November Movie Release : 'फोन भूत' ते 'दृश्यम 2'; नोव्हेंबर महिन्यात प्रेक्षकांना मिळणार कॉमेडी, हॉरर अन् अॅक्शनचा तडका
Movie : नोव्हेंबर महिन्यात सिनेप्रेमींना वेगवेगळ्या पद्धतीचे सिनेमे पाहायला मिळणार आहेत. यात 'मिली', 'डबल एक्सएल', 'ऊंचाई', 'यशोदा', 'दश्यम 2' अशा अनेक सिनेमांचा समावेश आहे.
November Movie Releases : सिनेप्रेमींसाठी नोव्हेंबर (November) महिना खूप खास आहे. या महिन्यात वेगवेगळ्या जॉनरचे सिनेमे सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहेत. त्यामुळे बॉक्स ऑफिसवर अनेक सिनेमांची टक्कर होणार आहे. यात 'मिली', 'डबल एक्सएल', 'ऊंचाई', 'यशोदा', 'दश्यम 2', 'भेडिया' अशा अनेक सिनेमांचा समावेश आहे.
मिली
कधी होणार प्रदर्शित? 4 नोव्हेंबर
बॉलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूरच्या 'मिली' या सिनेमाचा ट्रेलर गेल्या काही दिवसांपूर्वी प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. ट्रेलर प्रेक्षकांच्या पसंतीस उतरल्याने प्रेक्षक सिनेमाची प्रतीक्षा करत आहेत. आता 4 नोव्हेंबरला हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
फोन भूत
कधी होणार प्रदर्शित? 4 नोव्हेंबर
'फोन भूत' या भयपटाची प्रेक्षकांना उत्सुकता आहे. या सिनेमात कतरिना कैफ, सिद्धांत चतुर्वेदी आणि ईशान खट्टर स्क्रीन शेअर करताना दिसणार आहेत. फरहान अख्तर आणि रितेश सिधवानीच्या एक्सेल एन्टटेनमेंटच्या बॅनरखाली या सिनेमाची निर्मिती करण्यात आली आहे. हा सिनेमा 4 नोव्हेंबरला सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे.
डबल एक्सएल
कधी होणार प्रदर्शित? 4 नोव्हेंबर
'डबल एक्सएल' या सिनेमात हुमा कुरॅशी आणि सोनाक्षी सिन्हा महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. हा विनोदी सिनेमा हसवत-हसवत प्रेक्षकांना चांगला संदेश देण्याचं काम करणार आहे. नुकताच या सिनेमाचा ट्रेलर आऊट झाला असून 4 नोव्हेंबरला सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
ऊंचाई
कधी होणार प्रदर्शित? 11 नोव्हेंबर
'ऊंचाई' हा सिनेमा मैत्रीवर भाष्य करणारा आहे. सूरज बडजात्याने या सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे. या सिनेमात अमिताभ बच्चन, अनुपम खेर आणि बोमन ईरानी मुख्य भूमिकेत आहेत. तीन मित्रींची गोष्ट या सिनेमात प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. 11 नोव्हेंबरला हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
यशोदा
कधी होणार प्रदर्शित? 11 नोव्हेंबर
समंथा रुथ प्रभूच्या 'यशोदा' या सिनेमाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आल्यापासून हा सिनेमा काही ना काही कारणाने चर्चेत आहे. या सिनेमात समंथाचा एक वेगळा अंदाज प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. अॅक्शनचा तडका असलेला हा सिनेमा तेलुगू, हिंदी, कन्नड, मल्याळम आणि तामिळ भाषेत प्रदर्शित होणार आहे.
दृश्यम 2
कधी होणार प्रदर्शित? 18 नोव्हेंबर
'दृश्यम 2' या सिनेमाची प्रेक्षक गेली सात वर्ष प्रतीक्षा करत आहेत. आता सात वर्षांनी हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमात अजय देवगन आणि तब्बू मुख्य भूमिकेत आहेत. 18 नोव्हेंबरला हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
भेडिया
कधी होणार प्रदर्शित? 25 नोव्हेंबर
'भेडिया' या बहुचर्चित सिनेमात वरुण धवन आणि कृती सेनन मुख्य भूमिकेत आहेत. ट्रेलर प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला होता. वरुण-कृतीचे चाहते या सिनेमाची आतुरतेने वाट पाहत आहेत. 25 नोव्हेंबरला हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
संबंधित बातम्या