Oscars 2023: ऑस्कर पुरस्कार सोहळ्याला हजेरी लावण्यासाठी राजामौली, ज्युनियर एनीआर आणि राम चरण यांना मोजावे लागले लाखो रुपये; एका तिकीटाची किंमत माहितीये?
दिग्दर्शक एस. एस. राजामौली (S. S. Rajamouli), ज्युनियर एनीआर आणि राम चरण (Ram Charan) यांना ऑस्कर पुरस्कार सोहळ्याचे तिकीट खरेदी करावे लागले.
Oscars 2023: यंदाचा ऑस्कर पुरस्कार (Oscars 2023) सोहळा हा भारतासाठी खास होता. कारण ऑस्कर- 2023 पुरस्कार सोहळ्यात भारतानं दोन कॅटेगिरीमधील पुरस्कार पटकावले. नाटू नाटू (Naatu Naatu) या गाण्याने ऑस्कर-2023 (Oscar 2023) पुरस्कार सोहळ्यात बेस्ट ओरिजनल साँग कॅटेरगरीमधील पुरस्कार जिंकला. आरआरआर या चित्रपटाच्या संपूर्ण टीमनं ऑस्कर पुरसकार सोहळ्याला हजेरी लावली. पण दिग्दर्शक एस. एस. राजामौली (S. S. Rajamouli), ज्युनियर एनीआर (Jr NTR) आणि राम चरण (Ram Charan) यांना ऑस्कर पुरस्कार सोहळ्याचे तिकीट खरेदी करावे लागले.
ऑस्कर 2023 पुरस्कार सोहळ्याच्या तिकीटाची किंमत किती?
एका वृत्तसंस्थेनं दिलेल्या माहितीनुसार, ऑस्कर 2023 पुरस्कार सोहळ्याच्या एका तिकीटाची किंमत 25,000 डॉलर होती म्हणजेच जे सुमारे 20.6 लाख रुपये आहे. केवळ ऑस्कर पुरस्कार विजेते आणि त्यांचे कुटुंबीय विनामूल्य पाससाठी पात्र होते, तर इतर प्रत्येकाला कार्यक्रम थेट पाहण्यासाठी तिकिटासाठी पैसे द्यावे लागले. त्यामुळे एस. एस. राजामौली ज्युनियर एनीआर, राम चरण आणि त्यांच्या कुटुंबातील व्यक्तींना ऑस्कर पुरस्कार सोहळा पाहण्यासाठी लाखो रुपये खर्च करावे लागले.
We have won!!
— Ram Charan (@AlwaysRamCharan) March 13, 2023
We have won as Indian Cinema!!
We won as a country!!
The Oscar Award is coming home!@ssrajamouli @mmkeeravaani @tarak9999 @boselyricist @DOPSenthilKumar @Rahulsipligunj @kaalabhairava7 #PremRakshith @ssk1122 pic.twitter.com/x8ZYtpOTDN
नाटू नाटू गाण्याला ऑस्कर पुरस्कार सोहळ्यात मिळाले 'स्टँडिंग ओव्हेशन'
ऑस्कर पुरस्कार (Oscars 2023) सोहळ्यात गायक काल भैरव आणि राहुल सिपलीगुंज यांनी 'नाटू नाटू' हे गाणं गायलं. काही कलाकारांनी 'नाटू नाटू' गाण्यावर नृत्य देखील केलं. स्टेजवरील काल भैरव आणि राहुल सिपलीगुंज यांच्या एनर्जीने अनेकांचे लक्ष वेधले. नाटू नाटू गाण्याची आयकॉनिक स्टेप देखील स्टेजवरील कलाकारांनी केली. काल भैरव आणि राहुल सिपलीगुंज यांचा परफॉर्मन्स झाल्यानंतर प्रेक्षकांकडून त्यांना 'स्टँडिंग ओव्हेशन' मिळाले.
आरआरआर हा 24 मार्च 2022 रोजी रिलीज झाला होता. या चित्रपटाने केवळ भारतातच नाही तर जगभरातील बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला. या चित्रपटात राम चरण आणि ज्युनियर एनटीआर यांच्यासोबतच आलिया भट्ट आणि अजय देवगण यांनी देखील प्रमुख भूमिका साकारली. या चित्रपटाचं दिग्दर्शन एस. एस. राजामौली यांनी केलं. एम एम कीरावानी यांनी
वाचा इतर महत्वाच्या बातम्या:
Oscar Awards 2023: भारतीय चित्रपटसृष्टीची मोठी मुसंडी; RRR मधील 'नाटू नाटू' गाण्याला ऑस्कर अवॉर्ड