एक्स्प्लोर

Project K : महाशिवरात्रीनिमित्त दीपिका पादुकोण अन् प्रभासने चाहत्यांना दिली खास भेट; 'प्रोजेक्ट के'ची रिलीज डेट जाहीर!

Project K : महाशिवरात्रीनिमित्त दीपिका पादुकोण (Deepika Padukone) आणि प्रभासच्या (Prabhas) आगामी 'प्रोजेक्ट के' या सिनेमाची रिलीज डेट जाहीर करण्यात आली आहे.

Project K Release Date Out : दाक्षिणात्य अभिनेता प्रभास (Prabhas) आणि बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पादुकोण (Deepika Padukone) गेल्या काही दिवसांपासून 'प्रोजेक्ट के' (Project K) या सिनेमामुळे चर्चेत आहेत. आता महाशिवरात्रीनिमित्त निर्मात्यांनी या सिनेमाचं नवं पोस्टर शेअर करत रिलीज डेट जाहीर केली आहे. 

'प्रोजेक्ट के' कधी येणार प्रेक्षकांच्या भेटीला? (Project K Release Date) 

'प्रोजेक्ट के' या सिनेमाच्या नव्या पोस्टरने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. या पोस्टरमध्ये धुळीत पडलेला एक हात दिसत आहे. तसेच तीन जण या एका हातावर गोळी मारताना दिसत आहेत. "जग वाट पाहत आहे", असं या पोस्टरवर लिहिण्यात आलं आहे. पोस्टर शेअर करत या सिनेमाची रिलीज डेटदेखील जाहीर करण्यात आली आहे. हा बहुचर्चित सिनेमा 12 जानेवारी 2024 रोजी मकरसंक्रांतीच्या दिवशी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 

बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांनीदेखील 'प्रोजेक्ट के' या सिनेमाचं पोस्टर शेअर करत चाहत्यांना महाशिवरात्रीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. हटके पोस्टरमुळे चाहत्यांची उत्सुकता वाढली आहे. त्यांना आता सिनेमाची प्रतीक्षा आहे. वैजयंती मूवीजच्या बॅनरखाली या सिनेमाची निर्मिती करण्यात आली आहे. त्यामुळे वैजयंती मूवीजने देखील पोस्टर शेअर करत चाहत्यांना महाशिवरात्रीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. 

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Vyjayanthi Movies (@vyjayanthimovies)

'प्रोजेक्ट के' या सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा नाग अश्विनने सांभाळली आहे. या सिनेमात प्रेक्षकांना अॅक्शनचा तडका पाहायला मिळणार आहे. नववर्षाच्या सुरुवातीला प्रेक्षकांच्या भेटीला येणारा वैजयंती मूवीजचा 'प्रोजेक्ट के' हा सर्वोत्कृष्ट सिनेमा असेल. आता या सिनेमाच्या शूटिंगला सुरुवात झाली असून हा सिनेमा प्रेक्षकांचं चांगलच मनोरंजन करणार आहे. 

‘शेहनशाह’ अन् ‘बाहुबली’ एकाच सिनेमात!

बॉलिवूडचे सुपरस्टार अमिताभ बच्चन आणि दाक्षिणात्य सुपरस्टार प्रभास पहिल्यांदाच 'प्रोजेक्ट के' या सिनेमात एकत्र झळकणार आहेत. त्यामुळे रुपेरी पडद्यावर त्यांना एकत्र पाहण्याची चाहत्यांना उत्सुकता आहे. दोघेही सिनेसृष्टीतील उत्कृष्ट, हरहुन्नरी अभिनेते आहेत. सिनेमाच्या नव्या पोस्टवर चाहते आता सिनेमाची उत्सुकता, शेहनशाह आणि बाहुबलीचा स्क्रिन शेअर करताना पाहायचयं, अशा कमेंट्स चाहत्यांनी केल्या आहेत.

संबंधित बातम्या

Project K : ‘शेहनशाह’ अन् ‘बाहुबली’ एकाच चित्रपटात! ‘प्रोजेक्ट के’मध्ये झळकणार प्रभास-अमिताभ बच्चन यांची जोडी

महत्त्वाच्या बातम्या

Columbus Marathi Movie: 'चला हवा येऊ द्या' फेम कलाकाराला लागली 'कोलंबस'ची लॉटरी! सिनेमा कधी येणार प्रेक्षकांच्या भेटीला?
'चला हवा येऊ द्या' फेम कलाकाराला लागली 'कोलंबस'ची लॉटरी! सिनेमा कधी येणार प्रेक्षकांच्या भेटीला?
Lata Mangeshkar Song: लता मंगेशकरांचं 78 वर्षांपूर्वीचं कल्ट गाणं; रेल्वे स्टेशनवर सिगारेटच्या पाकिटावर सुचली धून, निर्मात्यांनी आधी दिलेला नकार पण...
लता मंगेशकरांचं 78 वर्षांपूर्वीचं कल्ट गाणं; रेल्वे स्टेशनवर सिगारेटच्या पाकिटावर सुचली धून, निर्मात्यांनी आधी दिलेला नकार पण...
Breaking Bad Fame RJ Mitte Dies: मनी हाईस्टपेक्षा कितीतरी पटींनी भारी असणाऱ्या वेब सीरिजच्या सुपरस्टार अभिनेत्याचं निधन; स्वतःच आयुष्य संपवल्याच्या चर्चांना उधाण
मनी हाईस्टपेक्षा कितीतरी पटींनी भारी असणाऱ्या वेब सीरिजच्या सुपरस्टार अभिनेत्याचं निधन; स्वतःच आयुष्य संपवल्याच्या चर्चांना उधाण
Rahul Vaidya On Intimacy Remark: बायकोसोबतचं बेडरुम सिक्रेट, राहुल वैद्य सर्वांदेखत खासगी क्षणांबद्दल बोलून गेला, पत्नीही हादरली, नेटकरी चिडले... VIDEO
बायकोसोबतचं बेडरुम सिक्रेट, राहुल वैद्य सर्वांदेखत खासगी क्षणांबद्दल बोलून गेला, पत्नीही हादरली, नेटकरी चिडले... VIDEO

