(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Nitin Manmohan: चित्रपट निर्माते नितीन मनमोहन यांचे निधन; वयाच्या 60 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
वयाच्या 60 व्या वर्षी नितीन मनमोहन (Nitin Manmohan) यांनी अखेरचा श्वास घेतला. नितीन मनमोहन त्यांनी अनेक हिट चित्रपटांची निर्मिती केली होती.
Nitin Manmohan Passed Away: प्रसिद्ध चित्रपट निर्माते नितीन मनमोहन (Nitin Manmohan) यांचे निधन झाले आहे. नितीन मनमोहन यांनी अनेक हिट चित्रपटांची निर्मिती केली होती. वयाच्या 60 व्या वर्षी नितीन मनमोहन यांनी अखेरचा श्वास घेतला. नितीन यांना 3 डिसेंबरला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. गेली 15 दिवस ते व्हेंटिलेटरवर होते.
हृदयविकाराचा झटका आल्यानं रुग्णालयात केलं होतं दाखल
हृदयविकाराचा झटका आल्यानं नितीन मनमोहन यांना नवी मुंबईमधील कोकिलाबेन धीरूभाई अंबानी या रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं होतं. डॉक्टरनं नितीन यांना व्हेंटिलेटरवर ठेवले होते. नितीन मनमोहन यांच्या निधनानं मनोरंजनसृष्टीवर शोककळा पसरली आहे.
Veteran filmmaker Nitin Manmohan passes away in Mumbai.
— ANI (@ANI) December 29, 2022
हिट चित्रपटांची केली निर्मिती
नितीन मनमोहन यांनी अनेक हिट चित्रपटांची निर्मिती केली. नितीन मनमोहन यांचे वडील मनमोहन हे अभिनेते होते. त्यांनी 'ब्रह्मचारी', 'गुमनाम' आणि 'नया जमाना' यांसारख्या चित्रपटांमध्ये काम केलं. 1992 मध्ये रिलीज झालेल्या बोल राधा बोल या हिट चित्रपटाची निर्मिती नितीन मनमोहन यांनी केली.
तसेच लाडला (1994), यमला पगला दीवाना (2011), आर्मी स्कूल, लव के लिए कुछ भी करेगा (2001), दस (2005), चल मेरे भाई (2001), महा-संग्राम (1990), इंसाफ: द फाइनल जस्टिस (1997), दीवानगी, नई पडोसन (2003), अधर्म (1992), बाघी, ईना मीना डीका, तथास्तु, टँगो या चित्रपटांची निर्मिती देखील नितीन मनमोहन यांनी केली आहे.
अनिल कपूर (Anil Kapoor) आणि श्रीदेवी (Sridevi) यांच्या 1994 मध्ये रिलीज झालेल्या लाडला या चित्रपटाची देखील निर्मिती नितीन मनमोहन यांनी केली. तसेच 2011 मध्ये प्रदर्शित झालेल्या अभिनेता सलमान खानच्या (Salman Khan) रेडी या चित्रपटाची चित्रपटाची देखील निर्मिती त्यांनी केली.
प्रसिद्ध फिल्ममेकर अशोक पंडित यांनी ट्विटरवर ट्वीट शेअर करुन नितीन मनमोहन यांना श्रद्धांजली वाहिली आहे.
Sorry to hear about the demise of well known film producer,Director , Writer Nitin Manmohan ji due to heart attack . It’s another loss to the film Industry.
— Ashoke Pandit (@ashokepandit) December 29, 2022
My heartfelt condolences to the family & near ones.
ओम् शान्ति !
🙏🙏🙏 pic.twitter.com/nouPGxWw0C
वाचा इतर महत्वाच्या बातम्या: