एक्स्प्लोर

Pushpa 2 OTT Release: ठरलं! थिएटरनंतर 'या' ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज होणार अल्लू अर्जुनचा 'पुष्पा-2'

Pushpa 2 OTT Release: 15 ऑगस्ट 2024 रोजी पुष्पा-2 हा चित्रपट थिएटरमध्ये रिलीज होत आहे. अशातच आता या चित्रपटाच्या ओटीटी रिलीजची देखील घोषणा करण्यात आली आहे.

Pushpa 2 OTT Release: अभिनेता  अल्लू अर्जुनचा (Allu Arjun) 'पुष्पा 2' (Pushpa 2) हा 2024 मधील बहुप्रतिक्षित सिनेमांपैकी एक आहे. या चित्रपटाची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत.  या चित्रपटाची रिलीज डेट अल्लू अर्जुननं काही महिन्यांपूर्वी जाहीर केली होती. 15 ऑगस्ट 2024 रोजी पुष्पा-2 हा चित्रपट थिएटरमध्ये रिलीज होत आहे. अशातच आता या चित्रपटाच्या ओटीटी रिलीजची देखील घोषणा करण्यात आली आहे. थिएटरमध्ये रिलीज झाल्यानंतर पुष्पा-2 कोणत्या ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज होणार? जाणून घेऊयात...

कोणत्या ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज होणार पुष्पा-2? (Pushpa 2 OTT Release)

'पुष्पा 2' या चित्रपटाच्या थिएटर रिलीजनंतर हा चित्रपट नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज होणार आहे. याबाबत Netflix India च्या इंस्टाग्राम पेजवर एक पोस्ट शेअर करण्यात आली आहे. या पोस्टमध्ये लिहिण्यात आलं,  "पुष्पा येणार आहे आणि तो RULE करणार आहे! Pushpa2 नियम लवकरच Netflix वर तेलुगु, तमिळ, मल्याळम, कन्नड आणि हिंदी भाषेमध्ये येत आहे. थिएटर रिलीजनंतर!"

View this post on Instagram
 
A post shared by Netflix India (@netflix_in)

'पुष्पा 2' कधी होणार रिलीज?

'पुष्पा 2' हा चित्रपट 15 ऑगस्ट 2024 रोजी थिएटरमध्ये रिलीज होणार आहे. अल्लू अर्जुनला 'पुष्पा: द राइज' या चित्रपटातील उत्कृष्ट अभिनयासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्याच्या श्रेणीतील राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारानं गौरवण्यात आलं. 

पुष्पा द राइज (Pushpa: The Rise - Part 1) हा चित्रपट 2021 मध्ये प्रेक्षकांच्या भेटीस आला होता. या चित्रपटातील श्रीवल्ली,सामी सामी,ओ अंटवा  या गाण्यांना प्रेक्षकांची पसंती मिळाली. या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला.

'पुष्पा: द राइज' या चित्रपटामध्ये अल्लु अर्जुन, रश्मिका मंदाना, फहाद फासिल, जगदीश, अजय घोष, सुनील आणि अनसूया या कलाकारांनी प्रमुख भूमिका साकारली.  आता या चित्रपटाच्या सिक्वेलची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत. 'पुष्पा: द राइज' हा चित्रपट प्रेक्षक अॅमेझॉन प्राइम या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रेक्षक पाहू शकतात. तर आता 'पुष्पा 2'  म्हणजेच   'पुष्पा: द रूल'  हा चित्रपट नेटफ्लिक्सवर रिलीज होत आहे. 

वाचा इतर महत्वाच्या बातम्या:

Allu Arjun Pushpa 2:   लाइट्स, कॅमेरा, अॅक्शन; अल्लू अर्जुननं शेअर केला 'पुष्पा: द राइज'च्या सेटवरील खास व्हिडीओ

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

BMC Bogus Voter : कॅमेऱ्यासमोरच दुबार मतदान? निवडणूक अधिकाऱ्यांची 'चुप्पी', धारावीतील प्रकार एबीपी माझाच्या कॅमेरात कैद
कॅमेऱ्यासमोरच दुबार मतदान? निवडणूक अधिकाऱ्यांची 'चुप्पी', धारावीतील प्रकार एबीपी माझाच्या कॅमेरात कैद
BMC Exit Poll : मनसेला 6 जागा, तर शिंदेंच्या शिवसेनेला 54; मुंबईकरांची झोप उडवणारा एक्झिट पोल समोर
मनसेला 6 जागा, तर शिंदेंच्या शिवसेनेला 54; मुंबईकरांची झोप उडवणारा एक्झिट पोल समोर
BMC Exit Poll : ठाकरेंच्या 25 वर्षांच्या सत्तेला भाजपचा सुरुंग? मुंबईचा सर्वात धक्कादायक एक्झिट पोल समोर
ठाकरेंच्या 25 वर्षांच्या सत्तेला भाजपचा सुरुंग? मुंबईचा सर्वात धक्कादायक एक्झिट पोल समोर
Pune Exit Poll: पुण्यात अजित पवारांना 'दे धक्का', महापालिकेत भाजपची सत्ता? प्राबच्या एक्झिट पोलनुसार कोणाला किती जागा?
पुण्यात अजित पवारांना 'दे धक्का', महापालिकेत भाजपची सत्ता? प्राबच्या एक्झिट पोलनुसार कोणाला किती जागा?

व्हिडीओ

BMC Election Exit Poll : मुंबईत भाजप आणि शिवसेनेला 138 जागा मिळणार- एक्झिट पोलचा अंदाज
Uddhav Thackeray Full PC : बाईचं नाव रविंद्र असतं का? लोकशाही पुसली जातेय; मतदानानंतर ठाकरेंचा घणाघात
Akola Voting : अकोल्यात बुरखाधारी महिलांची तपासणी न करता सोडलं जातंय
Election Commission PC :पाडू यंत्र हे 2004 पासून हे यंत्र आम्ही नवीन आणलेलं नाही, आयोगाचं स्पष्टीकरण
Geeta Gawali Mumbai : अरुण गवळीची लेक निवडणुकीच्या रिंगणात, गीता गवळींनी व्यक्त केला विजयाचा विश्वास

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
BMC Bogus Voter : कॅमेऱ्यासमोरच दुबार मतदान? निवडणूक अधिकाऱ्यांची 'चुप्पी', धारावीतील प्रकार एबीपी माझाच्या कॅमेरात कैद
कॅमेऱ्यासमोरच दुबार मतदान? निवडणूक अधिकाऱ्यांची 'चुप्पी', धारावीतील प्रकार एबीपी माझाच्या कॅमेरात कैद
BMC Exit Poll : मनसेला 6 जागा, तर शिंदेंच्या शिवसेनेला 54; मुंबईकरांची झोप उडवणारा एक्झिट पोल समोर
मनसेला 6 जागा, तर शिंदेंच्या शिवसेनेला 54; मुंबईकरांची झोप उडवणारा एक्झिट पोल समोर
BMC Exit Poll : ठाकरेंच्या 25 वर्षांच्या सत्तेला भाजपचा सुरुंग? मुंबईचा सर्वात धक्कादायक एक्झिट पोल समोर
ठाकरेंच्या 25 वर्षांच्या सत्तेला भाजपचा सुरुंग? मुंबईचा सर्वात धक्कादायक एक्झिट पोल समोर
Pune Exit Poll: पुण्यात अजित पवारांना 'दे धक्का', महापालिकेत भाजपची सत्ता? प्राबच्या एक्झिट पोलनुसार कोणाला किती जागा?
पुण्यात अजित पवारांना 'दे धक्का', महापालिकेत भाजपची सत्ता? प्राबच्या एक्झिट पोलनुसार कोणाला किती जागा?
समुद्र सीमेवर भारताच्या हद्दीत पाकिस्तानची अल मदीना बोट, 9 जण ताब्यात; सुरक्षा यंत्रणा अलर्ट
समुद्र सीमेवर भारताच्या हद्दीत पाकिस्तानची अल मदीना बोट, 9 जण ताब्यात; सुरक्षा यंत्रणा अलर्ट
Shankar Jagtap : शंकर जगतापांचा अश्विनी जगतापांवर पलट'वार'! गृहकलहाने पिंपरी चिंचवडमध्ये खळबळ
शंकर जगतापांचा अश्विनी जगतापांवर पलट'वार'! गृहकलहाने पिंपरी चिंचवडमध्ये खळबळ
मतदान केंद्रावर कोब्रा सापाचा थरार; पोलीस धावला, मतदारांच्या भुवया उंचावल्या, गर्दीतून सुखरूप पकडला
मतदान केंद्रावर कोब्रा सापाचा थरार; पोलीस धावला, मतदारांच्या भुवया उंचावल्या, गर्दीतून सुखरूप पकडला
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 जानेवारी 2026 | गुरुवार 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 जानेवारी 2026 | गुरुवार 
Embed widget