व्हिडीओ

Shetitil Navdurga | Bharti Nirgude | घरात संकट होतं, पण शेतात तिची हिंमत पिकत होती!
India Alliance Supreme Court Morcha : विरोधकांची 'सुप्रीम' धाव; कुणाकुणावर घाव? | Special Report ABP Majha
Abhijeet Dipke vs Delhi Police : दिपके, पोलीस भिडले; कोण कुणाला नडले? | Special Report ABP Majha
Sunetra Pawar Speech : अजित पवारांचे नाव घेताना सुनेत्रा पवार भावुक, भावनिक भाषण
MPSC Protest Pune: पुण्यातील तिन्ही आंदोलनं कशी गुंडाळली?; Inside Story

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
'चीन लडाखला केंद्रशासित प्रदेश म्हणून मान्यता देत नाही..' लडाखमधील 28 ठिकाणांवर दावा; गोगरा-हॉट स्प्रिंगचाही समावेश, जिथं 2020 मध्ये दोन्ही देशांच्या सैन्यांमध्ये घनघोर संघर्ष
'चीन लडाखला केंद्रशासित प्रदेश म्हणून मान्यता देत नाही..' लडाखमधील 28 ठिकाणांवर दावा; गोगरा-हॉट स्प्रिंगचाही समावेश, जिथं 2020 मध्ये दोन्ही देशांच्या सैन्यांमध्ये घनघोर संघर्ष
L Murugan Resignation : मोठी बातमी! मोदींच्या कॅबिनेटमधील मंत्र्याचा राजीनामा, राज्यसभेचे खासदारपदही सोडलं, विरोधकांनी घेरलं असताना दिल्लीत मोठी घडामोड
मोठी बातमी! मोदींच्या कॅबिनेटमधील मंत्र्याचा राजीनामा, राज्यसभेचे खासदारपदही सोडलं, विरोधकांनी घेरलं असताना दिल्लीत मोठी घडामोड
पुण्यात IT अभियंता महिलेनं संपवलं जीवन, चिठ्ठीत लिहला सासरच्याकडून होणारा त्रास; पतीसह 5 जणांविरुद्ध गुन्हा दाखल
पुण्यात IT अभियंता महिलेनं संपवलं जीवन, चिठ्ठीत लिहला सासरच्याकडून होणारा त्रास; पतीसह 5 जणांविरुद्ध गुन्हा दाखल
ज्ञानेश कुमार माफिया, सिस्टीमचं अपराधीकरण केलं; इंडिया आघाडीच्या बैठकीनंतर संजय राऊत कडाडले, सांगितली पुढील रणनीती
ज्ञानेश कुमार माफिया, सिस्टीमचं अपराधीकरण केलं; इंडिया आघाडीच्या बैठकीनंतर संजय राऊत कडाडले, सांगितली पुढील रणनीती
Cyberattack on Refrigeration: फ्रान्समधील शेकडो सुपरमार्केटच्या रेफ्रिजरेशन प्रणालीवर सायबर हल्ला; फ्रीझर तापमान 50 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचून आगीचा भडका
फ्रान्समधील शेकडो सुपरमार्केटच्या रेफ्रिजरेशन प्रणालीवर सायबर हल्ला; फ्रीझर तापमान 50 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचून आगीचा भडका, अनेक दुकानांमध्येही आगीचा भडका
Piyush Goyal Vs Rahul Gandhi : 'एकाला मंत्री केलं तर दुसऱ्याला पद्मभूषण दिलं', पीयूष गोयल यांचा राहुल गांधींवर पलटवार; काँग्रेसचा जुना ट्रॅक रेकॉर्डच काढला बाहेर
'एकाला मंत्री केलं तर दुसऱ्याला पद्मभूषण दिलं', पीयूष गोयल यांचा राहुल गांधींवर पलटवार; काँग्रेसचा जुना ट्रॅक रेकॉर्डच काढला बाहेर
एकनाथ शिंदे नाराज झाल्यास स्फोट होतो, ते नाराज नाहीत; बैठकीच्या अनुपस्थितीवरुन बच्चू कडूंनी सांगितली मन की बात
एकनाथ शिंदे नाराज झाल्यास स्फोट होतो, ते नाराज नाहीत; बैठकीच्या अनुपस्थितीवरुन बच्चू कडूंनी सांगितली मन की बात
PM Modi: 'भारत ही लोकशाहीची जननी, शासनाचा उद्देश केवळ सत्तेचा वापर करणे नाही तर..' पीएम मोदी काय काय म्हणाले?
'भारत ही लोकशाहीची जननी, शासनाचा उद्देश केवळ सत्तेचा वापर करणे नाही तर..' पीएम मोदी काय काय म्हणाले?
Embed widget