्या हत्या
भाजपकडून राम शिंदेंना मोठी जबाबदारी; विधानपरिषद सभापतीपदासाठी नावावर शिक्कामोर्तब; अर्ज भरणार
भाजपकडून राम शिंदेंना मोठी जबाबदारी; विधानपरिषद सभापतीपदासाठी नावावर शिक्कामोर्तब; अर्ज भरणार
Beed Santosh Deshmukh : बीड सरपंच हत्याप्रकरणात मोठा ट्विस्ट! PSI आणि आरोपीच्या भेटीचा CCTV
Beed Santosh Deshmukh : बीड सरपंच हत्याप्रकरणात मोठा ट्विस्ट! PSI आणि आरोपीच्या भेटीचा CCTV
Santosh Deshmukh VIDEO : आदल्या दिवशी आरोपी आणि PSI राजेश पाटलांची हॉटेलमध्ये भेट, दुसऱ्या दिवशी संतोष देशमुखांचा मर्डर; पोलिसांना सगळंच माहिती होतं का? 
आदल्या दिवशी आरोपी आणि PSI राजेश पाटलांची हॉटेलमध्ये भेट, दुसऱ्या दिवशी संतोष देशमुखांचा मर्डर; पोलिसांना सगळंच माहिती होतं का? 
Rapper Badshah : अल्लू अर्जुननंतर आता रॅपर बादशाह सुद्धा पोलिस कारवाईत अडकला! नेमकं प्रकरण काय?
अल्लू अर्जुननंतर आता रॅपर बादशाह सुद्धा पोलिस कारवाईत अडकला! नेमकं प्रकरण काय?
Embed widget