Rajinikanth : हिंदी सिनेसृष्टी गाजवण्यासाठी रजनीकांत सज्ज; 24 वर्षांनी करणार बॉलिवूडपट!
Rajinikanth : दाक्षिणात्य सुपरस्टार रजनीकांत आता 24 वर्षांनी ओटीटीवर पदार्पण करण्यासाठी सज्ज आहे.
Rajinikanth : दाक्षिणात्य सुपरस्टार रजनीकांतचा (Rajinikanth) मोठा चाहतावर्ग आहे. दाक्षिणात्य मनोरंजनसृष्टीसह बॉलिवूडमध्येदेखील त्यांची चांगलीच क्रेझ आहे. आपल्या दर्जेदार अभिनयाने त्यांनी चाहत्यांमध्ये छाप पाडली आहे. रजनीकांत यांनी दाक्षिणात्य सिनेमांसह बॉलिवूड सिनेमांतही काम केलं आहे. त्यांचे हे सिनेमे प्रेक्षकांच्या पसंतीस उतरले आहेत. पण दिग्गज सुपरस्टार गेल्या 24 वर्षांपासून बॉलिवूडपासून दूर आहेत. पण आता 24 वर्षांनी त्यांनी बॉलिवूडपटात काम करण्याचा निर्णय घेतला आहे. बॉलिवूड सिनेसृष्टी गाजवण्यासाठी रजनीकांत आता सज्ज आहेत.
रजनीकांत यांचं बॉलिवूडचे लोकप्रिय सिने-निर्माते साजिद नाडियाडवाला यांच्यासोबत बोलणं सुरू आहे. साजिद नाडियाडवाला (Sajid Nadiadwala) यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांना यासंदर्भात माहिती दिली आहे.
रजनीकांत अन् साजिद नाडियाडवाला एकत्र
साजिद नाडियाडवाला यांनी सोशल मीडियावर रजनीकांत यांच्यासोबतचा एक फोटो शेअर केला आहे. फोटो शेअर करत त्यांनी लिहिलं आहे,"महान रजनीकांत यांच्यासोबत काम करणं अभिमानास्पद आहे. एका नव्या प्रवासाची आम्ही एकत्र सुरुवात करत आहोत. साजिद नाडियाडवाला यांनी सलमान खानच्या (Salman Khan) 'किक' या सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळली होती.
It's a true honour to collaborate with the legendary @rajinikanth Sir! Anticipation mounts as we prepare to embark on this unforgettable journey together!
— Nadiadwala Grandson (@NGEMovies) February 27, 2024
- #SajidNadiadwala @WardaNadiadwala pic.twitter.com/pRtoBtTINs
साजिद नाडियाडवाला यांनी दिग्दर्शित केलेला शेवटचा सिनेमा वरुण धवनचा 'बवाल' आहे. तर दुसरीकडे रजनीकांत यांनी 'बुलंदी' या बॉलिवूडपटात शेवटचं काम केलं होतं. 2000 मध्ये हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. 'बुलंदी' या सिनेमात रजनीकांतसह अनिल कपूर, रवीना टंडन आणि रेखा हे कलाकार मुख्य भूमिकेत होते. तर 'लाल सलाम' या सिनेमात ते शेवटचे झळकले. त्यांचा हा सिनेमा प्रेक्षकांच्या पसंतीस उतरण्यात कमी पडला. ऐश्वर्या रजनीकांतने या सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळली होती.
कोट्यवधींची कमाई करणारे रजनीकांत (Rajinikanth Net Worth)
रजनीकांत यांनी आपल्या अभिनय करिअरची सुरुवात दोन हजार रुपयांपासून केली आहे. करिअरच्या सुरुवातीला त्यांनी श्रीदेवींसोबत एका सिनेमा केला होता. या सिनेमातील भूमिकेसाठी त्यांना दोन हजार रुपयांचं मानधन मिळालं होतं. पण आजच्या घडीला रजनीकांत एका सिनेमासाठी 100 कोटींपेक्षा कमी मानधन घेत नाहीत. 'जेलर' या सिनेमासाठी त्यांनी 110 कोटी रुपये आकारले होते. सिनेमांसह रजनीकांत यांना महागड्या, आलिशान गाड्यांचीदेखील आवड आहे. त्यांच्याकडे अनेक महागड्या गाड्या आहेत.
संबंधित बातम्या