एक्स्प्लोर

Dhishkyaoon Marathi Movie : प्रथमेश परब चढणार बोहल्यावर? 'ढिशक्यांव' चित्रपटात दिसणार लग्नसोहळ्याची धमाल

Prathamesh Parab : प्रथमेश परब अभिनित 'ढिशक्यांव' (Dhishkyaoon) या चित्रपटाचे मोशन पोस्टर नुकतेच सोशल मीडियावर प्रदर्शित करण्यात आले आहे.

Prathamesh Parab : अभिनेता प्रथमेश परबच्या लग्नाची चर्चा सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालतेय. मात्र, आता याच चर्चेला अखेर पूर्णविराम मिळाला आहे. मात्र, प्रथमेश खऱ्या आयुष्यात नव्हे तर मोठ्या पडद्यावरील आयुष्यात बोहल्यावर चढण्यास सज्ज झाला आहे. विनोद आणि प्रेम याचं उत्तम समीकरण साधत प्रथमेश परब अभिनित 'ढिशक्यांव' (Dhishkyaoon) या चित्रपटाचे मोशन पोस्टर नुकतेच सोशल मीडियावर प्रदर्शित करण्यात आले आहे. या पोस्टरमध्ये प्रथमेश मुंडावळ्या बांधून, नवरा बनून त्याच्या बायकोसोबत पाहायला मिळतोय. मात्र या पोस्टरमध्ये गोंधळात पाडणारी बाजू म्हणजे प्रथमेशच्या बायकोच्या हातात बंदूक पाहायला मिळत असून ती बंदूक तिने प्रथमेशवर रोखून धरलेली आहे, तर प्रथमेश आणि अहेमदच्या गळयात हार पाहायला मिळतोय त्यामुळे हा नेमका गोंधळ काय आहे हे गुपित 10 फेब्रुवारी 2023 ला समोर येणार आहे.   

दिग्दर्शक प्रितम एस के पाटील दिग्दर्शित 'ढिशक्यांव'' हा चित्रपट निर्माते महोम्मद देशमुख, उमेश विठ्ठल मोहळकर आणि प्रितम एसके पाटील यांनी निर्मित केला असून चित्रपटाची प्रस्तुती एव्हीके एंटरटेनमेंट (AVK Entertainment), अमोल कागणे, प्रणित वायकर यांनी केली आहे. तर, चित्रपटाच्या दिग्दर्शनाची धुरा दिग्दर्शक प्रितम एस के पाटील यांनी पेलली आहे. चित्रपटाचे सहनिर्माते म्हणून राजीव पाटील, राहुल जाधव आणि उमाकांत बरदापुरे यांनी बाजू सांभाळली आहे. चित्रपटाची कथा लेखक संजय नवगिरे लिखित आहे. तर चित्रपटात प्रथमेश परब बरोबर संदीप पाठक, अहेमद देशमुख, सुरेश विश्वकर्मा, मेघा शिंदे, प्रणव पिंपळकर, राजीव पाटील, सिद्धेश्वर झाडबुके, आसावरी नितीन, प्रसाद खैरे, साक्षी तोंडे, महेश घाग, मधु कुलकर्णी, बादशाह शेख, अमित दुधाने, शिव माने, विनया डोंगरे, हर्ष राजपूत, सोमनाथ गिरी या कलाकारांना पाहणे औत्स्युक्याचे ठरणार आहे. नवोदित अभिनेता अहेमद देशमुख हा 'ढिशक्यांव' चित्रपटातून मराठी चित्रपटसृष्टीत प्रथमच पाऊल टाकणार आहे.

'ढिशक्यांव' चित्रपटाचे पोस्टर पाहिल्यानंतर चित्रपटाच्या कथा नेमकी काय असेल याची उत्सुकता लागून राहते. चित्रपटात हे सर्व कलाकार मिळून काय धुडगूस घालणार आहेत याकडे साऱ्या प्रेक्षकांच्या नजरा वळल्या आहेत. आणि त्यासाठी जास्त विलंब न करता येत्या 10 फेब्रुवारी 2023 ला हा चित्रपट संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होण्यास सज्ज झाला आहे. 

महत्त्वाच्या बातम्या : 

तुझेच मी गीत गात आणि सुख म्हणजे नक्की काय असतं या मालिकेच्या सेटवर रितेश-जेनिलियानं लावली हजेरी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

वाल्मिक कराडची प्रकृती बिघडली, थकवा, चेस्ट पेन; SIT पथकासह थेट रुग्णालय गाठलं
वाल्मिक कराडची प्रकृती बिघडली, थकवा, चेस्ट पेन; SIT पथकासह थेट रुग्णालय गाठलं
Video: तू माझ्याकडून लाख रुपये घेतले, वाल्मिक कराडच्या प्रश्नावर अजित पवारांचा पत्रकारांनाच प्रतिसवाल
Video: तू माझ्याकडून लाख रुपये घेतले, वाल्मिक कराडच्या प्रश्नावर अजित पवारांचा पत्रकारांनाच प्रतिसवाल
Video: शिवसेनेची काँग्रेस होतेय म्हणताच शिंदेंच्या शिवसेनेकडून भास्कर जाधवांना ऑफर; ते अनुभवी,मोठे नेते
Video: शिवसेनेची काँग्रेस होतेय म्हणताच शिंदेंच्या शिवसेनेकडून भास्कर जाधवांना ऑफर; ते अनुभवी,मोठे नेते
... म्हणून बाळासाहेब ठाकरे स्मारक समिती अध्यक्षपदावरुन उद्धव ठाकरेंना हटविण्याची मागणी; मंत्री सामंताचं स्पष्टीकरण
... म्हणून बाळासाहेब ठाकरे स्मारक समिती अध्यक्षपदावरुन उद्धव ठाकरेंना हटविण्याची मागणी; मंत्री सामंताचं स्पष्टीकरण
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 6PM TOP Headlines 6PM 14 January 2025Walmik Karad Supporters: कराडवर लोकांचं प्रेम, परळी थांबलीय, कार्यकर्त्याने अंगावर पेट्रोल ओतलंAjit Pawar On Walmik Karad | दोषींवर योग्य ती कारवाई केली जाणार, मुंडेंबाबत प्रश्न अजितदादा म्हणाले...ABP Majha Marathi News Headlines 5PM TOP Headlines 5PM 14 January 2025

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
वाल्मिक कराडची प्रकृती बिघडली, थकवा, चेस्ट पेन; SIT पथकासह थेट रुग्णालय गाठलं
वाल्मिक कराडची प्रकृती बिघडली, थकवा, चेस्ट पेन; SIT पथकासह थेट रुग्णालय गाठलं
Video: तू माझ्याकडून लाख रुपये घेतले, वाल्मिक कराडच्या प्रश्नावर अजित पवारांचा पत्रकारांनाच प्रतिसवाल
Video: तू माझ्याकडून लाख रुपये घेतले, वाल्मिक कराडच्या प्रश्नावर अजित पवारांचा पत्रकारांनाच प्रतिसवाल
Video: शिवसेनेची काँग्रेस होतेय म्हणताच शिंदेंच्या शिवसेनेकडून भास्कर जाधवांना ऑफर; ते अनुभवी,मोठे नेते
Video: शिवसेनेची काँग्रेस होतेय म्हणताच शिंदेंच्या शिवसेनेकडून भास्कर जाधवांना ऑफर; ते अनुभवी,मोठे नेते
... म्हणून बाळासाहेब ठाकरे स्मारक समिती अध्यक्षपदावरुन उद्धव ठाकरेंना हटविण्याची मागणी; मंत्री सामंताचं स्पष्टीकरण
... म्हणून बाळासाहेब ठाकरे स्मारक समिती अध्यक्षपदावरुन उद्धव ठाकरेंना हटविण्याची मागणी; मंत्री सामंताचं स्पष्टीकरण
मोठी बातमी! राज्यातील शाळांसाठी CBSE पॅटर्न; मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत निर्णय, शिक्षणमंत्र्यांची माहिती
मोठी बातमी! राज्यातील शाळांसाठी CBSE पॅटर्न; मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत निर्णय, शिक्षणमंत्र्यांची माहिती
केक कापला, फुले उधळली; पुण्याच्या बॉम्बस्कॉड पथकातील 'तेजा'ला निरोप, अधिकारी भावूक
केक कापला, फुले उधळली; पुण्याच्या बॉम्बस्कॉड पथकातील 'तेजा'ला निरोप, अधिकारी भावूक
मोठी बातमी! ST कर्मचाऱ्यांसाठी प्रत्येक जिल्ह्यात 25 खाटांचे रुग्णालय; परिवहन मंत्र्यांची घोषणा
मोठी बातमी! ST कर्मचाऱ्यांसाठी प्रत्येक जिल्ह्यात 25 खाटांचे रुग्णालय; परिवहन मंत्र्यांची घोषणा
Walmik Karad MCOCA : लेकावर मकोका, वाल्मिक कराडच्या आईंची प्रकृती बिघडली; समर्थकांचा संताप, बीडमध्ये घडामोडींना वेग
लेकावर मकोका, वाल्मिक कराडच्या आईंची प्रकृती बिघडली; समर्थकांचा संताप, बीडमध्ये घडामोडींना वेग
Embed widget