Prathamesh Parab: प्रथमेश परबची खास पोस्ट; म्हणाला, 'या दिवसानं माझं आयुष्य बदललं...'
नुकतीच प्रथमेशनं (Prathamesh Parab) एक खास पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली. या पोस्टला प्रथमेशनं खास कॅप्शन देखील दिलं आहे.
Prathamesh Parab: अभिनेता प्रथमेश परब (Prathamesh Parab) हा त्याच्या अभिनयानं नेहमीच प्रेक्षकांची मनं जिंकतो. प्रथमेशच्या चित्रपटांची त्याचे चाहते उत्सुकतेने वाट बघतात. नुकतीच प्रथमेशनं एक खास पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली. त्याच्या या पोस्टनं अनेकांचे लक्ष वेधले.
प्रथमेशची पोस्ट
प्रथमेशनं त्याचा टाईमपास चित्रपटातील एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला. प्रथमेशनं या फोटोला कॅप्शन दिलं, '3 जानेवारी' या दिवसानं माझं आयुष्य बदललं. या दिवसाने मला नवी ओळख दिली. 'दगडू' एक ओळख... ती कायम माझ्यासोबत राहील. ज्या दिवसाने मला ब्रेक दिला, हा दिवस कदाचित प्रत्येक अभिनेत्याला त्याच्या आयुष्यात हवा असतो. ज्या दिवसामुळे मी स्वप्नांवर विश्वास ठेवायला शिकलो. हा दिवस नेहमीच आणि कायमचा खास असेल.' ही पोस्ट शेअर करुन प्रथमेशनं टाईमपासची 9 वर्षे हा हॅशटॅग वापरला. प्रथमेशच्या या पोस्टला रवी जाधव यांनी देखील कमेंट केली आहे.
3 जानेवारी 2014 रोजी टाईमपास हा चित्रपट रिलीज झाला. या चित्रपटाचं दिग्दर्शन रवी जाधव यांनी केलं. या चित्रपटात प्रथमेशसोबतच केतकी माटेगावकरनं देखील प्रमुख भूमिका साकारली होती. टाईमपास या चित्रपटानंतर टाईमपास-2 आणि टाईमपास-3 हे चित्रपट देखील प्रेक्षकांच्या भेटीस आले.
View this post on Instagram
प्रथमेश परबचा आगामी चित्रपट
प्रथमेश परबचा 'ढिशक्यांव' हा आगामी चित्रपट 10 फेब्रुवारी 2023 रोजी प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. महोम्मद देशमुख, उमेश विठ्ठल मोहळकर आणि प्रितम एसके पाटील यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे. दिग्दर्शक प्रितम एस के पाटील यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे. प्रथमेशचे चाहते या चित्रपटाची उत्सुकतेने वाट बघत आहेत.
वाचा इतर महत्वाच्या बातम्या: