एक्स्प्लोर
'क्वॉन्टिको'च्या सेटवर अपघात, प्रियांकाच्या डोक्याला इजा
न्यूयॉर्क : अभिनेत्री प्रियांका चोप्राला 'क्वॉन्टिको' टीव्ही शोच्या सेटवर लहानसा अपघात झाला आहे. अपघातानंतर प्रियांकाला रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं, मात्र डॉक्टरांनी तिला डिस्चार्ज दिला आहे.
'एबीसी' या क्वॉन्टिको शोच्या प्रोडक्शन टीमने यासंदर्भात माहिती दिली असून सध्या प्रियांका तिच्या घरी आराम करत आहे. स्टंट करताना गुरुवारी प्रियांका पाय घसरुन डोक्यावर पडली. त्यानंतर तिच्या मेंदूला इजा झाल्याने तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आलं.
डॉक्टरांनी तिच्यावर इमर्जन्सी रुममध्ये उपचार केल्यानंतर तिला काही तासात डिस्चार्ज दिला. प्रियांका सध्या घरी आराम करत आहे. या विकेंडनंतर ती पुन्हा शूटिंग सुरु करेल, अशी माहिती क्वॉन्टिको टीमतर्फे देण्यात आली आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
निवडणूक
पुणे
विश्व
Advertisement